सव्वा लाखाचा प्रतिबंधित गुटखा जप्त

लातूर : प्रतिनिधी
राज्यात प्रतिबंधित गुटख्याची अवैध वाहतूक व विक्री रोखण्यासाठी लातूर जिल्हा पोलीस दलाने सुरू केलेल्या विशेष मोहिमेंतर्गत स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई करत १ लाख २० हजार ३२० रुपयांचा प्रतिबंधित गुटखा, वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली कार असा ४ लाख ७० हजार ३२० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलिसांची चाहूल लागताच वाहनचालकाने कार रस्त्याच्या कडेला सोडून अंधाराचा फायदा घेत घटनास्थळावरून पळ काढला. त्याचा शोध सुरू असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या आदेशानुसार तसेच अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वाखाली अवैध धंद्यांविरुद्ध विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेदरम्यान दि. २ जुलै २०२६ रोजी रात्री स्थानिक गुन्हे शाखेचे पथक देवणी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वलांडी येथे गस्त घालत असताना गुप्त माहितीदारामार्फत महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेला गुटखा मारुती सुझुकी सेलेरिओ (एमएच ०४ केएल १३७२) या कारमधून विक्रीसाठी आणला जात असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीच्या आधारे पथकाने वलांडीझ्रदवणहिप्परगा मार्गावरील सापळा रचला. रात्री सुमारे १०.१० वाजण्याच्या सुमारास संशयित वाहन दिसताच पोलिसांनी ते थांबविण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांची उपस्थिती लक्षात येताच चालकाने कार रस्त्याच्या कडेला उभी करून अंधाराचा फायदा घेत शेतामध्ये पळ काढला.
पोलिसांनी वाहनाची झडती घेतली असता वाहनात महाराष्ट्रात विक्रीस बंदी असलेला मोठ्या गुटखा साठा आढळून आला. यामध्ये विमल पान मसाला, व्ही-१ तंबाखू, आर.एम.डी. पान मसाला तसेच एम. सेंटेड गोल्ड तंबाखू असा एकूण १ लाख २० हजार ३२० रुपयांचा प्रतिबंधित गुटखा, वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली ३ लाख ५० हजार रुपये किमतीची मारुती सुझुकी सेलेरिओ कार तसेच एक मोबाईल फोन असा ४ लाख ७० हजार ३२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या प्रकरणी अज्ञात वाहनचालकाविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम १२३, २२३, २७४, २७५ तसेच अन्न सुरक्षा व मानके अधिनियम, २००६ च्या कलम ५९ अन्वये देवणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून फरार आरोपीचा शोध सुरू आहे. लातूर जिल्हा पोलीस दलाकडून प्रतिबंधित गुटखा, मादक पदार्थ, अवैध धंदे आणि जनआरोग्यास धोका निर्माण करणा-या बेकायदेशीर व्यवसायांविरुद्ध यापुढेही अशाच धडक कारवाया सातत्याने सुरू राहणार आहेत.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

द्वारकादास शामकुमारतर्फे १८०० वारक-यांची विनामूल्य पंढरपूर वारी 

लातूर : प्रतिनिधी आषाढी एकादशीनिमित्त गेली १५ वर्षांपासुन द्वारकादास शामकुमार...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
LIVE | महाराष्ट्र विधानसभा पावसाळी अधिवेशन 2026 |Maharashtra Assembly Monsoon Session LIVE
01:24:02
Video thumbnail
LIVE- विधानसभा पावसाळी अधिवेशन लाइव्ह प्रेक्षपण
22:03
Video thumbnail
Nanded|नांदेडमध्ये दिवसाढवळ्या फिल्मी स्टाईल चोरी; ४ लाख लंपास
01:07
Video thumbnail
Tukaram Munde LIVE :दूध उद्योगावर मोठी कारवाई? मुंढेंचे स्पष्ट संकेत
00:00
Video thumbnail
Tukaram Munde LIVE :दूध उद्योगावर मोठी कारवाई? मुंढेंचे स्पष्ट संकेत
36:07
Video thumbnail
Latur|लातूरवर पाणीसंकटाचे सावट; १३५ गावांचा पर्यायी पाणीपुरवठ्यावर आधार
03:21
Video thumbnail
Latur|घोणशी गावात तरुणाचे विद्युत खांबावर चढून आंदोलन
01:02
Video thumbnail
उत्तर प्रदेशातील कौशांबी येथे भीषण अपघात: एलपीजी टँकरचा स्फोट होऊन ४ जणांचा मृत्यू
01:51
Video thumbnail
Latur|स्मार्ट वीज मीटरवरून मनसे आक्रमक; किल्लारीत जोरदार आंदोलन!
04:33
Video thumbnail
Latur|लातूरमध्ये अतिक्रमण हटाव मोहीम; जेसीबीची धडक कारवाई
04:10
Video thumbnail
Latur| अखेर शेतकऱ्याला परत मिळाली बैलजोडी!
04:27
Video thumbnail
शिवसेना UBT प्रमुख उद्धव ठाकरे यांची स्फोटक पत्रकार परिषद लाईव्ह
08:29
Video thumbnail
लातूर-उदगीर महामार्गावर भीषण तिहेरी अपघात; कार, ऑटो आणि दुचाकीच्या धडकेत तिघे गंभीर जखमी
00:53
Video thumbnail
LIVE- विधानसभा पावसाळी अधिवेशन लाइव्ह प्रेक्षपण
04:50:10
Video thumbnail
Latur Traffic Issue|रस्ते बंद करूनही कोंडी कायम? लातूरच्या ट्रॅफिकचा प्रश्न ऐरणीवर
03:00

Latest news