बिहारमध्ये बालेकिल्ल्याला सुरुंग, भाजपला मोठा धक्का

बांकीपूर/दतिया : वृत्तसंस्था
देशात कॉकरोच जनता पार्टीचे आंदोलन झाल्याने सामान्यांमध्ये सत्ताधा-यांमध्ये रोष निर्माण झालेला असतानाच देशात बिहारसह काही राज्यांत विधानसभेची पोटनिवडणूक लागली. यात बिहारमधील बांकीपूरची निवडणूक सर्वाधिक चर्चेत राहिली. कारण हा भाजपचा बालेकिल्ला होता. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांचा गड असलेल्या या मतदारसंघात भाजपचा दारुण पराभव झाला. येथे जनसुराज्यचे प्रशांत किशोर विजयी झाले. यासोबतच मध्य प्रदेशातही भाजपला एक जागा गमवावी लागली. फक्त गुजरातमध्ये त्यांना विजय साकारता आला. त्यामुळे भाजपसाठी हा फार मोठा धक्का मानला जात आहे.

बिहारमधील बांकीपूर विधानसभा मतदातसंघातील पोटनिवडणुकीत जनसुराज्य पक्षाचे प्रमुख प्रशांत किशोर यांनी भाजपला मोठा धक्का देत सनसनाटी विजय मिळवला. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांच्या परंपरागत मतदारसंघात प्रशांत किशोर यांनी भाजपाचे उमेदवार निरज कुमार यांच्यावर १९ हजारांहून अधिक मतांचे मताधिक्य घेत विजय मिळवला. भाजपासाठी प्रतिष्ठेच्या असलेल्या या पोटनिवडणुकीत जनसुराज्य पक्षाचे प्रमुख प्रशांत किशोर यांनी चांगलीच रंगत आणली. या मतदारसंघात भाजप, राजद आणि जनसुराज्य या पक्षांत तिरंगी लढत झाली. मतदानानंतर आज मतमोजणी झाली. यात प्रशांत किशोर यांनी सुरुवातीपासून आघाडी मिळवली. ३२ व्या फेरीअखेर प्रशांत किशोर यांनी आपली आघाडी १९ हजारांहून अधिक वाढवत आपला विजय निश्चित केला.

मध्य प्रदेशात कॉंग्रेसचे घनश्याम सिंह विजयी
भाजपाची सत्ता असलेल्या मध्य प्रदेशात काँग्रेसने सत्ताधारी भाजपाला मोठा धक्का दिला. दतिया विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार घनश्याम सिंह यांनी भाजपाच्या आशुतोष तिवारी यांना धूळ चारली. पहिल्या फेरीत तिवारी यांनी आघाडी घेतली होती. मात्र नंतर काँग्रेसचे उमेदवार घनश्याम सिंह यांनी आघाडी घेतली आणि ६ हजार १६ मतांनी दणदणीत विजय मिळविला.

गुजरातमध्ये भाजप विजयी
गुजरातमधील वडोदरा जिल्ह्यातील मांजळपूर विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत भाजपचे उमेदवार सतेंद्रभाई पटेल उर्फ सतीश पटेल यांनी ३०,६३० मतांच्या मोठ्या फरकाने विजय मिळवला. या निवडणुकीत सतीश पटेल यांना ५५,४८१ मते मिळाली तर काँग्रेसचे उमेदवार भीखा रबारी यांना २४,८५१ मते मिळाली.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
भूम तालुक्यातील आंबी जयवंतनगर मार्ग बंद;देवगावरोड वरील पूल गेला वाहून,अनेक गावांचा संपर्क तुटला
00:17
Video thumbnail
Nanded|हिमायतनगरमध्ये प्रशासनाचा बुलडोझर; उमर चौक अतिक्रमणमुक्त
01:29
Video thumbnail
Viral Video: सहस्त्रकुंड धबधब्याचा मन मोहून टाकणारा ड्रोन व्ह्यू
01:28
Video thumbnail
Latur|९ ऑगस्टला नांदेडमध्ये शेतकऱ्यांचा महाएल्गार; आंदोलनाची दिशा ठरणार
01:57
Video thumbnail
Latur|भ्रष्टाचाराचा 'अंत' करण्यासाठी शेतकऱ्यांची अंत्ययात्रा! शिरूर अनंतपाळमध्ये अनोखे आंदोलन
01:26
Video thumbnail
Latur|बोगस बियाण्यांवरून रघुनाथदादा पाटील आक्रमक; कृषी कार्यालयात ठिय्या
05:21
Video thumbnail
Latur|जलजीवन मिशनची अपूर्ण कामे; ग्रामस्थांचे 'भिक मांगो' आंदोलन
01:58
Video thumbnail
Latur|पेपरफुटी प्रकरणांवर संभाजी ब्रिगेड आक्रमक; सरकारविरोधात धरणे आंदोलन
04:51
Video thumbnail
Nanded|'नाना पटोले यांना गुरू मानतो'; पाद्यपूजनावर काँग्रेस कार्यकर्त्यांचे स्पष्टीकरण
06:36
Video thumbnail
Latur|लातूर LCB ची धडाकेबाज कारवाई; घरफोडी प्रकरणाचा मोठा खुलासा
01:06
Video thumbnail
Latur|वडवळमध्ये घाणीचं साम्राज्य; ग्रामस्थांचा संताप
01:39
Video thumbnail
Purna|५० वर्षांचा गौरवशाली प्रवास! पूर्ण्यात जवाहरलाल नेहरू इंग्लिश स्कूलचा सुवर्ण महोत्सव
01:48
Video thumbnail
Latur|हैदराबादपेक्षाही भव्य? लातुरात उभारला जाणार 'स्टॅच्यू ऑफ नॉलेज'
02:14
Video thumbnail
Latur|एकमत डिजिटलच्या बातमीचा परिणाम; लातूरची सिटी बस सेवा पुन्हा सुरू
03:24
Video thumbnail
Latur|साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप
02:14

Latest news