लातूर : प्रतिनिधी
आरएसएसडीआय महाराष्ट्र चॅप्टर व इंडियन मेडिकल असोसिएशन, लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने बार्शी रोडवरील हॉटेल ग्रँड पोर्टिको येथे टाईप-१ मधुमेहग्रस्त व्यक्तींसाठी विशेष कार्यशाळा तसेच मधुमेह व लठ्ठपणा या विषयावरील एकदिवसीय वैद्यकीय परिषदेचे यशस्वी आयोजन करण्यात आले. या कार्यशाळेत ग्रामीण भागातील ६० गरजू टाईप-१ मधुमेहग्रस्त मुला-मुलींना अत्याधुनिक उॠटर (उङ्मल्ल३्रल्ल४ङ्म४२ ॠ’४ूङ्म२ी टङ्मल्ल्र३ङ्म१्रल्लॅ र८२३ीे) मशीन मोफत बसविण्यात आली. या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने शरीरातील रक्तातील साखरेची पातळी २४ तास, वारंवार बोटाला टोचणी न लावता मोजता येते. त्यामुळे रुग्णांना आहार आणि इन्सुलिनच्या डोसचे योग्य नियोजन करता येते. कार्यशाळेत उपस्थित तज्ज्ञ डॉक्टरांनी टाईप-१ मधुमेहग्रस्त रुग्ण व त्यांच्या पालकांच्या विविध शंकांचे निरसन करून आधुनिक उपचारपद्धती व जीवनशैलीबाबत मार्गदर्शन केले.
यानंतर मधुमेह व लठ्ठपणा या विषयावर आयोजित करण्यात आलेल्या वैद्यकीय परिषदेत लातूर व परिसरातील सुमारे ५०० डॉक्टरांनी सहभाग घेतला. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून लातूरचे खासदार डॉ. शिवाजी काळगे उपस्थित होते. तसेच ज्येष्ठ वैद्यकीय तज्ज्ञ डॉ. जी. आर. भराडिया, डॉ. अजय जाधव आणि डॉ. रमेश भराटे यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
या परिषदेत मुंबईचे सुप्रसिद्ध मधुमेहतज्ज्ञ डॉ. विजय पनीकर, डॉ. विजय नेगलूर, डॉ. संहिता वालावळकर, डॉ. मनोज चावला, डॉ. राजीव कोविल, डॉ. पूर्वी चावला, डॉ. निखिल नाशिककर, डॉ. व्यंकटेश शिवणे, डॉ. स्नेहल तन्ना, पुण्याचे डॉ. सुहास एरंडे, छत्रपती संभाजीनगरच्या डॉ. अर्चना सारडा व डॉ. मयुरा काळे, नाशिकचे डॉ. नारायण देवगावकर, नांदेडचे डॉ. समीर चंद्रात्रे व डॉ. संतोष मालपाणी, सोलापूरचे डॉ. भास्कर पाटील व डॉ. अनिकेत इनामदार, साता-याचे डॉ. जयदीप रेवले, कोल्हापूरचे डॉ. राजेश देशमाने व डॉ. अदिती देशमाने, रत्नागिरीचे डॉ. अनिरुद्ध फडके तसेच लातूरचे डॉ. विजय ढवळे आणि डॉ. रामदास बरूरे यांनी मधुमेह व्यवस्थापन, लठ्ठपणा नियंत्रण आणि आधुनिक उपचारपद्धतींवर सखोल मार्गदर्शन केले.
















