जळकोट परिसरात दिवसभर संततधार

जळकोट : प्रतिनिधी
जळकोट शहर तसेच परिसरातील काही गावांमध्ये दि३ जुलै रोजी दुपारी १२ वाजल्यापासून पावसाची संततधार सुरू आहे. रात्री उशिरापर्यंत मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरूच होता .
  जळकोट तालुक्यात यावर्षी पावसाने ऋजु दृष्टी दाखवली आहे. जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात चांगला पाऊस झाला आणि आता जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यातही चांगला पाऊस होत आहे. जळकोट तालुक्यात झालेल्या चांगल्या पावसामुळे अनेक शेतक-यांनी आपल्या पेरण्या उरकल्या आहेत . काही शेतक-यांचे तर पिके उगवले आहेत. पेरणीनंतर पिकांना जसा पाऊस पाहिजे तसा पडत आहे. यामुळे पिकांची वाढही झपाट्याने होत आहे. लातूर जिल् त जळकोट तालुक्यात सर्वाधिक पाऊस झाला आहे. दि २ जुलैपर्यंत  जळकोट मंडळात तब्बल १८८ मीलीमीटर पावसाचे नोंद झाली होती आणि आता परत तीन जुलै रोजी दिवसभर पावसाची रिपरिप सुरू आहे. कधी मोठा पाऊस येतो तर कधी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडत आहे. दुपारी बारा वाजल्यापासून पाऊस पडत आहे. हा पाऊस भीज पाऊस असून या पावसामुळे जमिनीतील पाणी पातळी वाढण्यास मदत होणार आहे .
  जळकोट तालुक्यात सलग पडणा-या पावसामुळे जमिनीत मोठा ओलावा निर्माण झाला असून , अनेक शेतीमध्ये पाणी साचून राहत आहे त्यामुळे अनेक शेतक-यांची आंतरमशागतीची कामे खोळंबली आहेत. जळकोट तालुक्यातील घोणसी परिसरात दि ३ जुलै रोजी पावसाचे प्रमाण कमीच होते तर जळकोट तसेच वांजरवाडा या भागामध्ये पावसाचे प्रमाण अधिक होते.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

द्वारकादास शामकुमारतर्फे १८०० वारक-यांची विनामूल्य पंढरपूर वारी 

लातूर : प्रतिनिधी आषाढी एकादशीनिमित्त गेली १५ वर्षांपासुन द्वारकादास शामकुमार...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
LIVE | महाराष्ट्र विधानसभा पावसाळी अधिवेशन 2026 |Maharashtra Assembly Monsoon Session LIVE
01:24:02
Video thumbnail
LIVE- विधानसभा पावसाळी अधिवेशन लाइव्ह प्रेक्षपण
22:03
Video thumbnail
Nanded|नांदेडमध्ये दिवसाढवळ्या फिल्मी स्टाईल चोरी; ४ लाख लंपास
01:07
Video thumbnail
Tukaram Munde LIVE :दूध उद्योगावर मोठी कारवाई? मुंढेंचे स्पष्ट संकेत
00:00
Video thumbnail
Tukaram Munde LIVE :दूध उद्योगावर मोठी कारवाई? मुंढेंचे स्पष्ट संकेत
36:07
Video thumbnail
Latur|लातूरवर पाणीसंकटाचे सावट; १३५ गावांचा पर्यायी पाणीपुरवठ्यावर आधार
03:21
Video thumbnail
Latur|घोणशी गावात तरुणाचे विद्युत खांबावर चढून आंदोलन
01:02
Video thumbnail
उत्तर प्रदेशातील कौशांबी येथे भीषण अपघात: एलपीजी टँकरचा स्फोट होऊन ४ जणांचा मृत्यू
01:51
Video thumbnail
Latur|स्मार्ट वीज मीटरवरून मनसे आक्रमक; किल्लारीत जोरदार आंदोलन!
04:33
Video thumbnail
Latur|लातूरमध्ये अतिक्रमण हटाव मोहीम; जेसीबीची धडक कारवाई
04:10
Video thumbnail
Latur| अखेर शेतकऱ्याला परत मिळाली बैलजोडी!
04:27
Video thumbnail
शिवसेना UBT प्रमुख उद्धव ठाकरे यांची स्फोटक पत्रकार परिषद लाईव्ह
08:29
Video thumbnail
लातूर-उदगीर महामार्गावर भीषण तिहेरी अपघात; कार, ऑटो आणि दुचाकीच्या धडकेत तिघे गंभीर जखमी
00:53
Video thumbnail
LIVE- विधानसभा पावसाळी अधिवेशन लाइव्ह प्रेक्षपण
04:50:10
Video thumbnail
Latur Traffic Issue|रस्ते बंद करूनही कोंडी कायम? लातूरच्या ट्रॅफिकचा प्रश्न ऐरणीवर
03:00

Latest news