पानगाव येथील जि. प.चे शिक्षक बीएलओच्या कामावर

रेणापूर : प्रतिनिधी
रेणापूर तालुक्यातील पानगाव येथील तीन जिल्हा परिषद शाळांमधील उपलब्ध सर्व शिक्षकांची बीएलओ  म्हणून नियुक्ती करण्यात आल्याने विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर गंभीर परिणाम होत असल्याचा आरोप ग्राम बाल संरक्षण समिती व शालेय व्यवस्थापन समितीने केला आहे. शिक्षकांचे बीएलओचे  काम तातडीने रद्द करावे किंवा शिक्षणासाठी पर्यायी व्यवस्था  करावी, अशी मागणी तहसीलदारांना दिलेल्या निवेदनाद्वारे  करण्यात आली आहे.
    जिल्हा परिषद प्राथमिक शाळा (रेल्वे स्टेशन) येथे इयत्ता पहिली ते चौथीपर्यंत ६३ विद्यार्थी शिक्षण घेत असून त्यांच्यासाठी केवळ दोन शिक्षक उपलब्ध आहेत मात्र, या दोन्ही शिक्षकांची बीएलओ म्हणून नियुक्ती करण्यात आल्याने ते निवडणुकीच्या कामासाठी बाहेर गेल्यास शाळा बंद ठेवावी लागते. जिल्हा परिषद केंद्रीय शाळेत इयत्ता पहिली ते सातवीपर्यंत वर्ग असून एक मुख्याध्यापक व दोन शिक्षक आहेत.
शिक्षण देणा-या दोन्ही शिक्षकांकडेही बीएलओची जबाबदारी असल्याने अध्यापनात अडथळे निर्माण होत आहेत. तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा क्रमांक २ मध्ये ४ शिक्षकांची पदे मंजूर असताना दोन पदे रिक्त आहेत. उपलब्ध असलेल्या दोन्ही शिक्षकांनाही बीएलओ म्हणून  नियुक्त करण्यात आल्याने या शाळेतील विद्यार्थ्यांचेही  शैक्षणिक नुकसान होत असल्याचे ग्राम बाल संरक्षण समिती व शालेय व्यवस्थापन समितीने निवेदनात नमूद केले आहे.
समितीने २ जुलै रोजी तहसीलदारांकडे निवेदन देऊन तीनही शाळांतील शिक्षकांचे बीएलओ काम रद्द करावे किंवा तत्काळ पर्यायी शिक्षक उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी केली आहे. अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे. यावेळी ग्राम बाल संरक्षण समितीचे अध्यक्ष मधुकर गालफाडे, वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष रतन आचार्य, समितीचे सदस्य अनिल फुलारी तसेच शालेय व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी उपस्थित होते. दरम्यान दोन दिवसांत पर्यायी व्यवस्था न झाल्यास विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी रेणापूर तहसीलदारांच्या दालनातच शाळा भरवण्यात येईल, असा इशारा कुलभूषण संपत्ते (शालेय व्यवस्थापन समिती सदस्य व ग्रामपंचायत सदस्य, पानगाव) यांनी दिला आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

द्वारकादास शामकुमारतर्फे १८०० वारक-यांची विनामूल्य पंढरपूर वारी 

लातूर : प्रतिनिधी आषाढी एकादशीनिमित्त गेली १५ वर्षांपासुन द्वारकादास शामकुमार...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
LIVE | महाराष्ट्र विधानसभा पावसाळी अधिवेशन 2026 |Maharashtra Assembly Monsoon Session LIVE
01:24:02
Video thumbnail
LIVE- विधानसभा पावसाळी अधिवेशन लाइव्ह प्रेक्षपण
22:03
Video thumbnail
Nanded|नांदेडमध्ये दिवसाढवळ्या फिल्मी स्टाईल चोरी; ४ लाख लंपास
01:07
Video thumbnail
Tukaram Munde LIVE :दूध उद्योगावर मोठी कारवाई? मुंढेंचे स्पष्ट संकेत
00:00
Video thumbnail
Tukaram Munde LIVE :दूध उद्योगावर मोठी कारवाई? मुंढेंचे स्पष्ट संकेत
36:07
Video thumbnail
Latur|लातूरवर पाणीसंकटाचे सावट; १३५ गावांचा पर्यायी पाणीपुरवठ्यावर आधार
03:21
Video thumbnail
Latur|घोणशी गावात तरुणाचे विद्युत खांबावर चढून आंदोलन
01:02
Video thumbnail
उत्तर प्रदेशातील कौशांबी येथे भीषण अपघात: एलपीजी टँकरचा स्फोट होऊन ४ जणांचा मृत्यू
01:51
Video thumbnail
Latur|स्मार्ट वीज मीटरवरून मनसे आक्रमक; किल्लारीत जोरदार आंदोलन!
04:33
Video thumbnail
Latur|लातूरमध्ये अतिक्रमण हटाव मोहीम; जेसीबीची धडक कारवाई
04:10
Video thumbnail
Latur| अखेर शेतकऱ्याला परत मिळाली बैलजोडी!
04:27
Video thumbnail
शिवसेना UBT प्रमुख उद्धव ठाकरे यांची स्फोटक पत्रकार परिषद लाईव्ह
08:29
Video thumbnail
लातूर-उदगीर महामार्गावर भीषण तिहेरी अपघात; कार, ऑटो आणि दुचाकीच्या धडकेत तिघे गंभीर जखमी
00:53
Video thumbnail
LIVE- विधानसभा पावसाळी अधिवेशन लाइव्ह प्रेक्षपण
04:50:10
Video thumbnail
Latur Traffic Issue|रस्ते बंद करूनही कोंडी कायम? लातूरच्या ट्रॅफिकचा प्रश्न ऐरणीवर
03:00

Latest news