उर्वरित रक्कम मिळाली नाही म्हणून खरेदीखत अवैध ठरत नाही

नवी दिल्ली : एखाद्या मालमत्तेच्­या विक्रीसाठी खरेदीखत नोंदवले जाते, तेव्हा विक्रीच्या किमतीचा काही भागच दिला गेला असला तरीही, त्­याचे मालकी हक्क खरेदीदाराकडे जातात. विक्रीच्या किमतीचा उर्वरित भाग न मिळाल्याने खरेदीखत अवैध ठरत नाही; अशा वेळी उर्वरित रक्कम वसूल करणे हाच उपाय असतो, केवळ उर्वरित रक्कम मिळाली नाही म्हणून खरेदीखत रद्द करणे हा उपाय नाही असे निरीक्षण नुकतेच सर्वोच्­च न्­यायालयाचे न्यायमूर्ती जे.बी. पारडीवाला आणि न्यायमूर्ती के. विनोद चंद्रन यांच्या खंडपीठाने नोंदवले.

दोन मालमत्ता खरेदीसाठी प्रत्­येकी ७,००० रुपये इतकी रक्कम निश्चित करण्यात आली होती. नोंदणीवेळी २,५०० रुपये देण्­यात आले होते. ४,५०५ रुपये ही रक्कम मूळ मालकाची वित्तीय संस्था आणि सरकारी विभागांतील थकबाकी भरण्यासाठी राखून ठेवण्यात आली होती. यावरुन मूळ मालकाने खरेदीखत रद्दबातल घोषित करण्यासाठी व मालकी हक्क मिळवण्यासाठी दावा दाखल केला होता. उच्च न्यायालयाचा तो निकाल रद्द करत सर्वोच्च न्यायालयाने दिवाणी न्यायालयाचा निर्णय बहाल केला. खंडपीठाने स्­पष्­ट केले की, अंशत: मोबदला मिळाल्याची पूर्ण कल्पना असताना झालेले खरेदीखत, केवळ उर्वरित रक्कम न मिळाल्याच्या कारणास्तव रद्दबातल ठरत नाही. वादींना उर्वरित रक्कम व्याजासह वसूल करण्याचा अधिकार आहे. प्रतिवादींनी इच्छित असल्यास उर्वरित रक्कम व्याजासह देऊन मालमत्तेचा ताबा मागणे आवश्यक आहे, असे स्­पष्­ट करत ताबा कायम ठेवण्याच्या कनिष्ठ न्यायालयांच्या निर्णयामध्ये सर्वोच्च न्यायालयाने कोणताही हस्तक्षेप करण्यास नकार दिला.

उच्­च न्­यायालयाने घेतला होता खरेदीखतावर आक्षेप
दिवाणी न्यायालय आणि प्रथम अपील न्यायालयाने विक्री करर्णा­याचा मालकाचा दावा फेटाळला होता. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने द्वितीय अपील अर्जात कनिष्ठ न्यायालयांचे निष्कर्ष बाजूला ठेवून खरेदीखतावर आक्षेप घेतला होता. या निकालास सर्वोच्­च न्­यायालयात आव्­हान देण्­यात आले होते.

खरेदीखताची नोंदणीवेळीच मालमत्तेची मालकी हस्­तांतरित होते
सर्वोच्­च न्­यायालयाचे न्यामूर्ती जे. बी. पारडीवाला आणि न्यामूर्ती के. विनोद चंद्रन यांच्या खंडपीठाने स्पष्ट केले की जेव्हा खरेदीखताची नोंदणी होते, तेव्हा अंशत: मोबदला दिला असला तरीही मालमत्तेची मालकी हस्तांतरित होते. उर्वरित रक्कम न मिळाल्याने खरेदीखत बेकायदेशीर किंवा अमान्य ठरत नाही. अशा प्रकरणात उर्वरित रकमेच्या वसुलीसाठी दावा करता येतो, मात्र खरेदीखत रद्द करण्याची मागणी करता येत नाही.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
जळकोटच्या आठवडी बाजारात भाजीपाला स्वस्त; खरेदीसाठी ग्राहकांची मोठी गर्दी
02:02
Video thumbnail
Latur -गवळी समाजाची 15 वर्षांची परंपरा कायम; आषाढ महोत्सवात भक्तांची गर्दी
03:25
Video thumbnail
Purna|आमदार रत्नाकर गुट्टे यांच्या वाढदिवसानिमित्त पूर्णा तालुक्यात विविध सामाजिक उपक्रम
02:40
Video thumbnail
Latur|वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी कार्यरत अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या बदल्यांसाठी संभाजी सेनेचे आंदोलन
03:44
Video thumbnail
Nanded|: 'गुंगी गुडिया' वक्तव्यावरून राष्ट्रवादी आक्रमक; हर्षवर्धन सपकाळांविरोधात जोडे मारो आंदोलन
03:29
Video thumbnail
Latur|जळकोट तालुक्यात जलस्रोत तुडुंब; पाण्याचा प्रश्न मिटला, शिवार हिरवाईने नटले
01:14
Video thumbnail
Solapur| मोहोळमध्ये संजय राऊत यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक
01:19
Video thumbnail
Latur|नांदेड–बिदर महामार्गावरील सिमेंट रस्त्याला मोठ्या भेगा; अपघाताचा धोका
00:59
Video thumbnail
Latur|शिवराज पाटील चाकूरकर यांच्या भव्य स्मारकाची तयारी; चार दिवसांत मोठा निर्णय!
03:22
Video thumbnail
Nanded|धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यावर राकेश टिकैतांचे मोठे वक्तव्य..
01:30
Video thumbnail
Latur|खरीप हंगामावर एल निनोचं सावट; शेतकऱ्यांची नजर आकाशाकडे
02:40
Video thumbnail
Latur|बोगस खत विकणाऱ्यांविरोधात शेतकऱ्यांचा एल्गार
04:25
Video thumbnail
Parbhani|परभणी-गंगाखेड महामार्गाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह;202 कोटी खर्च करूनही महामार्गाची दुरवस्था
01:21
Video thumbnail
Nanded|नांदेड हादरलं! दहावीतील विद्यार्थ्याचा वर्गमित्रावर चाकू हल्ला
02:10
Video thumbnail
भूम तालुक्यातील आंबी जयवंतनगर मार्ग बंद;देवगावरोड वरील पूल गेला वाहून,अनेक गावांचा संपर्क तुटला
00:17

Latest news