जळकोट : प्रतिनिधी
जळकोट येथील जिल्हा परिषद प्रशालेमध्ये गणित व विज्ञान विषयाचे माध्यमिक शिक्षक म्हणून कार्यरत असणारे सुंदरम शिवाजी वांगस्कर (वय ३०) यांचा दुर्दैवी अपघाती मृत्यू झाला आहे जळकोट येथील जिल्हा परिषद प्रशालेमध्ये ते २२ मार्च २०२४ पासून माध्यमिक शिक्षक तसेच तंत्रस्रेही शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. सर्व शाळांना २ मे पासून सुट्ट्या लागलेल्या आहेत परंतु सुंदरम यांना जळकोट नगरपंचायत अंतर्गत जनगणनेचे काम लागलेले आहे . दि १६ पासून घर गणना सुरू झालेली आहे .
त्यांचे मूळ गाव मसला ता. लातूर हे असून ते जनगणनेचे काम करण्यासाठी जळकोटला दि १६ मे रोजी आलेले होते. दिवसभर जनगणनेचे काम करून परत लातूरकडे निघाले होते दुपारी २ वाजल्याच्या सुमारास चाकूरजवळ कार आणि ट्रक यांच्यामध्ये अपघात झाला. या अपघातामध्ये ते गंभीर जखमी झाले होते. लातूर येथील एका खाजगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू असताना दि २० मे रोजी त्यांची प्राणज्योत मावळली. त्यांच्या निधनामुळे शाळेतील शिक्षक तसेच त्यांचे मित्रपरिवार व विद्यार्थ्यांमध्ये शोककळा पसरलेली आहे. त्यांच्यावर त्यांच्या मूळ गावी शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
















