नेपाळमध्ये २०० आणि ५०० रुपयांच्या भारतीय नोटांना परवानगी

काठमांडू : नेपाळने भारतीय आणि नेपाळी नागरिकांना २०० आणि ५०० रुपयांच्या भारतीय नोटा देशात आणण्याची किंवा बाहेर नेण्याची परवानगी दिली आहे. यामुळे २०१६ च्या नोटाबंदीनंतर लागू असलेली आणि केवळ १०० रुपयांपर्यंतच्या नोटांना परवानगी देणारी जवळपास दशकभराची बंदी संपुष्टात आली आहे.

नेपाळ राष्ट्र बँकेने गुरुवारी पुन्हा जारी केलेल्या एका सूचनेत म्हटले आहे की, विद्यमान नियमांनुसार भारतीय आणि नेपाळी नागरिक ९ नोव्हेंंबर २०१६ रोजी किंवा त्यानंतर जारी केलेल्या २०० आणि ५०० रुपयांच्या भारतीय नोटा, प्रति व्यक्ती २५,००० रुपयांच्या मर्यादेपर्यंत सोबत बाळगू शकतात.आवश्यक नियम तयार केल्यानंतर ११ फेब्रुवारी रोजी नेपाळच्या राजपत्रामध्ये (गॅझेट) प्रकाशित सूचनेद्वारे या तरतुदींची माहिती आधीच देण्यात आली होती; तरीही, नियमांची पुन्हा आठवण करून देण्यासाठी आणि त्यांच्या अंमलबजावणीबाबत स्पष्टता आणण्यासाठी एनआरबीने ही सूचना पुन्हा जारी केली.

नेपाळी नागरिकांनाही भारतीय चलनाबाबत नियम लागू
नवीन नियमांचे स्पष्टीकरण देताना ठफइ चे प्रवक्ते गुरु प्रसाद पौडेल यांनी शनिवारी सांगितले की, नेपाळी नागरिक भारताव्यतिरिक्त इतर कोणत्याही देशातून नेपाळमध्ये भारतीय चलन आणू शकत नाहीत. तसेच, ते नेपाळमधून भारताव्यतिरिक्त तिस-या देशात भारतीय चलन नेऊ शकत नाहीत.त्यांनी सांगितले की, या सुधारित तरतुदीमुळे नेपाळला भेट देणा-या भारतीय पर्यटकांना आणि भारतासोबत व्यापार व व्यवसाय करणा-या नेपाळी नागरिकांना सोयीचे ठरेल.

परदेशी पर्यटकांना ५,००० अमेरिकन डॉलर्सचा नियम
सूचनेत असेही म्हटले आहे की, नेपाळी नागरिक आणि परदेशी पर्यटक ५,००० अमेरिकन डॉलर्स किंवा इतर परकीय चलनातील त्यास सममूल्य रक्कम कोणत्याही कस्टम्स डिक्लेरेशनशिवाय (सीमाशुल्क घोषणा) नेपाळमध्ये आणू शकतात.५,००० अमेरिकन डॉलर्सपेक्षा जास्त रक्कम असल्यास, नेपाळमध्ये आगमन झाल्यावर कस्टम्स विभागाकडे त्याची घोषणा करणे आवश्यक आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur|१ ऑगस्टपर्यंत आरक्षण उपवर्गीकरण जाहीर करा; मातंग समाजाचा इशारा
05:28
Video thumbnail
Latur|किड्स इन्फो पार्कजवळ एसटी आणि स्कूल बसचा अपघात; काही जण किरकोळ जखमी!
00:40
Video thumbnail
Latur|वाहतूक कोंडीला ब्रेक लावण्यासाठी लातुरात मोठा ड्राइव्ह; अतिक्रमणावर कारवाई सुरू!
02:58
Video thumbnail
Nanded|डिजिटल अरेस्टच्या नावाने सायबर ठगांचा नवा डाव; नांदेडमध्ये ५१ लाखांची फसवणूक
03:31
Video thumbnail
Latur|आरक्षणाच्या मुद्द्यावर नगरसेवकही रस्त्यावर; महामोर्चात सक्रिय सहभाग!
03:13
Video thumbnail
Latur|आरक्षण उपवर्गीकरणासाठी लातूरमध्ये हजारोंचा एल्गार; महामोर्चाला मोठा प्रतिसाद!
03:32
Video thumbnail
CJP Protest|विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा इम्पॅक्ट? शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा
12:07
Video thumbnail
Latur|लातुरात गोर बंजारा कवींचा जल्लोष; मंत्री संजय राठोड यांच्या हस्ते कवी संमेलनाचे उद्घाटन!
00:43
Video thumbnail
Latur|मराठवाड्याच्या वीर सुपुत्राला मानवंदना; पानगावात कारगिल शहीद बालाजी माले यांचे स्मरण!
01:11
Video thumbnail
Latur|विठुरायाच्या भक्तांसाठी मनसेची सेवा; अन्नछत्रासह मोफत आरोग्य तपासणी!
02:53
Video thumbnail
Parbhani|शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची घोषणा? परभणीत आंदोलकांचा जल्लोष!
02:47
Video thumbnail
Latur|माळरानावर फुलवलं नंदनवन! निवृत्त पोलिसाची शेती पाहून तुम्हीही थक्क व्हाल
03:43
Video thumbnail
Latur|सोमवारी लातूरमध्ये महामोर्चा; आरक्षण उपवर्गीकरणासाठी मातंग समाजाचा एल्गार!
04:30
Video thumbnail
Dharmendra Pradhan|NEET पेपरफुटीचा मोठा परिणाम? धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा!
01:30
Video thumbnail
Latur|विठ्ठलनामाच्या गजरात महिला वारकऱ्यांची पायी वारी; शिवणी ते झळकवाडी भक्तिमय सोहळा!
00:42

Latest news