२५ हजार मूळ वेतन असणा-यांना पेन्शन मिळणार!

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
ईपीएफओ अतंर्गत ईपीएफच्या पगाराची मर्यादा वाढविण्याच्या प्रस्तावाला वित्त मंत्रालयाकडून मंजुरी देण्यात आली. १५ हजार रुपयांवरुन ती रक्कम २५ हजार रुपये करण्याचा निर्णय केंद्र सरकारच्या कॅबिनेटने मंजुरी दिल्यानंतर तो लागू होईल. अजून या निर्णयाला केंद्रीय कॅबिनेटची मंजुरी मिळणे बाकी आहे.

ईपीएफओच्या नियमांनुसार ज्या कर्मचा-यांचे मूळ वेतन १५ हजार रुपयांपर्यंत असते, त्यांना पीएफ कॉन्ट्रिब्यूशन अनिवार्य असते. १५ हजारांपेक्षा अधिक मूळ वेतन असणा-या कर्मचा-यांना हा नियम लागू नसतो. मात्र, केंद्रीय वित्त मंत्रालयाकडून याची मर्यादा २५ हजार रुपये करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे मोठ्या संख्येने नोकरदार लोक ईपीएफ आणि पेन्शनच्या कक्षेत येतील.

केंद्रीय वित्त मंत्रालयाकडून ईपीएफओच्या पगाराची मर्यादा वाढविण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली. यात १५ हजार रुपयांच्या मूळ वेतनाची मर्यादा वाढवून २५ हजार रुपये पगार असणा-यांना पीएफ आणि पेन्शनच्या कक्षेत आणण्याची तयारी करण्यात आली आहे. सुरुवातीला ही मर्यादा ३० हजार रुपये करण्याचा विचार होता. मात्र, वित्त मंत्रालयाकडून ही मर्यादा २५ हजार रुपये करण्यास मंजुरी देण्यात आली. आता कॅबिनेटच्या बैठकीत मंजुरी मिळाल्यानंतर हा निर्णय लागू करण्याची तारीख जाहीर केली जाऊ शकते.

मनीकंट्रोलच्या रिपोर्टनुसार सरकारने ईपीएफओ पगाराची मर्यादा वाढविल्यास त्याचा आर्थिक भार वाढू शकतो. कर्मचा-यांच्या पीएफ आणि पेन्शन फंडमध्ये कंपनीसोबत सरकारही कॉन्ट्रिब्यूशन करत असतं. ईपीएसमध्ये एम्पलॉयर मूळ वेतनाच्या ८.३३ टक्के तर केंद्र सरकार १.१६ टक्के योगदान देते. आर्थिक वर्ष २०२६-२७ साठी केंद्र सरकारने १११४४ कोटींचा प्रस्ताव ठेवला होता. हा नियम २० पेक्षा अधिक कर्मचारी असलेल्या कपन्यांना लागू होतो.

प्रस्ताव तातडीने लागू होणे अशक्य
कॅबिनेटनेही वित्त मंत्रालयाचा प्रस्ताव मंजूर केला तर हा प्रस्ताव तातडीने लागू होण्याची शक्यता कमी आहे. कारण कंपन्यांना त्यांच्या पेरोल सिस्टीम्स, कंम्लायन्स प्रोसेस आणि दुस-या आवश्यक कामांमध्ये बदल करण्यासाठी वेळ लागेल. त्यामुळे सरकार नव्या नियमाची अंमलबजावणी करण्यासाठी वेळ देऊ शकतो.

या आधी २०१४ मध्ये वाढविली होती मर्यादा
सरकार नव्या ईपीएफ पगाराच्या मर्यादेची अंमलबजावणी १ एप्रिल २०२७ पासून लागू करु शकते. ईपीएफओकडून सप्टेंबर २०१४ मध्ये ईपीएफ पगाराची मर्यादा ६५०० रुपयांवरून वाढवून १५ हजार रुपये केली होती. ती आता वाढवली जाण्याची शक्यता आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
भूम तालुक्यातील आंबी जयवंतनगर मार्ग बंद;देवगावरोड वरील पूल गेला वाहून,अनेक गावांचा संपर्क तुटला
00:17
Video thumbnail
Nanded|हिमायतनगरमध्ये प्रशासनाचा बुलडोझर; उमर चौक अतिक्रमणमुक्त
01:29
Video thumbnail
Viral Video: सहस्त्रकुंड धबधब्याचा मन मोहून टाकणारा ड्रोन व्ह्यू
01:28
Video thumbnail
Latur|९ ऑगस्टला नांदेडमध्ये शेतकऱ्यांचा महाएल्गार; आंदोलनाची दिशा ठरणार
01:57
Video thumbnail
Latur|भ्रष्टाचाराचा 'अंत' करण्यासाठी शेतकऱ्यांची अंत्ययात्रा! शिरूर अनंतपाळमध्ये अनोखे आंदोलन
01:26
Video thumbnail
Latur|बोगस बियाण्यांवरून रघुनाथदादा पाटील आक्रमक; कृषी कार्यालयात ठिय्या
05:21
Video thumbnail
Latur|जलजीवन मिशनची अपूर्ण कामे; ग्रामस्थांचे 'भिक मांगो' आंदोलन
01:58
Video thumbnail
Latur|पेपरफुटी प्रकरणांवर संभाजी ब्रिगेड आक्रमक; सरकारविरोधात धरणे आंदोलन
04:51
Video thumbnail
Nanded|'नाना पटोले यांना गुरू मानतो'; पाद्यपूजनावर काँग्रेस कार्यकर्त्यांचे स्पष्टीकरण
06:36
Video thumbnail
Latur|लातूर LCB ची धडाकेबाज कारवाई; घरफोडी प्रकरणाचा मोठा खुलासा
01:06
Video thumbnail
Latur|वडवळमध्ये घाणीचं साम्राज्य; ग्रामस्थांचा संताप
01:39
Video thumbnail
Purna|५० वर्षांचा गौरवशाली प्रवास! पूर्ण्यात जवाहरलाल नेहरू इंग्लिश स्कूलचा सुवर्ण महोत्सव
01:48
Video thumbnail
Latur|हैदराबादपेक्षाही भव्य? लातुरात उभारला जाणार 'स्टॅच्यू ऑफ नॉलेज'
02:14
Video thumbnail
Latur|एकमत डिजिटलच्या बातमीचा परिणाम; लातूरची सिटी बस सेवा पुन्हा सुरू
03:24
Video thumbnail
Latur|साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप
02:14

Latest news