ट्रम्प यांचा इराणला महाभयंकर इशारा; “आमचा संयम सुटला तर जगात इराणचे अस्तित्वच शिल्लक राहणार नाही!”

वॉशिंग्टन/तेहरान: पश्चिम आशियामध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली असून अमेरिका आणि इराणमधील तणाव आता शिगेला पोहोचला आहे. अवघ्या दोन आठवड्यांपूर्वी झालेल्या शांतता कराराला केराची टोपली दाखवत इराणने व्यापारी जहाजांवर पुन्हा ड्रोन हल्ले केले होते. या कारवाईला अमेरिकेने अत्यंत आक्रमक प्रत्युत्तर दिले आहे. अमेरिकन हवाई दलाच्या विमानांनी इराणच्या लष्करी तळांवर आणि किनारपट्टीवरील रडार यंत्रणांवर सलग दुसऱ्या दिवशी भीषण बॉम्बहल्ला केला. या लष्करी कारवाईनंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी थेट इराणचे अस्तित्वच संपवून टाकण्याचा इशारा दिला आहे, तर इराणनेही अमेरिकेला चोख प्रत्युत्तर देण्याची भाषा केली आहे.

शांतता करार हवेतच विरला; ‘होर्मुझ’जवळ पुन्हा धुमश्चक्री
अमेरिका आणि इराणमध्ये नुकताच एक सामंजस्य करार झाला होता, मात्र हा करार केवळ कागदावरच राहिल्याचे दिसत आहे. गुरुवारी ‘M/V Ever Lovely’ या मालवाहू जहाजावर हल्ला झाल्यानंतर, शनिवारी ‘होर्मुझच्या सामुद्रधुनी’जवळ पनामाचा ध्वज असलेल्या ‘एमटी किकू’ या तेलवाहू जहाजावर इराणने आत्मघातकी ड्रोन डागला. या जहाजात तब्बल २० लाख बॅरलहून अधिक कच्चे तेल होते. या हल्ल्यामुळे संतप्त झालेल्या अमेरिकेने तात्काळ इराणवर लष्करी कारवाईचे आदेश दिले.

अमेरिकन सेंट्रल कमांडने दिलेल्या माहितीनुसार, इराणला शांतता कराराचा आदर करण्याची संधी देण्यात आली होती, मात्र त्यांनी ती नाकारली. म्हणूनच राष्ट्राध्यक्षांच्या थेट आदेशानंतर इराणमधील क्षेपणास्त्र, ड्रोन साठवणूक केंद्रे आणि किनारपट्टीवरील रडार तळांना लक्ष्य करण्यात आले आहे. इराणी माध्यमांच्या हवाल्याने ‘रॉयटर्स’ने दिलेल्या वृत्तानुसार, दक्षिण इराणमधील ‘सिरिक बेट’ आणि ‘केश्म बेटा’वरील एका गावामध्ये अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे प्रचंड स्फोटांचे आवाज ऐकू आले.

“इराणचे अस्तित्व मिटवून टाकू!” – डोनाल्ड ट्रम्प यांची थेट धमकी
हल्ल्यानंतर काही मिनिटांतच राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ‘ट्रुथ सोशल’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करत इराणला गंभीर परिणामांची धमकी दिली. ट्रम्प यांनी लिहिले,

“इराणने पुन्हा एकदा शांतता कराराचे उल्लंघन केले आहे. म्हणूनच अमेरिकन लष्कराने त्यांच्या क्षेपणास्त्र आणि ड्रोन तळांवर हल्ले केले. हे लोक कधीच सुधारणार नाहीत असे दिसतेय! एकवेळ अशी येईल जेव्हा आमचा संयम सुकेल आणि आम्ही सुरू केलेले लष्करी अभियान पूर्ण करण्यास आम्ही भाग पडू. जर असे घडले, तर जगात ‘इस्लामिक रिपब्लिक ऑफ इराण’चे अस्तित्वच शिल्लक राहणार नाही!”

“हिंसेचे उत्तर हिंसेनेच दिले जाईल” – जे. डी. व्हान्स
दुसरीकडे, अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जे. डी. व्हान्स यांनीही इराणला खडे बोल सुनावले आहेत. “आम्ही कराराचे पालन केले. जर काही मतभेद होते, तर फोनवर चर्चा करायला हवी होती. पण हिंसेचे उत्तर हिंसेनेच दिले जाईल,” असे व्हान्स यांनी स्पष्ट केले. होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जाणाऱ्या मालवाहू जहाजावर इराणने ड्रोन हल्ला केल्यामुळे अमेरिकेने ही थेट कारवाई केल्याचे त्यांनी सांगितले.

इराणचा पलटवार: अमेरिकेला ‘जशास तसे’ उत्तर देणार!
अमेरिकेच्या या आक्रमक पवित्र्यामुळे इराण देखील मागे हटलेला नाही. इराणच्या बलाढ्य ‘इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स’ने (IRGC) या हल्ल्याचा तीव्र निषेध करत, या भागातील अमेरिकेच्या लष्करी तळांना लक्ष्य केल्याचा दावा केला आहे. इराणने अमेरिकेला ‘जशास तसे’ उत्तर देणार असल्याचे म्हटले असले, तरी अमेरिकेच्या नेमक्या कोणत्या तळांचे नुकसान झाले, याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.

जागतिक तेल पुरवठ्यावर संकट?
या ताज्या संघर्षामुळे ‘होर्मुझची सामुद्रधुनी’ पुन्हा एकदा युद्धाच्या केंद्रस्थानी आली आहे. हा जगातील सर्वात महत्त्वाचा सागरी व्यापारी मार्ग मानला जातो, जिथून जगातील एकूण तेल पुरवठ्याचा मोठा हिस्सा वाहतूक केला जातो. त्यामुळे या संघर्षामुळे जागतिक तेल पुरवठ्यावर संकट येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

राजकीय आरोप-प्रत्यारोप
इराणचे उपपरराष्ट्र मंत्री काझम घारीबाबाबादी यांनी अमेरिकेच्या भूमिकेवर टीका करताना म्हटले आहे की, “इराणचा किनारी देश म्हणून असलेला हक्क डावलून या सागरी मार्गाची सुरक्षा सुनिश्चित करता येऊ शकत नाही.” तर इराणच्या संसदीय सुरक्षा समितीचे प्रमुख इब्राहिम अझीझी यांनी डोनाल्ड ट्रम्प यांना ‘अयशस्वी राष्ट्राध्यक्ष’ संबोधत, “या कराराच्या उल्लंघनामुळे शेवटी अमेरिकेलाच माघार घ्यावी लागेल आणि पश्चाताप करावा लागेल,” असा इशारा दिला आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

नाशिकमध्ये भाजपला भगदाड!

नाशिक : प्रतिनिधी नाशिकमध्ये भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसला...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

पर्यावरण संरक्षण कायदा ठरतोय कुचकामी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था गेल्या काही दिवसांपासून दिल्लीतील वातावरण गढूळ...

द्वारकादास शामकुमारतर्फे १८०० वारक-यांची विनामूल्य पंढरपूर वारी 

लातूर : प्रतिनिधी आषाढी एकादशीनिमित्त गेली १५ वर्षांपासुन द्वारकादास शामकुमार...

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Rain Update|लातूरमध्ये मुसळधार पावसाची दमदार बॅटिंग; उकाड्यापासून दिलासा
02:33
Video thumbnail
Latur Railway Update|खासदार शिवाजी काळगे यांचा मोठा दावा; लवकरच नवी लातूर–मुंबई रेल्वे
02:16
Video thumbnail
लातुरात विजांच्या कडकडाटासह पावसाची जोरदार हजेरी #marathilivenews #maharashtranews
03:01
Video thumbnail
Babasaheb patil on karjmukti|कर्जमाफीवर अखेर सरकारचं मौन तुटलं; सहकार मंत्र्यांचा मोठा दावा!
03:53
Video thumbnail
Latur|लातूरच्या नाट्यप्रेमींसाठी गुड न्यूज! नाट्यगृहाचे काम पुन्हा मार्गी
03:19
Video thumbnail
TET परीक्षा पेपरफुटीच्या निषेधार्थ परभणीत अभाविपचे तीव्र आंदोलन #marathilivenews
00:10
Video thumbnail
खासदार संजय जाधव यांनी पक्ष सोडल्यानंतर परभणीत उद्धव ठाकरे यांचं जंगी स्वागत #marathilivenews
00:53
Video thumbnail
LIVE-बंडखोरी नंतर उद्धव ठाकरे यांची यवतमाळ येथून पहिली जाहीर सभा
45:42
Video thumbnail
Latur|शेतकऱ्यांच्या पीकविम्यावरून शिवसेना आक्रमक; आंदोलनाचा इशारा
05:07
Video thumbnail
Latur|अवैध दारूविरोधात महिलांचा एल्गार; विक्रेत्याच्या घरात घुसून मारहाण!
03:05
Video thumbnail
Latur|लातूर DPC बैठकीत अनेक अधिकारी गैरहजर;पालकमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना कारवाईचे आदेश
02:53
Video thumbnail
LIVE-बंडखोरी नंतर उद्धव ठाकरे यांची यवतमाळ येथून पहिली जाहीर सभा
00:00
Video thumbnail
Latur|आरक्षण उपवर्गीकरणावरून लातूरमध्ये एल्गार; ६ जुलैला भव्य मोर्चा!
10:13
Video thumbnail
महाराष्ट्रातील या जिल्ह्यात होणार मुसळधार पाऊस;हवामान तज्ज्ञ पंजाब डक यांचा अंदाज
04:03
Video thumbnail
Latur|अवैध दारू विक्री करणारा ढाबा संतप्त नागरिकांनी जाळला
04:42

Latest news