कारखाना मालकीचे ऊस तोडणी यंत्र भाड्याने चालविण्यास घेण्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन

लातूर : प्रतिनिधी
तालुक्यातील मळवटी येथील ट्वेंन्टीवन शुगर्स या कारखान्याने गाळप हंगाम २०२६-२७ साठी कारखाना मालकीचे ऊस तोडणी यंत्र (हार्वेस्टर) भाड्याने चालविण्यास देण्याबाबत निर्णय घेतलेला असुन ऊस तोडणी यंत्र ट्वेंन्टीवन शुगर्स लि. कडे भाडयाने चालविण्यास घेण्यासाठी अर्ज करण्याचे जाहीर आवाहन केले आहे. या निर्णयामुळे स्थानिक ऊस उत्पादक शेतकरी व ऊस तोडणीचा अनुभव असलेल्या कंत्राटदारांना रोजगाराची व व्यवसाय वृद्धीची संधी उपलब्ध होणार आहे.
कारखान्याच्या वतीने देण्यात आलेल्या माहितीनुसार, कारखान्याच्या मालकीचे न्यु हॉलंड-४०१० व शक्तीमान कंपनीचे आधुनिक ऊस तोडणी यंत्र (हार्वेस्टर) इच्छुकांना भाड्याने देण्यात येणार आहेत. या उपक्रमाचा मुख्य उद्देश म्हणजे ऊस तोडणी प्रक्रियेत यांत्रिकीकरणाला चालना देणे आणि शेतकरी व तोडणी वाहतूक कंत्राटदार यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देणे हा आहे. विशेषत: सध्या ऊस तोडणी मजुरांच्या कमतरतेमुळे ऊस तोडणीमध्ये येणा-या अडचणी लक्षात घेता. हार्वेस्टरच्या वापरामुळे या समस्येवर मोठ्या प्रमाणात पर्याय उपलब्ध होणार असल्याचे कारखाना प्रशासनाने नमूद केले आहे.
कारखाना कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादक शेतकरी व ऊस तोडणीचा अनुभव असलेले कंत्राटदार यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. इच्छुकांनी विहित नमुन्यातील अर्ज कारखाना कार्यस्थळावरील शेतकी कार्यालयात दि. २० जुलै २०२६ पुर्वी सादर करणे आवश्यक आहे. गाळप हंगाम २०२६-२७ साठी हार्वेस्टर भाड्याने देण्याचा निर्णय हा शेतकरी व कंत्राटदार यांना लाभदायक ठरणार असून, ऊस तोडणी प्रक्रियेला गती देण्यास महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. इच्छुकांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन कारखान्याच्या वतीने करण्यात आले आहे. अधिक माहीतीसाठी जोगदंड ९६२३०११६१६,  साळुंके ९७०२५०००५५ यांच्याशी करावा.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Nanded|MPSC ऑनलाइन परीक्षेविरोधात विद्यार्थ्यांचा एल्गार
00:30
Video thumbnail
Ramdas Athawale ON Sharad Pawar|शरद पवारांनी NDA मध्ये यावे, स्वागतच करू" – आठवले
11:50
Video thumbnail
Latur|द्रोणा डिफेन्स अकॅडमीविरोधात मनसेचे आंदोलन
03:19
Video thumbnail
Latur Doctar Suicide|डॉ. मेहुल राठोड मृत्यू प्रकरणात मोठी अपडेट!
02:49
Video thumbnail
Latur|पिस्तुल्या महाराजाचा पोलीस कोठडीत मुक्काम वाढला!
02:05
Video thumbnail
Nanded|पाण्यासाठी महिलांचा एल्गार; घागर घेऊन ग्रामपंचायतीवर धडक!
00:32
Video thumbnail
Nanded|महिलांची ताकद! वझरा गावात दारूबंदीचा ठराव मंजूर
00:25
Video thumbnail
Nanded|₹1.30 कोटींचा बंधारा... पण लाथ मारताच कोसळला?
02:50
Video thumbnail
Latur|सावकाराने जमीन हडपल्याचा आरोप; शेतकऱ्याचे आमरण उपोषण
04:42
Video thumbnail
Latur|गटप्रवर्तक महिलांचे आशाताई भिसे यांना साकडे
06:36
Video thumbnail
Breaking News|लातुरातील नामांकित डॉक्टरची आत्महत्या! घटनास्थळी फॉरेन्सिक टीम दाखल
01:59
Video thumbnail
Big Breaking|धक्कादायक! लातूरचे नामांकित डॉक्टर मेहुल राठोड यांची आत्महत्या
00:30
Video thumbnail
Latur|ग्रामीण आरोग्य व्यवस्था धोक्यात? आशाताई भिसे आक्रमक
04:17
Video thumbnail
Latur|अंजली नगरातील आगग्रस्त घराची आमदार अमित देशमुख यांनी केली पाहणी
04:41
Video thumbnail
Parbhani|शक्तीपीठ महामार्गाविरोधात शेतकऱ्यांचा एल्गार!परभणीतून १ हजार शेतकरी पंढरपूरच्या महासभेकडे
02:16

Latest news