दिल्ली विधानसभेत टी-शर्टमुळे वाद

नवी दिल्ली : दिल्ली विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाच्या दुस-या दिवशी सभागृहात तुफान गदारोळ पाहायला मिळाला. कामकाजाला सुरुवात झाल्यानंतर अवघ्या काही मिनिटांतच आम आदमी पार्टीच्या ६ आमदारांना मार्शलच्या मदतीने विधानसभेतून बाहेर काढण्यात आले. आमदारांनी परिधान केलेल्या आक्षेपार्ह टी-शर्टमुळे हा वाद पेटला होता.

अधिवेशनाचा दुसरा दिवस सुरू होताच आपचे आमदार विधानसभेत विशिष्ट टी-शर्ट घालून आले होते. उपसभापती मोहन सिंग बिष्ट यांनी या टी-शर्टवर सर्वात आधी तीव्र आक्षेप नोंदवला. आम आदमी पार्टीच्या आमदारांनी भाजप सरकारच्या काळात झालेल्या सायकल घोटाळ्याविरोधात जोरदार घोषणाबाजी सुरू केली आणि सभागृहाचे कामकाज रोखण्याचा प्रयत्न केला. यानंतर सभागृहाचे नियम मोडल्याप्रकरणी आणि शिस्तभंग केल्याप्रकरणी ६ आमदारांना मार्शलकरवी बाहेर काढण्यात आले.

संजीव झा, जरनैल सिंग, कुलदीप कुमार, प्रेम कुमार, सोम दत्त आणि अजय दत्त अशी विधानसभेतून बाहेर काढण्यात आलेल्या आपच्या सहा आमदारांची नावे आहेत. सततच्या सूचनेनंतरही गदारोळ न थांबल्याने मंत्री प्रवेश साहिब सिंग यांनी अध्यक्षांकडे या आमदारांवर कारवाई करण्याची मागणी केली होती. यावर अध्यक्ष विजेंद्र गुप्ता यांनी कठोर पाऊल उचलत आमदारांना बाहेर काढण्याचे आदेश दिले. विरोधी पक्षाने जनहिताच्या महत्त्वाच्या चर्चेत अडथळा आणला आहे. विधानसभेच्या नियमांनुसार सभागृहात असंसदीय भाषा किंवा वर्तन खपवून घेतले जाणार नाही. विरोधकांनी हे लक्षात ठेवावे, असे विधानसभा अध्यक्ष म्हणाले. तसेच यावेळी अध्यक्षांनी विरोधी पक्षनेत्या आतिशी यांच्या गैरहजेरीवरही बोट ठेवले. विरोधी पक्षनेत्या आतिशी यांनी सभागृहात उपस्थित असायला हवे होते. विरोधकांनी आधी त्यांचा नेता कोण आहे हे ठरवावे, असेही अध्यक्ष म्हणाले.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
जळकोटच्या आठवडी बाजारात भाजीपाला स्वस्त; खरेदीसाठी ग्राहकांची मोठी गर्दी
02:02
Video thumbnail
Latur -गवळी समाजाची 15 वर्षांची परंपरा कायम; आषाढ महोत्सवात भक्तांची गर्दी
03:25
Video thumbnail
Purna|आमदार रत्नाकर गुट्टे यांच्या वाढदिवसानिमित्त पूर्णा तालुक्यात विविध सामाजिक उपक्रम
02:40
Video thumbnail
Latur|वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी कार्यरत अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या बदल्यांसाठी संभाजी सेनेचे आंदोलन
03:44
Video thumbnail
Nanded|: 'गुंगी गुडिया' वक्तव्यावरून राष्ट्रवादी आक्रमक; हर्षवर्धन सपकाळांविरोधात जोडे मारो आंदोलन
03:29
Video thumbnail
Latur|जळकोट तालुक्यात जलस्रोत तुडुंब; पाण्याचा प्रश्न मिटला, शिवार हिरवाईने नटले
01:14
Video thumbnail
Solapur| मोहोळमध्ये संजय राऊत यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक
01:19
Video thumbnail
Latur|नांदेड–बिदर महामार्गावरील सिमेंट रस्त्याला मोठ्या भेगा; अपघाताचा धोका
00:59
Video thumbnail
Latur|शिवराज पाटील चाकूरकर यांच्या भव्य स्मारकाची तयारी; चार दिवसांत मोठा निर्णय!
03:22
Video thumbnail
Nanded|धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यावर राकेश टिकैतांचे मोठे वक्तव्य..
01:30
Video thumbnail
Latur|खरीप हंगामावर एल निनोचं सावट; शेतकऱ्यांची नजर आकाशाकडे
02:40
Video thumbnail
Latur|बोगस खत विकणाऱ्यांविरोधात शेतकऱ्यांचा एल्गार
04:25
Video thumbnail
Parbhani|परभणी-गंगाखेड महामार्गाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह;202 कोटी खर्च करूनही महामार्गाची दुरवस्था
01:21
Video thumbnail
Nanded|नांदेड हादरलं! दहावीतील विद्यार्थ्याचा वर्गमित्रावर चाकू हल्ला
02:10
Video thumbnail
भूम तालुक्यातील आंबी जयवंतनगर मार्ग बंद;देवगावरोड वरील पूल गेला वाहून,अनेक गावांचा संपर्क तुटला
00:17

Latest news