लातूर : प्रतिनिधी
शहरातील प्रभाग क्रमांक १६ मधील सिंहगड सोसायटीतील विविध विकास कामांना मंजूरी मिळणेबाबतचे राज्याचे माजी मंत्री, आमदार अमित विलासराव देशमुख यांचे पत्र लातूर शहर महानगरपालिका आयुक्तांना लातूर शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष प्रा. डॉ. शिवाजीराव जवळगेकर यांनी दिले.
सिंहगड सोसायटीतील सिंहगड गणेश मंडळाचे अध्यक्ष अविनाश बट्टेवार यांनी लातूर शहर महानगरपालिका अंतर्गत प्रभाग क्रमांक १६ मधील कन्हेरी चौक येथे सातत्याने अनेक अपघात होऊन नागरिकांना जीव गमवावे लागले आहे. यामुळे या चौकात सिग्नल बसवावे, पांडूरंग काबरा यांच्या घरापासून ते शंकर कलंत्री यांच्या घरापर्यंत नवीन सिमेंट काँक्रीट रस्ता करावा, प्रभाकर मोरे यांच्या घरापासून ते प्रकाश भारती यांच्या घरापर्यंत नवीन सिमेंट काँक्रीट रस्ता करावा, बबन भोसले यांच्या घरासमोर ते अनिल झंवर यांच्या घरापर्यंत नवीन सिमेंट काँक्रीट नाली करावी, असे पत्रात नमुद करण्यात आले असून सदर पत्र लातूर शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष प्रा. डॉ. शिवाजीराव जवळगेकर यांनी मनपा आयुक्त राहूल कुलकर्णी यांना दिले. त्यावेळी उपायुक्त पंजाब खानसोळे, अविनाश बट्टेवार उपस्थित होते.
















