भाजपा सरकारकडून ‘अच्छे दिन’चे स्वप्न धुळीस

अहमदपूर : रविकांत क्षेत्रपाळे
भाजपा सरकारने सर्वांसह शेतक-यांना अच्छे दिन येणार म्हणून स्वप्न दाखवले. अच्छे दिन येणार म्हणून कोपराला गुळ लावला पण नागरिक व शेतक-यांना अच्छे दिन दाखविण्याऐवजी भयंकर महागाईच्या खाईत लोटल्याचे दिसून येत आहे. जनता म्हणत आहे हे मायबाप सरकार अच्छे दिन नको आम्हाला पूर्वीचे कॉंग्रेस सरकारचे दिवस खूप चांगले असल्याचे सांगत आहे.
आज प्रत्येक वस्तूचे भाव गगनाला भिडले आहेत. पूर्वी थोड्या पैशात पिशवी भरून माल बाजारातून आणत होतो. आता पिशवी भरून रुपये घेऊन गेलो तरी पिशवीत आणलेला माल दिसत नाही. कापडे, किराणा साहित्य, चप्पल, वह्या, पुस्तके, पेन,  बॅग, शाळेची फीस, प्रवास, हॉटेलचे खाणे, पेट्रोल, डिझेल, खते, बी -बियाणे, शेतीची अवजारे, फवारणीची औषधे, नांगरणी, पाळी, पेरणी करणे, दाढी कटिंग, वाहन खरेदी, कपडे शिलाई, बूट, चप्पल पॉलिश, रोजगार आदींसह सर्वच वस्तूंचे भाव आकाशाला भिडले आहेत. सोन्याचे भाव तर विचारायची हिंमतच होत नाही. मग हे भाजपा सरकारचे अच्छे दिन म्हणायचे काय अशी चर्चा नागरिक करताना ऐकावयास मिळते आहे. देशाचे पंतप्रधान म्हणतात पेट्रोल- डिझेलचा वापर कमी करा. सोने खरेदी करू नका. भावाच्या वाटणीमुळे शेतक-यांच्या जमिनीचे तुकडे पडले आहेत.
अनेकांकडे दोन ते पाच एकरपर्यंत जमिनी आहेत. अशा शेतक-यांना एक ते दीड लाखाचे बैल सांभाळण्यासाठी तसेच १ लाख साठ ते सत्तर हजारांचा सालगडी ठेवणे परवडत नाही. मग शेतक-यांनी जमीन नांगरायची कशी, पेरणी कशी करायची, देश दिवसेंदिवस यांत्रिकीकरणाकडे वळत आहे. यासाठी ट्रॅक्टरला डिझेल शिवाय जमत नाही, डिझेल मिळत नाही आणि पंतप्रधान म्हणतात डिझेल वापरू नका. शेतक-यांनी शेती कशी करायची हे सरकारने सांगणे आवश्यक आहे. या सरकारने शेतक-यांची अवस्था मरू नये आणि वाचूही नये अशी वाईट करून ठेवली आहे.
      शेतक-यांनी आपल्या शेतात सोयाबीन, तूर, कापूस आणि रब्बीमध्ये गहू ,हरभरा ,बडी ज्वारी, हायब्रीड ज्वारीची पेरणी केली होती. नांगरणी, कोळपणी, धसकट वेचणी, तुराटी वेचणी खर्च ,बी बियाणे, खते, फवारणीचे औषध, फवारणी करणे, सोयाबीन ,तूर कापणी करण्यासाठी गुत्ते देणे, रास करणे, वाहतुकीचा खर्च हे सर्व शेतक-यांनी केले. शेतीचा खर्च अधिक वाढला आहे आणि भाव कमी मिळाल्यामुळे शेतक-यांचे नुकसान अधिक होत आहे. शेतक-यांनी भाव वाढेल म्हणून माल न विकता एप्रिलपर्यंत घरी ठेवला पण भाव वाढ झाली नाही. शेवटी घर प्रपंचाच्या अडचणीमुळे शेतक-यांना कमी भावात आपला माल विकून टाकावा लागला.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur|१ ऑगस्टपर्यंत आरक्षण उपवर्गीकरण जाहीर करा; मातंग समाजाचा इशारा
05:28
Video thumbnail
Latur|किड्स इन्फो पार्कजवळ एसटी आणि स्कूल बसचा अपघात; काही जण किरकोळ जखमी!
00:40
Video thumbnail
Latur|वाहतूक कोंडीला ब्रेक लावण्यासाठी लातुरात मोठा ड्राइव्ह; अतिक्रमणावर कारवाई सुरू!
02:58
Video thumbnail
Nanded|डिजिटल अरेस्टच्या नावाने सायबर ठगांचा नवा डाव; नांदेडमध्ये ५१ लाखांची फसवणूक
03:31
Video thumbnail
Latur|आरक्षणाच्या मुद्द्यावर नगरसेवकही रस्त्यावर; महामोर्चात सक्रिय सहभाग!
03:13
Video thumbnail
Latur|आरक्षण उपवर्गीकरणासाठी लातूरमध्ये हजारोंचा एल्गार; महामोर्चाला मोठा प्रतिसाद!
03:32
Video thumbnail
CJP Protest|विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा इम्पॅक्ट? शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा
12:07
Video thumbnail
Latur|लातुरात गोर बंजारा कवींचा जल्लोष; मंत्री संजय राठोड यांच्या हस्ते कवी संमेलनाचे उद्घाटन!
00:43
Video thumbnail
Latur|मराठवाड्याच्या वीर सुपुत्राला मानवंदना; पानगावात कारगिल शहीद बालाजी माले यांचे स्मरण!
01:11
Video thumbnail
Latur|विठुरायाच्या भक्तांसाठी मनसेची सेवा; अन्नछत्रासह मोफत आरोग्य तपासणी!
02:53
Video thumbnail
Parbhani|शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची घोषणा? परभणीत आंदोलकांचा जल्लोष!
02:47
Video thumbnail
Latur|माळरानावर फुलवलं नंदनवन! निवृत्त पोलिसाची शेती पाहून तुम्हीही थक्क व्हाल
03:43
Video thumbnail
Latur|सोमवारी लातूरमध्ये महामोर्चा; आरक्षण उपवर्गीकरणासाठी मातंग समाजाचा एल्गार!
04:30
Video thumbnail
Dharmendra Pradhan|NEET पेपरफुटीचा मोठा परिणाम? धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा!
01:30
Video thumbnail
Latur|विठ्ठलनामाच्या गजरात महिला वारकऱ्यांची पायी वारी; शिवणी ते झळकवाडी भक्तिमय सोहळा!
00:42

Latest news