लेकीबाळी असुरक्षित!

पुणे : राज्यातील लेकीबाळी, आयाबहिणी असुरक्षीत असून सरकार मात्र निवडणूक आणि जल्लोषात मग्न असल्याचा संताप राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी बुधवार दि. ६ मे रोजी येथे बोलून दाखविला.

नसरापूरची घटना ताजी असतानाच आता पुन्हा अल्पवयीन मुलीवर आजोबांनीच लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना पर्वती परिसरात घडली. मात्र, नागरिकांच्या सतर्कतेमुळे पुढील अनर्थ टळला. ही घटना समोर आल्यावर जमावाने रास्ता रोको करून संताप व्यक्त केला. सातत्याने महिलांवरील अत्याचाराच्या विविध घटना समोर येत आहेत. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी आक्रमक पवित्रा घेत संताप व्यक्त केला आहे.

राज्यातल्या लेकीबाळी सुरक्षित नाहीत, सरकार निवडणूक आणि जल्लोषात मग्न असे म्हणत निशाणा साधला आहे. तसेच सरकारने असा काही आकडा फिक्स केला आहे का की अजून एवढ्याएवढ्या मुलींवर अत्याचार झाल्यानंतर आम्ही शक्ती कायदा आणणार? असा सवालही विचारला आहे. राज्यात मुलींवरील अत्याचाराच्या घटनांना कोणतीही वेसन लागत नसून नसरापूर, केज, पालघर येथील घटना ताज्या असताना रात्री पुन्हा पुण्यात पर्वती इथे एका आजोबाकडूनच नातीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न झाल्याची संतापजनक घटना घडली. राज्यात कुठे ना कुठे दररोजच लेकीबाळींवर अत्याचार घडत असल्याने चीड येत आहे.

गुन्हेगारांना खुलीसूट?
रोहित पवार यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्वीट केले आहे. राज्यात मुलींवरील अत्याचाराच्या घटनांना कोणतीही वेसन लागत नसून नसरापूर, केज, पालघर येथील घटना ताज्या असताना रात्री पुन्हा पुण्यात पर्वती इथे एका आजोबाकडूनच नातीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न झाल्याची संतापजनक घटना घडली. राज्यात कुठे ना कुठे दररोजच घडणा-या या घटना चीड आणणा-या आहेत. राज्यातल्या लेकीबाळी सुरक्षित राहिलेल्या नाहीत आणि सरकार बाराही महिने निवडणूक, प्रचार आणि जल्लोष यात मग्न आहे.

टार्गेट पूर्ण झाल्यावर शक्ती कायदा आणणार का?
निवडणुकीतील टार्गेटप्रमाणे सरकारने असा काही आकडा फिक्स केला आहे का की अजून एवढ्याएवढ्या मुलींवर अत्याचार झाल्यानंतर आम्ही शक्ती कायदा आणणार? माझी सरकारकडे मागणी आहे की, याबाबत तातडीने विशेष अधिवेशन बोलवावं किंवा ते शक्य नसेल तर राज्यातील नराधमांच्या मुसक्या आवळण्यासाठी त्वरीत शक्ती कायद्याचा वटहुकूम काढावा असे रोहित पवार यांनी म्हटले आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम केले फेल

उत्तर गाजा : पेजर आणि वॉकी टॉकी मध्ये केमिकल...

नाशिकमध्ये भाजपला भगदाड!

नाशिक : प्रतिनिधी नाशिकमध्ये भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसला...

मलंगगडावरून पुन्हा वाद पेटणार?

मुंबई : मलंगगडावरून पुन्हा वाद पेटण्याची चिन्हं आहेत. मलंगगडावरून...

निवडणुकीचे विविध साहित्य, सामग्रीचे दर निश्चित

लातूर : प्रतिनिधी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत विविध राजकीय पक्ष, उमेदवार...

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
क्रिकेटच्या मैदानावर लातूरच्या मुलींची ऐतिहासिक एन्ट्री; धिरज देशमुख यांच्याकडून कौतुक!
01:46
Video thumbnail
श्वास रोखला अन् क्षणात घात झाला; जिममध्ये तरुणाचा दुर्दैवी मृत्यू
00:26
Video thumbnail
पाकिस्तान हादरलं! क्वेटा रेल्वे स्थानकाजवळ रेल्वेगाडीवर भीषण आत्मघाती हल्ला; २४ हून अधिक सैनिकांचा
00:55
Video thumbnail
स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच सावरखेड मार्गावर धावली एस.टी. बस; ग्रामस्थांचा पेढे वाटून जल्लोष!
01:46
Video thumbnail
BREAKING: ट्युशन एरिया केवळ उद्योगांसाठीच राखीव; नियमबाह्य व्यवसाय बंद करण्याचे आदेश, परिसर सामसूम!
02:20
Video thumbnail
NEET PEPAR LEAK|RCC क्लासेसवर पुन्हा CBI ची धाड;तपासाचा फास आणखी आवळला
01:54
Video thumbnail
मानवत तालुक्यात डिझेल भरण्यावरून दोन गटांत तुंबळ हाणामारी; कॅनने एकमेकांना झोडपले, व्हिडिओ व्हायरल!
00:49
Video thumbnail
जळकोट तालुक्यात एलपीजी गॅसचा तीव्र तुटवडा; सिलिंडरसाठी ग्राहकांच्या लांबच लांब रांगा
01:15
Video thumbnail
Shivraj motegavkar|मोटेगावकरची सोन्याची लंका; आदर्श कॉलनीत निर्माण होतंय शिश महल...
02:25
Video thumbnail
Latur|लातुरात मोकाट कुत्र्यांविरोधात गांधीगिरी आंदोलन;प्रभुराज प्रतिष्ठानचे अनोखे आंदोलन चर्चेत
02:15
Video thumbnail
Shivraj Motegavkar|NEET पेपरफुटी प्रकरणातील शिवराज मोटेगावकरचा नवा व्हिडिओ व्हायरल..
01:43
Video thumbnail
नांदेड आगारातून चक्क एसटी बस चोरीचा प्रयत्न; चालकाचे प्रसंगावधान, आरोपी गेटवरच जेरबंद
01:22
Video thumbnail
व्हाईट हाऊसजवळ अंदाधुंद गोळीबार; सुरक्षा दलांच्या प्रत्युत्तरात संशयित हल्लेखोर ठार, ट्रम्प सुरक्षित
01:46
Video thumbnail
निसर्गाची अद्भूत करणी! अवघ्या १२ फुटांवर लागलं पाणी
01:46
Video thumbnail
Nanded|नांदेडमध्ये भाजीपाल्याचे दर गगनाला;गृहिणींचे बजेट कोलमडले
02:05

Latest news