नावंदीच्या शेतात ‘तिर्रट’ जुगारावर छापा

लातूर : प्रतिनिधी
लातूर जिल्ह्यातील लपून-छपून चालणा-या अवैध जुगार अड्ड्यांविरुद्ध कारवाईची मोहीम अधिक तीव्र करत स्थानिक गुन्हे शाखेने नावंदी (ता. उदगीर) येथे सुरू असलेल्या ‘तिर्रट’ जुगारावर धडक कारवाई केली. या कारवाईत जुगार खेळणा-या ९ जणांपैकी पाच जणांना ताब्यात घेण्यात आले असून १५ लाख २ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. कारवाईदरम्यान पोलिसांची चाहूल लागताच चार जण घटनास्थळावरून पसार झाले असून, त्यांचा शोध सुरू आहे.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील पथकाला वाढवना पोलीस ठाणे हद्दीतील नावंदी गावातील एका शेतातील चिंचेच्या झाडाखाली मोकळया जागेत काही जण ‘तिर्रट’ नावाचा जुगार खेळत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दुपारी सुमारे ३ वाजता अचानक छापा टाकला. यावेळी काही जण पोलिसांची चाहूल लागताच पळून गेले; मात्र ५ जण पोलिसांच्या हाती लागले. आरोपींकडून जुगाराचे पत्ते, रोख रक्कम आणि मोबाईल फोन आढळून आले. तसेच जुगार खेळण्यासाठी ये-जा करण्यासाठी वापरण्यात आलेली वाहने देखील पोलिसांनी ताब्यात घेतली असून १५ लाख २ हजार ४००  रुपयेचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
या कारवाईत माधव भुजंग मोतेवाड (वय ४५), रा. सोमनाथपूर, उदगीर, आसीफ सिकंदर मजकुरी (वय २७), रा. लासूना, ता. देवणी, ह.मु. बनशेळकी रोड, उदगीर, सुदर्शनदेव मुलशंकर कापसे (वय २४), रा. नळगीर, ता. उदगीर, महेबुब युसुफ शेख (वय ३९), रा. नळगीर, ता. उदगीर, बालाजी गोविंदराव गुट्टे (वय ७२), रा. गुट्टेवाडी, ता. उदगीर आरोपींनी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
सदर कारवाई वरिष्ठांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर, स्थानिक गुन्हे शाखा, लातूर यांच्या नेतृत्वातील पथकामधील पोलीस उपनिरीक्षक अमर केंद्रे, पोलीस अंमलदार साहेबराव हाके, संजय कांबळे, रसूल पठाण, अर्जुन राजपूत, सूर्यकांत कलमे, मनोज खोसे, तुळशीराम बरुरे, पाराजी पुठेवाड, प्रेमदास राठोड व चंद्रकांत केंद्रे यांनी केली आहे.सदर प्रकरणी महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम, कलम १२ (अ) अन्वये कायदेशीर कारवाई करण्यात आली असून, पुढील तपास वाढवणा पोलीस ठाणे करीत आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
जळकोटच्या आठवडी बाजारात भाजीपाला स्वस्त; खरेदीसाठी ग्राहकांची मोठी गर्दी
02:02
Video thumbnail
Latur -गवळी समाजाची 15 वर्षांची परंपरा कायम; आषाढ महोत्सवात भक्तांची गर्दी
03:25
Video thumbnail
Purna|आमदार रत्नाकर गुट्टे यांच्या वाढदिवसानिमित्त पूर्णा तालुक्यात विविध सामाजिक उपक्रम
02:40
Video thumbnail
Latur|वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी कार्यरत अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या बदल्यांसाठी संभाजी सेनेचे आंदोलन
03:44
Video thumbnail
Nanded|: 'गुंगी गुडिया' वक्तव्यावरून राष्ट्रवादी आक्रमक; हर्षवर्धन सपकाळांविरोधात जोडे मारो आंदोलन
03:29
Video thumbnail
Latur|जळकोट तालुक्यात जलस्रोत तुडुंब; पाण्याचा प्रश्न मिटला, शिवार हिरवाईने नटले
01:14
Video thumbnail
Solapur| मोहोळमध्ये संजय राऊत यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक
01:19
Video thumbnail
Latur|नांदेड–बिदर महामार्गावरील सिमेंट रस्त्याला मोठ्या भेगा; अपघाताचा धोका
00:59
Video thumbnail
Latur|शिवराज पाटील चाकूरकर यांच्या भव्य स्मारकाची तयारी; चार दिवसांत मोठा निर्णय!
03:22
Video thumbnail
Nanded|धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यावर राकेश टिकैतांचे मोठे वक्तव्य..
01:30
Video thumbnail
Latur|खरीप हंगामावर एल निनोचं सावट; शेतकऱ्यांची नजर आकाशाकडे
02:40
Video thumbnail
Latur|बोगस खत विकणाऱ्यांविरोधात शेतकऱ्यांचा एल्गार
04:25
Video thumbnail
Parbhani|परभणी-गंगाखेड महामार्गाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह;202 कोटी खर्च करूनही महामार्गाची दुरवस्था
01:21
Video thumbnail
Nanded|नांदेड हादरलं! दहावीतील विद्यार्थ्याचा वर्गमित्रावर चाकू हल्ला
02:10
Video thumbnail
भूम तालुक्यातील आंबी जयवंतनगर मार्ग बंद;देवगावरोड वरील पूल गेला वाहून,अनेक गावांचा संपर्क तुटला
00:17

Latest news