लातूर : प्रतिनिधी
येथील राजर्षी शाहू महाविद्यालय, राष्ट्रीय सेवा योजना व अंमलीपदार्थ विरोधी टास्कफोर्स, नांदेड विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने राजर्षी शाहू महाविद्यालयात अमलीपदार्थ विरोधी विशेष कार्यक्रमाच आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात प्रास्ताविक मनोगत व्यक्त करताना कार्यक्रमधिकारी डॉ. कल्याण सावंत यांनी डॉ ए. पी. जे. अब्दुल कलाम यांनी पाहिलेले मिशन २०-२० चे विकसित भारताचे स्वप्न पुर्ण ना होण्यास जवाबदार आजचा व्यसनेच्या आहारी गेलेला तरुण आहे असे सांगितले. या कार्यक्रमास प्रमुख मार्गदर्शक म्हणून अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स नांदेड विभागचे प्रमुख पोलीस निरीक्षक दिगंबर कोपरे, हे उपस्थित होते.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे पर्यवेक्षक प्रा. सुदर्शन पाटील होते. सूत्रसंचलन प्रा. माधव शेळके यांनी केले, तर आभार डॉ. प्रकाश रोडिया यांनी मानले. या कार्यक्रमास अंमलदार राजेश्वर कांदे, गणेश जाधव, प्रा. विजय गवळी, डॉ. राहुल मोरे, प्रा. जयश्री जटाळ, प्रा. चंद्रप्रभा कुलकर्णी तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
















