चुक केली म्हणून मोदी-शाह संसदेत यायला घाबरतायेत

नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेत यावे आणि विद्यार्थ्यांवर झालेला अन्याय, अत्याचार यावर निवेदन द्यावे. आम्ही १७ दिवसांपासून प्रयत्न करत आहोत. पंतप्रधान नरेंद्र मोदीही संसदेत येण्याऐवजी रात्री १२ वाजता इन्स्टाग्रामवर रिल बनवत आहेत. त्यांना सभागृहात येण्याची एवढी भीती का वाततेय? याचा अर्थ त्यांना कळून चुकले आहे की आपल्या हातून काहीतरी चुकीचे घडले आहे, अशी टीका राज्यसभेचे विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी केली. ते संसद परिसरामध्ये माध्यमांशी संवाद साधत होते.

मल्लिकार्जुन खरगे म्हणाले की, लोकसभेत आणि राज्यसभेत एकच मागणी आहे की, अमित शाह यांनी संसदेमध्ये यावे आणि आपले निवेदन द्यावे. आम्ही १७ दिवसांपासून प्रयत्न करतो की, शाहंनी संसदेत येऊन विद्यार्थ्यावर झालेला अन्याय, अत्याचार, मारहाण यावर निवेदन द्यावे. दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदीही रात्री १२ वाजता इन्स्टाग्रामवर रिल बनवत आहेत, पण संसदेत येत नाही. याचा अर्थ जनतेने संसदेत जे सदस्य निवडून दिले आहेत, त्याचा तुम्ही अपमान करत आहात. एकीकडे जनतेचा अपमान करत आहात आणि दुसरीकडे संविधानाप्रमाणे संसदेचे कामकाज चालायला हवे याकडेही कानाडोळा करत आहेत. त्यामुळे आमची ही मागणी आहे की, अमित शहांनी स्वत: सभागृहात यावे आणि निवेदन द्यावे.

पंतप्रधान मोदींही गृहमंर्त्यांना निवेदन द्यायला सांगावे आणि स्वत:ही द्यावे. तसेच झाल्यास गेल्या १७-१८ दिवसांपासून सुरू असलेली कोंडी फुटेल. मात्र संसद सुरळीत चालावी अशी त्यांची इच्छा नाही. त्यांना विचारलेल्या प्रश्नांचीही उत्तरे द्यायची नाहीत. त्यांना भीती वाटतेय. कशाची भीती वाटतेय? असा सवालही खरगे यांनी केला.

तोंड दाखवायला जागा नाही
आपण काहीतरी चुकीचे केलेय, असे वाटत असल्यानेच मोदी-शाह संसदेत येत नाहीत. संपूर्ण देशात विद्यार्थी, तरुण त्यांच्या विरोधात रस्त्यावर उतरले आहेत. त्यामुळे ते कुणालाही आपले तोंड दाखवायला तयार नाहीत. पेपरमध्ये रोज जाहिराती येत आहेत, पण संसदेत चेहरा दाखवत नाहीत. राज्यसभा, लोकसभेतही आपला चेहरा दाखवा असे आवाहन खरगे यांनी केले.

जनतेच्या प्रश्नांवर कानाडोळा
सत्ताधा-यांना जनतेच्या प्रश्नाचे काहीही पडलेले नाही. तरुण, विद्यार्थी यांच्या समस्यांवरही त्यांना तोडगा काढायचा नाही. त्यामुळे एकतर संसदेत येऊ निवेदन द्या नाही तर राजीनामा द्या. संसदेत येऊन तुम्ही बोलायला तयार नसाल तर राजीनामा द्या अशी मागणीही मल्लिकार्जुन खरगे यांनी केली.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
जळकोटच्या आठवडी बाजारात भाजीपाला स्वस्त; खरेदीसाठी ग्राहकांची मोठी गर्दी
02:02
Video thumbnail
Latur -गवळी समाजाची 15 वर्षांची परंपरा कायम; आषाढ महोत्सवात भक्तांची गर्दी
03:25
Video thumbnail
Purna|आमदार रत्नाकर गुट्टे यांच्या वाढदिवसानिमित्त पूर्णा तालुक्यात विविध सामाजिक उपक्रम
02:40
Video thumbnail
Latur|वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी कार्यरत अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या बदल्यांसाठी संभाजी सेनेचे आंदोलन
03:44
Video thumbnail
Nanded|: 'गुंगी गुडिया' वक्तव्यावरून राष्ट्रवादी आक्रमक; हर्षवर्धन सपकाळांविरोधात जोडे मारो आंदोलन
03:29
Video thumbnail
Latur|जळकोट तालुक्यात जलस्रोत तुडुंब; पाण्याचा प्रश्न मिटला, शिवार हिरवाईने नटले
01:14
Video thumbnail
Solapur| मोहोळमध्ये संजय राऊत यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक
01:19
Video thumbnail
Latur|नांदेड–बिदर महामार्गावरील सिमेंट रस्त्याला मोठ्या भेगा; अपघाताचा धोका
00:59
Video thumbnail
Latur|शिवराज पाटील चाकूरकर यांच्या भव्य स्मारकाची तयारी; चार दिवसांत मोठा निर्णय!
03:22
Video thumbnail
Nanded|धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यावर राकेश टिकैतांचे मोठे वक्तव्य..
01:30
Video thumbnail
Latur|खरीप हंगामावर एल निनोचं सावट; शेतकऱ्यांची नजर आकाशाकडे
02:40
Video thumbnail
Latur|बोगस खत विकणाऱ्यांविरोधात शेतकऱ्यांचा एल्गार
04:25
Video thumbnail
Parbhani|परभणी-गंगाखेड महामार्गाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह;202 कोटी खर्च करूनही महामार्गाची दुरवस्था
01:21
Video thumbnail
Nanded|नांदेड हादरलं! दहावीतील विद्यार्थ्याचा वर्गमित्रावर चाकू हल्ला
02:10
Video thumbnail
भूम तालुक्यातील आंबी जयवंतनगर मार्ग बंद;देवगावरोड वरील पूल गेला वाहून,अनेक गावांचा संपर्क तुटला
00:17

Latest news