बस दरीत कोसळून ४० ठार

लाहोर : पाकिस्तानमध्ये शुक्रवारी पहाटे भीषण अपघात झाला. त्यानंतर बलुचिस्तान आणि खैबर पख्तुनख्वा प्रांतांच्या सीमेलगत असलेल्या दान सर परिसरामध्ये प्रवाशांनी भरलेली बस खोल दरीत कोसळली. यामध्ये ४० जणांचा मृत्यू झाला असून अनेकजण जखमी झाले आहेत. अलीकडील काळातील पाकिस्तानमधील हा सर्वात भीषण बस अपघातांपैकी एक मानला जात आहे. बस भरधाव वेगाने जात असताना चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. त्यानंतर बस महामार्गावरून घसरून दरीत कोसळली. अपघाताची माहिती मिळताच बचाव पथके घटनास्थळी दाखल झाली आणि जखमींना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

बलुचिस्तान सरकारचे प्रवक्ते शाहिद रिंद यांनी सांगितले की, अपघातग्रस्त बसमध्ये क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी होते. मूळ बसमधील प्रवाशांबरोबरच बिघाड झालेल्या दुस-या बसमधील प्रवाशांनाही या बसमध्ये बसवण्यात आले होते. त्यामुळे बसमध्ये मोठी गर्दी झाली होती असे वृत्त आहे. सध्या मृतांची ओळख पटवण्याचे काम सुरू असून अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी प्रशासनाने चौकशी सुरू केली आहे. या दुर्घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून, पाकिस्तानातील रस्ते सुरक्षेच्या व्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

द्वारकादास शामकुमारतर्फे १८०० वारक-यांची विनामूल्य पंढरपूर वारी 

लातूर : प्रतिनिधी आषाढी एकादशीनिमित्त गेली १५ वर्षांपासुन द्वारकादास शामकुमार...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Nanded|नांदेडमध्ये दिवसाढवळ्या फिल्मी स्टाईल चोरी; ४ लाख लंपास
01:07
Video thumbnail
Tukaram Munde LIVE :दूध उद्योगावर मोठी कारवाई? मुंढेंचे स्पष्ट संकेत
00:00
Video thumbnail
Tukaram Munde LIVE :दूध उद्योगावर मोठी कारवाई? मुंढेंचे स्पष्ट संकेत
36:07
Video thumbnail
Latur|लातूरवर पाणीसंकटाचे सावट; १३५ गावांचा पर्यायी पाणीपुरवठ्यावर आधार
03:21
Video thumbnail
Latur|घोणशी गावात तरुणाचे विद्युत खांबावर चढून आंदोलन
01:02
Video thumbnail
उत्तर प्रदेशातील कौशांबी येथे भीषण अपघात: एलपीजी टँकरचा स्फोट होऊन ४ जणांचा मृत्यू
01:51
Video thumbnail
Latur|स्मार्ट वीज मीटरवरून मनसे आक्रमक; किल्लारीत जोरदार आंदोलन!
04:33
Video thumbnail
LIVE | महाराष्ट्र विधानसभा पावसाळी अधिवेशन 2026 |Maharashtra Assembly Monsoon Session LIVE
01:38:10
Video thumbnail
Latur|लातूरमध्ये अतिक्रमण हटाव मोहीम; जेसीबीची धडक कारवाई
04:10
Video thumbnail
Latur| अखेर शेतकऱ्याला परत मिळाली बैलजोडी!
04:27
Video thumbnail
शिवसेना UBT प्रमुख उद्धव ठाकरे यांची स्फोटक पत्रकार परिषद लाईव्ह
08:29
Video thumbnail
LIVE- विधानसभा पावसाळी अधिवेशन लाइव्ह प्रेक्षपण
23:47
Video thumbnail
लातूर-उदगीर महामार्गावर भीषण तिहेरी अपघात; कार, ऑटो आणि दुचाकीच्या धडकेत तिघे गंभीर जखमी
00:53
Video thumbnail
LIVE- विधानसभा पावसाळी अधिवेशन लाइव्ह प्रेक्षपण
04:50:10
Video thumbnail
Latur Traffic Issue|रस्ते बंद करूनही कोंडी कायम? लातूरच्या ट्रॅफिकचा प्रश्न ऐरणीवर
03:00

Latest news