औसा : प्रतिनिधी
औसा येथील हिरेमठ संस्थांनच्या ८६ व्या वार्षिक महोत्सवात रविवार दि.९ ऑगस्ट रोजी श्रीक्षेत्र उज्जैन पिठाचे जगद्गुरू श्री श्री श्री सिद्धलिंगराज देशीकेंद्र शिवाचार्य महास्वामीजी यांच्या सानिध्यात डॉ शांतविरलिंग शिवाचार्य महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थांनचे पिठाधिपती बाल तपस्वी निरंजन शिवाचार्य महाराज यांच्या हस्ते महाराष्ट्र कर्नाटक तेलंगणा आणि आंध्रप्रदेशमधील हजारो शिवभक्तांनी शास्त्रोक्त वेद मंत्रोच्चाराच्या निनादा मध्ये शिवदीक्षा घेतली.
८५ वर्षापासून लि. गुरु निरंजन शिवाचार्य महाराज यांनी सुरू केलेली परंपरा अखंडपणे कायम राखत गुरु पौर्णिमेपासून सुरू झालेल्या ७६ व्या वार्षिक महोत्सवात सिद्धांत शिखामणी ‘ग्रंथाचे पारायण मार्ग हा मुक्तीचा’ या ग्रंथाचे विवेचन अखंड शिवपाठ सप्ताह कालावधीत प्रख्यात शिवभक्त परायण महाराजांचे शिव कीर्तन सद्गुरू पावन समाधीस लघु रुद्र अभिषेक इष्टलिंग महापूजा आणि दीक्षा सोहळ्याच्या कार्यक्रमात भाविक भक्तांनी अत्यंत हर्षउल्हासाने सहभाग घेतला. समाजामध्ये विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कामगिरी केलेल्या मान्यवरांचा हिरेमठ संस्थान पुरस्कार यावर्षी प्रथमच सुरू करण्यात आला असून यामध्ये औसा विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार म्हणून अभिमन्यू पवार तसेच उमरगा विधानसभा मतदारसंघाचे गुरुभक्त आमदार प्रवीण स्वामी यांचा सत्कार करण्यात आला. आषाढ मासी वार्षिक महोत्सवात दानशूर सदभक्तांच्या वतीने हजारो शिवभक्तांना मोठी सेवा देण्यात आल्याने संस्थानच्या शिव दीक्षा सोहळ्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे . वार्षिक महोत्सवाच्या यशस्वीतेसाठी वीरशैव समाज व वीरशैव युवक समाज बांधव प्रयशील आहेत.
















