अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर विधानसभा स्थगित

मुंबई : प्रतिनिधी
मुंबईसह राज्यातील अतिवृष्टी, वेगवान वारे आणि निर्माण झालेल्या आपत्कालीन परिस्थितीचा विचार करून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सर्व नागरिक आणि लोकप्रतिनिधींना सतर्क राहण्याचे आवाहन केले. शासन आणि प्रशासनाला योग्य ते सहकार्य करून ही परिस्थिती हाताळण्यासाठी सर्वांनी जबाबदारीने वागावे, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

राज्यातील एकूण परिस्थितीची गंभीरता लक्षात घेऊन अध्यक्षांनी त्या दिवसाचे विधानसभेचे कामकाज स्थगित करण्याची घोषणा केली. तसेच विधानसभेची पुढील नियमित बैठक उद्या सकाळी ११ वाजता होईल, असे त्यांनी सभागृहात जाहीर केले.
सभागृहाचे कामकाज सुरू होताच विजय वडेट्टीवार, अजय चौधरी आणि अमित पटेल सदस्यांनी सांगितले की, मुंबईत अनेक ठिकाणी झाडे कोसळण्याच्या घटना वाढल्या आहेत. अनेक झाडांची वेळेत छाटणी न झाल्यामुळे नागरिकांचा जीव जात आहे, वाहनांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे.

त्यामुळे मुंबई महानगरपालिकेला तातडीने झाडांची छाटणी करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी करण्यात आली. याचबरोबर मुंबईत मोठ्या खर्चातून उभारण्यात आलेल्या सिमेंट रस्त्यांवर अनेक ठिकाणी तडे गेल्याचा मुद्दाही सभागृहात उपस्थित करण्यात आला. या कामांची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी आणि ज्या ठिकाणी रस्ते खराब झाले आहेत, ते तातडीने दुरुस्त करावेत, अशी मागणी विरोधी पक्षाने केली.

मुख्यमंत्री उत्तर देताना म्हणाले की, राज्यासमोर अभूतपूर्व नैसर्गिक परिस्थिती निर्माण झाली आहे. विरोधकांनी उपस्थित केलेले मुद्दे गंभीर असले तरी यावेळी निसर्गाचा प्रकोपही तितकाच मोठा आहे. रविवारी मुंबईत सुमारे ५० किलोमीटर प्रतितास वेगाने वारे वाहत होते. दरवर्षी पावसाळ्यात सरासरी ८०० झाडे कोसळतात; मात्र यावेळी एका दिवसातच सुमारे ३५० झाडे पडली आहेत. आजची परिस्थिती त्याहीपेक्षा गंभीर असून दुपारनंतर ७० ते ९० किलोमीटर प्रतितास वेगाने वारे वाहण्याचा अंदाज असल्याने नागरिकांनी विशेष काळजी घेण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

वर्क फ्रॉम होमचे आवाहन करण्यात आले असून शाळा आणि महाविद्यालयांनाही आवश्यक सूचना देण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री यांनी दिली. काल घडलेली इमारत दुर्घटना ही पूर्णपणे बेकायदेशीर इमारतीशी संबंधित होती. त्या इमारतीतील रहिवाशांऐवजी शेजारील झोपड्यांवर इमारत कोसळल्याने तेथील नागरिकांचा मृत्यू झाला, असे त्यांनी स्पष्ट केले.

मुंबई-पुणे मार्गावरील दरड कोसळल्यानंतर तातडीने वाहतूक बंद करून पर्यायी व्यवस्था करण्यात आली. नागरिकांना सतत सूचना देण्यात आल्या असून अडकलेल्या वाहनांना बाहेर काढण्याचे काम सुरू आहे. महानगरपालिका, राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, पोलीस, महसूल आणि इतर सर्व यंत्रणा रात्रंदिवस काम करत असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. मंत्री गिरीश महाजन यांनीही रात्री घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतल्याची माहिती त्यांनी दिली.
गेल्या दोन-तीन दिवसांत घडलेल्या सर्व दुर्घटना, त्यावरील कारवाई, भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी करण्यात येणा-या उपाययोजना तसेच पावसाळ्यापूर्वीच्या तयारीबाबतचे सविस्तर निवेदन तयार असून आजची परिस्थिती लक्षात घेता ते मंगळवारी सभागृहात मांडण्यात येईल, असे मुख्यमंत्री यांनी स्पष्ट केले.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

द्वारकादास शामकुमारतर्फे १८०० वारक-यांची विनामूल्य पंढरपूर वारी 

लातूर : प्रतिनिधी आषाढी एकादशीनिमित्त गेली १५ वर्षांपासुन द्वारकादास शामकुमार...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
LIVE-लातुरात आज आरक्षण उपवर्गीकरणाविरोधात एल्गार!
06:53
Video thumbnail
LIVE-लातुरात आज आरक्षण उपवर्गीकरणाविरोधात एल्गार!
00:00
Video thumbnail
Latur|शेतात जाण्यासाठी रस्ताच नाही; न्यायासाठी आमरण उपोषण
01:51
Video thumbnail
Latur|लातुरात आरक्षण उपवर्गीकरणाविरोधात आज महामोर्चा!
03:36
Video thumbnail
Nanded|नांदेडमध्ये उबाठाचे रामरक्षा आंदोलन; दानप्रकरणावर संताप
02:44
Video thumbnail
Nanded|रेल्वे गाड्यांच्या उद्घाटनापूर्वी उबाठा पदाधिकाऱ्यांना पोलिसांच्या नोटिसा
01:10
Video thumbnail
'मिसिंग लिंक'वर पावसाचा फटका; दरड कोसळल्यानंतर ढिगारा उपसण्याचे काम युद्धपातळीवर सुरू
00:41
Video thumbnail
मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानने केली तिसरी लग्नगाठ; गौरी स्प्रॅटसोबतच्या लग्नाचा व्हिडिओ व्हायरल.
00:48
Video thumbnail
Hatta News|हट्टाकरांची अनेक वर्षांची प्रतीक्षा अखेर संपली!;२.४० कोटींच्या नव्या बसस्थानकाचे भूमिपूजन
07:13
Video thumbnail
Latur Police Action|लातूर पोलिसांची धडाकेबाज ॲक्शन; आरोपींची गंजगोलाईत धिंड
02:08
Video thumbnail
Latur|जिल्हा परिषदेत पहिली वार्षिक सभा; राजकीय हालचालींना वेग
04:26
Video thumbnail
निलंग्यात सावकारांचा नंगा नाच! शेतकऱ्यांचे अपहरण करून मारहाण?अर्धं गाव रिकामं... नेमकं काय घडतंय?
09:40
Video thumbnail
पावसाचा जोर, रुळांवर पाणी; मुंबईच्या दिशेने येणाऱ्या 'वंदे भारत'चा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल!
00:27
Video thumbnail
पूर्णा-देगाव रस्ता काँक्रीटीकरणाचे आमदार डॉ. रत्नाकर गुट्टे यांच्या हस्ते भूमिपूजन
05:37
Video thumbnail
Latur Crime News| कौटुंबिक वादातून पतीने पत्नीला जिवंत जाळले!; निर्दयी पतीसह तिघांवर गुन्हा दाखल
04:21

Latest news