Homeमहाराष्ट्रशेतकरी दाम्पत्यावर अ‍ॅसिड हल्ला; नाशिकमधील धक्कादायक घटना

शेतकरी दाम्पत्यावर अ‍ॅसिड हल्ला; नाशिकमधील धक्कादायक घटना

नाशिक : प्रतिनिधी
जिल्ह्यातील येवला तालुक्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. देवळाणे येथील बोराडे वस्तीवर अज्ञात व्यक्तीने झोपेत असलेल्या दाम्पत्यावर अ‍ॅसिड फेकल्याची गंभीर घटना घडली आहे. या हल्ल्यात शेतकरी भाऊसाहेब बोराडे आणि त्यांच्या पत्नी कांता बोराडे गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर येवला येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे संपूर्ण येवला तालुक्यात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, भाऊसाहेब बोराडे आणि त्यांची पत्नी कांता बोराडे हे नेहमीप्रमाणे रात्रीच्या वेळी घराच्या टेरेसवर झोपले होते. मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने त्यांच्या अंगावर अचानक अ‍ॅसिड फेकले. अचानक झालेल्या या हल्ल्यात दोघेही गंभीर जखमी झाले. गंभीर अवस्थेत असलेल्या दाम्पत्याला तातडीने येवला येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR