शिरूर अनंतपाळ : प्रतिनिधी
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष तथा लातूर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अशोकराव शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचा ६१ वा वाढदिवस शिरूर अनंतपाळ शहरासह तालुक्यात विविध समाजोपयोगी उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला. नगरपंचायतचे नगरसेवक सुधीर लखनगावे यांच्या संकल्पनेतून आणि काँग्रेसचे युवा नेते पृथ्वीराज पाटील निलंगेकर यांच्या हस्ते दिवसभर विविध सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.
या निमित्ताने शहरातील चारही जिल्हा परिषद शाळांसह तालुक्यातील सुमारे २,१०० विद्यार्थ्यांना प्रतिवर्षाप्रमाणे वह्यांचे वाटप करण्यात आले. ग्रामदैवत श्री अनंतपाळ मंदिरात दुग्धाभिषेक करण्यात आला. तसेच भटक्या-विमुक्त मसनजोगी समाजातील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वितरण करण्यात आले. याशिवाय सार्वजनिक लिंगायत स्मशानभूमी, दलित स्मशानभूमी, जिल्हा परिषद शाळा परिसर तसेच आनंदवाडी ग्रामपंचायत परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. ग्रामीण रुग्णालयातील रुग्णांना फळांचे वाटप करण्यात आले. आशा सेविका, अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस आणि नगरपंचायतीतील महिला स्वच्छता कर्मचा-यांना साड्यांचे वितरण करून त्यांचा सन्मान करण्यात आला.
भोजराजनगर येथील जिल्हा परिषद शाळा परिसरात आठ वर्षांपूर्वी लावलेल्या आंब्याच्या वृक्षाचा विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत वाढदिवसही अनोख्या पद्धतीने साजरा करण्यात आला. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणा-या या उपक्रमाचे उपस्थितांनी कौतुक केले. या कार्यक्रमास राज्य महिला आयोगाच्या सदस्या तथा शिवसेना नेत्या शोभा बेंजरगे, काँग्रेस तालुकाध्यक्ष आबासाहेब पाटील उजेडकर, पंचायत समिती सभापती संजय सूर्यवंशी, नगरसेवक सुधीर लखनगावे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सचिव महादेव आवाळे, ज्येष्ठ काँग्रेस नेते शिवराज धुमाळे, नामदेवराव जगताप, काँग्रेस शहराध्यक्ष अशोक कोरे, लक्ष्मणराव बोधले, भागवत वंगे, राजेंद्र शिंदे, खंडेराव पाटील, विश्वनाथ हंद्राळे, गुरुनाथ आचवले, संजय डिगोळे, काशिनाथ धुमाळे, शिवसांब पारशेट्टे, व्यंकट बेबंळगे, माधव पारशेट्टे, उमाकांत शिंदाळकर, आण्णाराव शेरसांडे, सूर्यकांत गलबले, शब्बीर पटेल, बाबुराव तोरणे, आदेश पारशेट्टे, शिवदास उंबरगे, भागवत नाब्दे, अविनाश आचवले, सिद्धेश्वर चाकुरे, महादेव ढगे यांच्यासह ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अनंत पुरी, मुख्याध्यापक परमेश्वर तोंडारे, मारोती शिवणे, दिलीप देवशेट्टे, सोमनाथ घटकार, गोविंद हंद्राळे, वेदप्रकाश भोजणे, रोहिदास नाब्दे, गंगाधर मालेवाडे, हरिभाऊ गंभीरे, उमाकांत पाटील, शिवाबाई भोजणे, उषाताई बिरादार, मनीषा मुचळंबे, सरोजा राजपूत शिक्षक, शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी, काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, युवक काँग्रेसचे कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
















