दिल्लीत आंदोलनस्थळी अन्न पुरवणारे मोहम्मद जुनैद पोलिसांच्या ताब्यात?

नवी दिल्ली : दिल्लीत कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनावेळी मोफत अन्न वाटप करणा-या मोहम्मद जुनैद यांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतले होते, असा आरोप जुनैद यांनी स्वत: केला आहे. यानंतर जुनैद यांना सीजेपीकडून कायदेशीर मदत मिळत नसल्याचा दावा करणारे अनेक व्हीडीओ सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागले आहेत. याप्रकरणी आता सीजेपीच्या प्रवक्त्या रत्ना सिंह यांनी स्पष्टीकरण दिले आहे. मोहम्मद जुनैद यांच्याबाबत पसरवल्या जाणा-या बातम्या आणि अफवा खोट्या आहेत, असे सिंह यांनी म्हटले आहे.

कॉक्रोच जनता पार्टीच्या जंतर मंतरवरील आंदोलनावेळी मोहम्मद जुनैद यांनी आंदोलकांना मोफत अन्न वाटप केले होते. जुनैद यांच्या या कृतीचे देशात सर्वत्र कौतुक झाले. दरम्यान, जुनैद यांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतले होते, असे त्यांनी सांगितल्यानंतर सीजेपीकडून सहकार्य होत नसल्याचे आरोप देखील होऊ लागले आहेत. यावर सीजेपीकडून स्पष्टीकरण देण्यात आले आहे. मोहम्मद जुनैद यांच्याबाबत पसरवल्या जाणा-या बातम्या आणि अफवा खोट्या आहेत. जुनैद सुखरुप आहेत आणि त्यांना सर्व आवश्यक कायदेशीर मदत पुरवली जात आहे. सर्व स्वयंसेवक थोड्या वेळापूर्वच एकत्र जमले होते, तिथेही ते हजर होते असे सिंह यांनी पोस्ट करुन स्पष्टीकरण दिले आहे.

जुनैद यांच्या नातेवाईकांनाही ताब्यात घेतल्याचा दावा
चुकीची माहिती पसरवू नका असे आम्ही सर्वांना आवाहन करतो, त्यांच्या घरावर करण्यात आलेल्या कारवाईची आम्ही तात्काळ दखल घेतली होती. आम्ही नेहमीच जुनैद यांना खूप आदराने वागवले आहे आणि आम्ही कायमच त्यांच्यासोबत (आणि इतर स्वयंसेवकांच्या) उभे राहू असे रत्ना सिंह यांनी म्हटले आहे. दरम्यान, सीजेपीच्या गाझियाबादमधील एका आंदोलकाने जुनैद यांच्या कुटुंबीयांना पोलिसांनी गाझियाबादमध्ये ताब्यात घेतले आणि मेरठमध्ये त्याच्या नातेवाईकांचा छळ केल्याचा आरोप केला आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur|१ ऑगस्टपर्यंत आरक्षण उपवर्गीकरण जाहीर करा; मातंग समाजाचा इशारा
05:28
Video thumbnail
Latur|किड्स इन्फो पार्कजवळ एसटी आणि स्कूल बसचा अपघात; काही जण किरकोळ जखमी!
00:40
Video thumbnail
Latur|वाहतूक कोंडीला ब्रेक लावण्यासाठी लातुरात मोठा ड्राइव्ह; अतिक्रमणावर कारवाई सुरू!
02:58
Video thumbnail
Nanded|डिजिटल अरेस्टच्या नावाने सायबर ठगांचा नवा डाव; नांदेडमध्ये ५१ लाखांची फसवणूक
03:31
Video thumbnail
Latur|आरक्षणाच्या मुद्द्यावर नगरसेवकही रस्त्यावर; महामोर्चात सक्रिय सहभाग!
03:13
Video thumbnail
Latur|आरक्षण उपवर्गीकरणासाठी लातूरमध्ये हजारोंचा एल्गार; महामोर्चाला मोठा प्रतिसाद!
03:32
Video thumbnail
CJP Protest|विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा इम्पॅक्ट? शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा
12:07
Video thumbnail
Latur|लातुरात गोर बंजारा कवींचा जल्लोष; मंत्री संजय राठोड यांच्या हस्ते कवी संमेलनाचे उद्घाटन!
00:43
Video thumbnail
Latur|मराठवाड्याच्या वीर सुपुत्राला मानवंदना; पानगावात कारगिल शहीद बालाजी माले यांचे स्मरण!
01:11
Video thumbnail
Latur|विठुरायाच्या भक्तांसाठी मनसेची सेवा; अन्नछत्रासह मोफत आरोग्य तपासणी!
02:53
Video thumbnail
Parbhani|शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची घोषणा? परभणीत आंदोलकांचा जल्लोष!
02:47
Video thumbnail
Latur|माळरानावर फुलवलं नंदनवन! निवृत्त पोलिसाची शेती पाहून तुम्हीही थक्क व्हाल
03:43
Video thumbnail
Latur|सोमवारी लातूरमध्ये महामोर्चा; आरक्षण उपवर्गीकरणासाठी मातंग समाजाचा एल्गार!
04:30
Video thumbnail
Dharmendra Pradhan|NEET पेपरफुटीचा मोठा परिणाम? धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा!
01:30
Video thumbnail
Latur|विठ्ठलनामाच्या गजरात महिला वारकऱ्यांची पायी वारी; शिवणी ते झळकवाडी भक्तिमय सोहळा!
00:42

Latest news