लातूर : प्रतिनिधी
येथील ख्यातनाम वंध्यत्व निवारण व प्रसूतिशास्त्र तज्ज्ञ डॉ. कल्याण बरमदे यांची अखिल भारतीय स्त्रीरोग व प्रसूतिशास्त्र संघटनेच्या उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे. अखिल भारतीय स्त्रीरोग व प्रसूतिशास्त्र संघटना ही भारतातील स्त्रीरोग व प्रसूतिशास्त्र क्षेत्रातील डॉक्टरांची एक अग्रगण्य राष्ट्रीय संघटना आहे. देशभरातील २९५ सदस्य संघटनांच्या माध्यमातून ४७ हजारांहून अधिक स्त्रीरोग व प्रसूतिशास्त्र तज्ज्ञ डॉक्टरांना एकत्र आणण्याचे काम या संघटनेच्या माध्यमातून सातत्याने केले जाते.
या संघटनेच्या उपाध्यक्षपदी लातूरच्या बरमदे हॉस्पिटलचे संचालक डॉ. कल्याण बरमदे यांची बिनविरोध निवड होणे ही केवळ लातूर – मराठवाडाच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी अभिमानास्पद बाब आहे. डॉ. कल्याण बरमदे यांनी आतापर्यंत हजारो अपत्यहिन दांपत्यांच्या जीवनात अपत्यप्राप्तीचा आनंद प्रदान करण्याचे काम केले आहे. त्यांच्याकडे महाराष्ट्रातीलच नव्हे तर शेजारच्या अंधार प्रदेश, तेलंगाणा , कर्नाटकातील रुग्णही मोठ्या संख्येने उपचारासाठी येतात. डॉ. कल्याण बरमदे यांच्या या निवडीबद्दल वैद्यकीय क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
















