हुती बंडखोरांची बाब-अल-मंदेब सामुद्रधुनीवर नाकेबंदी

तेहरान : आखाती देशांमध्ये युद्ध सुरूच असून अमेरिकेकडून इराणवर तीव्र हल्ले सुरू आहे. इराणही त्या हल्ल्यांना प्रत्युत्तर देत आहे. या संघर्षामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. जगाच्या तेलाच्या गरजेपैकी सुमारे २० टक्के पुरवठा करणा-या होर्मुझच्या सामुद्रधुनीच्या बंदमुळे आधीच जागतिक तेल आणि वायू संकट निर्माण झाले आहे. आता आणखी एका सामुद्रधुनीवर नाकेबंदी लादण्यात आल्याने हे संकट आणखी गडद होण्याची शक्यता आहे.

अमेरिका-इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर इराणने होर्मुझची सामुद्रधुनी बंद केली आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय तेलाच्या किमतींमध्ये मोठी वाढ झाली आहे. हुती बंडखोरांनी आता बाब-अल-मंदेब सामुद्रधुनीवर नाकेबंदी लादली आहे. इराणने होर्मुझची सामुद्रधुनी बंद केली असताना इराण-समर्थित हुती बंडखोरांनी तेल आणि वायूच्या वाहतुकीसाठी महत्त्वपूर्ण असलेला दुसरा सागरी मार्ग बाब-अल-मंडेब सामुद्रधुनी रोखल्याचे वृत्त आहे. हे सौदी अरेबियासाठी केले गेले असले तरी, यामुळे जगभरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. येमेनच्या हुती बंडखोरांनी सौदी अरेबियाविरुद्ध तात्काळ प्रभावाने नौदल नाकेबंदी जाहीर केल्याने, सुरू असलेल्या अमेरिका-इराण युद्धाला एक नवीन वळण लागले आहे. या निर्णयामुळे सामरिकदृष्टया महत्त्वाच्या बाब-अल-मंदेब सामुद्रधुनीतून जाणा-या तेल आणि वायू जहाजांच्या वाहतुकीत मोठा अडथळा येण्याची शक्यता वाढली आहे. होर्मुझची सामुद्रधुनी बंद असताना हे वृत्त आल्याने जगाची चिंता वाढली आहे. आखाती देशातील तणावाच्या पार्श्वभूमीवर सौदी अरेबियाविरोधात हुतींनी केलेली ही कारवाई चिंतेचे कारण आहे. होर्मुझची सामुद्रधुनी बंद झाल्यामुळे जागतिक ऊर्जा पुरवठा आणि सागरी व्यापाराबद्दलची चिंता आणखी वाढू शकते. गेल्या आठवड्यात येमेनने बाब अल-मंदेब सामुद्रधुनी बंद करण्याची धमकी दिली होती आणि आता ती सौदी अरेबियासाठी बंद करण्यात आली आहे.

सागरी वाहतूक विस्कळीत
होर्मुझच्या सामुद्रधुनीप्रमाणेच बाब-अल-मंदेब सामुद्रधुनी ही जागतिक व्यापारासाठी महत्त्वाची आहे. ती तांबड्या समुद्राला एडनच्या आखाताशी आणि हिंद महासागराशी जोडते. या सामुद्रधुनीतील अडथळ्यामुळे जागतिक सागरी वाहतूक विस्कळीत होऊ शकते, कच्च्या तेलाच्या किमती गगनाला भिडू शकतात.

ऊर्जा वाहतुकीचा मोठा हिस्सा
जगातील सर्वात व्यस्त सागरी मार्गांपैकी एक असलेली बाब-अल-मंदेब सामुद्रधुनी, सुएझ कालव्याचा दक्षिणेकडील प्रवेशद्वार म्हणून काम करते आणि जागतिक सागरी व्यापारात तिचा वाटा अंदाजे १० ते १२ टक्के आहे, ज्यात ऊर्जा वाहतुकीचा मोठा हिस्सा आहे. जर हा मार्ग बंद झाला तर कच्च्या तेलाच्या किमती २०० डॉलर प्रति बॅरलपर्यंत पोहोचू शकतात.

भारतासाठी महत्वाचा मार्ग
बाब-अल-मंदेब सामुद्रधुनी भारतासह देशांसाठीही अत्यंत महत्त्वाची आहे. भारत आपल्या तेलाच्या गरजेपैकी ८५ टक्क्यांहून अधिक तेल आयात करतो आणि होर्मुझच्या सामुद्रधुनीनंतर कच्चे तेल आणि एलएनजीच्या आयातीसाठी पश्चिम आशिया व उत्तर आफ्रिकेच्या काही भागांवर अवलंबून आहे. येमेनच्या नियंत्रणाखालील हा सागरी मार्ग भारतासाठी होर्मुझच्या सामुद्रधुनीइतकाच महत्त्वाचा आहे. भारतातील खासगी आणि सार्वजनिक तेल शुद्धीकरण कंपन्या या मार्गाद्वारे दररोज शुद्ध केलेली पेट्रोलियम उत्पादने युरोपीय खरेदीदारांना पाठवतात. हिंदुस्थानचा सुमारे ९५ टक्के व्यापार सागरी मार्गाने होत असल्याने, बाब-अल-मंडेब युरोप, उत्तर अमेरिका आणि उत्तर आफ्रिकेकडे होणा-या निर्यातीसाठी एक महत्त्वाचे प्रवेशद्वार म्हणून काम करते.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
पर्यावरण संवर्धनाचा उपक्रम: पूर्णा शहरात 'देववन-घनवन' प्रकल्पांतर्गत २,००० वृक्ष लागवडीचा संकल्प
05:14
Video thumbnail
मंगरूळ येथे प्राथमिक आरोग्य केंद्राचे उद्घाटन; रुग्णवाहिकेचेही लोकार्पण
02:56
Video thumbnail
Nanded Congress Protest|दिल्लीतील लाठीचार्जचे पडसाद नांदेडमध्ये; काँग्रेस रस्त्यावर
01:29
Video thumbnail
Amit Deshmukh|भारतात आता लोकशाही फक्त नावालाच!’ आ.अमित देशमुखांचा भाजपवर पलटवार
01:56
Video thumbnail
Ajitdada Pawar Jayanti|जयंतीदिनीही एकच सवाल... अजितदादांच्या मृत्यूमागचं गूढ कधी उकलणार?
01:19
Video thumbnail
Nanded|नरसीत घराला आग दीड लाख रकमेसह अडीच लाखाचे साहित्य जळून खाक
00:50
Video thumbnail
Latur|धक्कादायक!चाकुर पंचायत समिती कार्यालयासमोर शेतकऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न
04:28
Video thumbnail
Ajitdada Pawar Jayanti|दादांच्या आठवणींना उजाळा; सुनेत्रावहिनी पवार आणि जय पवार भावूक
00:40
Video thumbnail
Latur|भिंतींवर पिचकाऱ्या, दुर्गंधी अन् घाण; लातूरच्या प्रशासकीय इमारतीचा श्वास कोंडला
03:17
Video thumbnail
Latur|पूर्णा येथे मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त महा रक्तदान शिबिर
01:18
Video thumbnail
Parbhani|परभणीतील लक्ष्मी नगरात चारचाकीतून गाईची चोरी;घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद
02:59
Video thumbnail
Latur|10 वर्षे विना वेतन सेवा; तीन शिक्षकांचे 24 दिवसांपासून उपोषण
03:16
Video thumbnail
Latur|दिल्लीतील लाठीचार्जचे पडसाद उदगीरमध्ये; बहुजन विकास अभियान रस्त्यावर
02:32
Video thumbnail
Latur|स्व. अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त आठवडाभर सर्वरोग निदान शिबिर
02:32
Video thumbnail
Latur|FDA च्या कारवाईला न जुमानता सील तोडली; बेकरी मालकावर गुन्हा!
02:07

Latest news