राम मंदिर देणगी चोरी प्रकरणात नवे वळण

अयोध्या : राम मंदिरातील देणगी चोरी प्रकरण दिवसेंदिवस गंभीर होत असून या प्रकरणात नवे घडामोडी समोर येत आहेत. देणगीतील अपहाराची रक्कम कथितपणे शेअर बाजारात गुंतवण्यात आल्याचा तपासात संशय व्यक्त करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर देणगी मोजणी विभागातील २३ कर्मचा-यांनी सामूहिक राजीनामे दिल्याची माहिती समोर आली असून श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टच्या प्रशासनात खळबळ उडाली आहे.

देणगी चोरीचे प्रकरण उघडकीस आल्यानंतर राम मंदिर प्रशासनाने रोख रक्कम हाताळणा-या कर्मचा-यांसाठी सुरक्षा नियम अधिक कडक केले आहेत. खिसेविरहित गणवेश, वाढीव तपासणी, कठोर देखरेख आणि कामाच्या तासांमध्ये वाढ अशा उपाययोजना लागू करण्यात आल्या आहेत. या बदलांमुळे कामकाज अधिक कठीण झाल्याचे कर्मचा-यांचे म्हणणे आहे.

कर्मचा-यांच्या मते, जबाबदा-या वाढल्या असल्या तरी वेतनात कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही. त्यामुळे सामूहिक राजीनाम्याचा निर्णय घेण्यात आला. दुसरीकडे, देणगी व्यवस्थापन अधिक सुरक्षित आणि पारदर्शक करण्यासाठी हे बदल आवश्यक असल्याचे मंदिर प्रशासनाचे म्हणणे आहे.
दरम्यान, देणगी अपहार प्रकरणात आरोपी आणि त्याच्या नातेवाईकांची ३० बँक खाती गोठवण्याची कारवाई करण्यात आली आहे. तपासात अपहाराची रक्कम शेअर बाजारात गुंतवल्याचा संशय असून उत्तर प्रदेश सरकारचे विशेष तपास पथक(एसआयटी) विविध स्तरांवर तपास करत आहे.

या प्रकरणात आतापर्यंत आठ जणांना अटक करण्यात आली आहे. तसेच, राम मंदिरातील देणगी चोरी प्रकरणाची चौकशी केंद्रीय अन्वेषण विभागाकडे सोपवावी आणि श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टच्या आर्थिक व्यवहारांचे नियंत्रक आणि महालेखा परीक्षक यांच्यामार्फत लेखापरीक्षण करण्यात यावे, अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे.

या याचिकेवर सोमवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार असून सरन्यायाधीश सूर्य कांत, न्यायमूर्ती जॉयमल्या बागची आणि न्यायमूर्ती व्ही. मोहना यांच्या खंडपीठासमोर प्रकरणाची सुनावणी होणार आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

द्वारकादास शामकुमारतर्फे १८०० वारक-यांची विनामूल्य पंढरपूर वारी 

लातूर : प्रतिनिधी आषाढी एकादशीनिमित्त गेली १५ वर्षांपासुन द्वारकादास शामकुमार...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur|खंडापूर देणगी अपहार प्रकरणात किशोर शिवणीकर अटकेत; दीड कोटींच्या बंगल्यातून एलसीबीची कारवा
05:16
Video thumbnail
Latur|आरक्षणावर नवा फॉर्म्युला! 'अ, ब, क, ड' ऐवजी दोनच गटांची मागणी
03:06
Video thumbnail
Latur|लातूरमध्ये सहकार संकुलाचे भूमिपूजन; ११ कार्यालये येणार एकाच छताखाली
03:00
Video thumbnail
Latur|केबल चोरीच्या संशयावरून तीन मुलांना खांबाला बांधून बेदम मारहाण! #breakingnews
01:21
Video thumbnail
Parbhani|महापौरांवरील हल्ल्याच्या प्रयत्नानंतर संताप; कठोर कारवाईची मागणी
01:52
Video thumbnail
SOLAPUR|ओंकार शुगरजवळ भीषण अपघात; महिलेचा जागीच मृत्यू, वडील-मुलगी गंभीर जखमी
01:26
Video thumbnail
Solapur|कुर्डूवाडी बार्शी रोडवर ओंकार शुगर जवळ भीषण अपघात एक जागीच ठार #Marathinews #accidentnews
00:36
Video thumbnail
Big Breaking News|खंडापूर प्रकरणात मोठा ट्विस्ट; अखेर पिस्तुल्या महाराज अटकेत
01:07
Video thumbnail
Latur|शिवीगाळ पडली महागात! ड्रायव्हर-कंडक्टरने तरुणाला दिला चोप #breakingnews
00:53
Video thumbnail
प्रा. विठ्ठल कांगणे यांचे तुफान भाषण; विद्यार्थ्यांमध्ये जल्लोष
27:52
Video thumbnail
Latur|लातूरमध्ये पुन्हा अतिक्रमण!कारवाईनंतर आठवड्यातच जुने जिल्हाधिकारी कार्यालय परिसर पुन्हा गजबजला
02:58
Video thumbnail
Latur|विठ्ठल कांगणे मंचावर येताच विद्यार्थ्यांमध्ये जल्लोष
09:34
Video thumbnail
Latur|MPSC विद्यार्थ्यांचा एल्गार; ऑफलाइन परीक्षेसाठी लातूरात महामोर्चा
01:53
Video thumbnail
Parbhani Breaking News|परभणीत खळबळ! महापौरांवर चाकू हल्ल्याचा प्रयत्न
03:05
Video thumbnail
Nanded|हिमायतनगर हादरलं! नामांकित कोचिंग क्लासेस संचालकाची आत्महत्या
01:36

Latest news