अहमदाबाद : गुजरात एटीएसने दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मद (खीट) च्या आठ दहशतवाद्यांना गुजरात आणि मध्य प्रदेशातून पकडले आहे. एटीएसनुसार, ते गुजरातमध्ये खीट चे एक सक्रिय नेटवर्क तयार करण्याचे काम करत होते जेणेकरून दहशतवादी कारवाया करता येतील. एटीएसने त्यांची चौकशी सुरू केली आहे.
एटीएसने या सर्वांविरुद्ध राष्ट्रविरोधी कारवाया आणि दहशतवादी नेटवर्कशी संबंधित असल्याच्या गंभीर आरोपांवर पुढील कायदेशीर तपास आणि सखोल चौकशी केली आहे. अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्यांमध्ये अहमद अब्दुल्ला गाजीवाला, इब्राहिम मोहम्मद हुसेन घाघा, मुदस्सिर अब्दुल्ला गाजीवाला, जकारिया दुर्रानी, मुफ्ती फौजान, मोहम्मद अमीन शेरा, मोहम्मद अब्दुल रहमान सौदा आणि बिलाल मोहम्मद यांचा समावेश आहे. यापूर्वी आयएसआय संबंधित २ दहशतवादी पकडले, सोशल मीडियाद्वारे भरती करून नेटवर्क तयार करत होते.
‘गजवा-ए-हिंद’चा कट
गुजरात एटीएसने देशविरोधी कट रचणा-या दोन आरोपींना अटक केली आहे. एटीएसनुसार, हे आरोपी सोशल मीडियाच्या माध्यमातून कट्टरपंथी विचारसरणीने प्रभावित होऊन देशात ‘‘गजवा-ए-हिंद’’ स्थापन करण्याचा कट रचत होते. एएनआयच्या माहितीनुसार, दोन्ही आरोपींना ११ दिवसांच्या पोलीस कोठडीत पाठवण्यात आले आहे.
४ अलकायदा दहशतवादी अटक
गुजरात एटीएसने सांगितले की, त्यांनी अल-कायदाशी संबंधित ४ दहशतवाद्यांना अटक केली आहे. दोन दहशतवादी गुजरातमधून, एक दिल्लीतून आणि एक नोएडातून पकडले गेले आहेत. हे चौघे बनावट नोटांच्या रॅकेटमध्ये आणि दहशतवादी संघटनेत लोकांना जोडण्याचे काम करत होते. हे अशा अॅप्सचा वापर करत होते ज्यात मजकूर आपोआप डिलीट होतो.
















