शेतकरी दुष्काळाच्या दहशतीत

पुणे : ‘एल निनो’च्या शक्यतेमुळे राज्यातील शेतक-यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर तातडीच्या उपाययोजना, त्यांची अंमलबजावणी आणि सर्वसमावेशक मदतीची अपेक्षा शेतक-यांकडून व्यक्त करण्यात येत आहे. ‘शिवार फाऊंडेशन’तर्फे शेतक-यांच्या मदतीसाठी तयार करण्यात आलेल्या हेल्पलाईनवर येणा-या ‘कॉल’च्या विश्लेषणात शेतक-यांची ही चिंता व्यक्त झाली आहे.

सहा महिन्यांपूर्वीचा महापुराचा फटका, आता दुष्काळाची शक्यता, यामुळे शेतकरी हवालदिल झाला असून मदतीसाठी संपर्क करणा-या शेतक-यांच्या संख्येमध्ये वाढ झाल्याचे निरीक्षण शिवार फाऊंडेशनकडून नोंदविण्यात आले. गेल्या चार महिन्यांत ‘शिवार हेल्पलाईन’वर संपर्क करणा-या शेतक-यांमध्ये ६२ टक्क्यांनी वाढ झाली असून एप्रिल महिन्यात १ हजार ५९८ शेतक-यांनी मदतीसाठी संपर्क केला आहे. जानेवारी महिन्यात ही संख्या ९८२ इतकी होती. तर फेब्रुवारी महिन्यात १ हजार १९५, मार्चमध्ये १ हजार २७६ शेतक-यांनी दुष्काळाबद्दल चिंता व्यक्त केल्याची माहिती
‘फाऊंडेशन’कडून देण्यात आली.

‘शिवार फाऊंडेशन’चे प्रमुख विनायक हेगाना म्हणाले, ‘काही भागांत अवकाळी पाऊस आणि गारपिटीने शेतक-यांना नुकतेच झोडपले. त्यामुळे अजूनही आर्थिक घडी विस्कळीत आहे. त्यात ‘एल निनो’मुळे निर्माण झालेली दुष्काळाची शक्यता शेतक-यांना आर्थिक, सामाजिक आणि मानसिकदृष्ट्या खचवणारी आहे. त्याला आधाराची, विश्वासाची गरज आहे. त्यासाठी शिवार हेल्पलाईनच्या माध्यमातून काम करत आहोत. या हेल्पलाईनवर संपर्क करणा-या शेतक-यांना समुपदेशनाबरोबरच त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी उपाय सुचवले जातात, त्यांना मदत केली जाते. त्यासाठी ८९५५७ ७१११५ या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क करावा, असे आवाहनही हेगाना यांनी केले.

‘एल निनो’ म्हणजे काय ?
‘एल निनो’ ही पॅसिफिक महासागराशी संबंधित नैसर्गिक हवामान प्रक्रिया आहे. मध्य आणि पूर्व पॅसिफिकमधील समुद्राच्या पाण्याचे तापमान जेव्हा सामान्यपेक्षा जास्त वाढते, तेव्हा वातावरणातील वा-यांचे प्रवाह, ढगांची निर्मिती आणि पावसाचे चक्र बदलते. हा बदल दिसायला लहान असला, तरी त्याचा परिणाम संपूर्ण जगाच्या हवामान प्रणालीवर होतो. काही ठिकाणी दुष्काळ, तर काही ठिकाणी अतिवृष्टी आणि पूरस्थिती निर्माण होते.

कोणत्या महिन्यात किती कॉल
महिना संपर्क करणारे शेतकरी
जानेवारी ९८२
फेब्रुवारी १,१९५
मार्च १,२७६
एप्रिल १,५९८

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम केले फेल

उत्तर गाजा : पेजर आणि वॉकी टॉकी मध्ये केमिकल...

नाशिकमध्ये भाजपला भगदाड!

नाशिक : प्रतिनिधी नाशिकमध्ये भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसला...

निवडणुकीचे विविध साहित्य, सामग्रीचे दर निश्चित

लातूर : प्रतिनिधी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत विविध राजकीय पक्ष, उमेदवार...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur|लातूर कृषी महाविद्यालयात दुर्मिळ वनौषधी बीज बँकेचे उद्घाटन; ५०० हून अधिक वनस्पतींचे संवर्धन!
03:01
Video thumbnail
Latur|लातूरचे कृषी महाविद्यालय बनले ऑक्सिजन हब;महाविद्यालय परिसरात तब्बल २ लाख वृक्षांचे संवर्धन
03:25
Video thumbnail
Latur|आर्ट ऑफ लिव्हिंगचा साडेतीन लाख वृक्षलागवडीचा संकल्प; विद्यार्थ्यांच्या हस्ते मोहिमेचा शुभारंभ!
01:41
Video thumbnail
Latur|घरात घुसलेल्या पाण्याने संसार उद्ध्वस्त;महामार्ग विभागाच्या निष्काळजीपणाचा आरोप
01:28
Video thumbnail
Latur|लातुरात १० हजार झाडांचा १० वा वाढदिवस; जागतिक पर्यावरण दिन उत्साहात साजरा!
04:33
Video thumbnail
Nanded|उमेदवारी बदलल्यानंतर सुमठाणकरांची सोशल मीडियावर नाराजी?
01:00
Video thumbnail
'विप्रो'च्या माजी महिला अधिकाऱ्याचा इस्लाम स्वीकारण्यासाठी छळ केल्याचा आरोप
01:30
Video thumbnail
नोएडामध्ये थरार! हायराईज सोसायटीच्या १२ व्या मजल्यावर भीषण आग; अनेक फ्लॅट्सना आगीचा विळखा
00:55
Video thumbnail
'पेड्डी' चित्रपटाच्या यशासाठी जान्हवी कपूर तिरुपतीच्या चरणी; ३,५५० पायऱ्या चढून पूर्ण केली नवसपूर्ती
00:58
Video thumbnail
Nanded|काँग्रेसचा उमेदवार असता तर माघार घेतली असती; उबाठाला जागा सुटल्याने निवडणूक लढणार– इंगोले
01:20
Video thumbnail
जळकोट तालुक्यात वादळी वाऱ्यासह मान्सूनपूर्व पावसाची हजेरी; वातावरणात पसरला गारवा
00:49
Video thumbnail
Latur|आमदार पुत्र ऋषिकेश कराड यांच्यावर जमीन खोदल्याचा आरोप; शेतकऱ्याची पोलीस अधीक्षकांकडे तक्रार!
05:03
Video thumbnail
Nanded|प्रवीण पाटील चिखलीकर यांची विधान परिषद निवडणुकीतून माघार
08:45
Video thumbnail
Nanded|नांदेड विधान परिषद निवडणुकीतून माधवराव पाटील जवळगावकर यांची माघार
02:21
Video thumbnail
Nanded|अर्धापुरात दमदार पावसाची हजेरी; उकाड्यापासून नागरिकांना दिलासा
01:16

Latest news