मुंबई : प्रतिनिधी
दाक्षिणात्य सुपरस्टार यश चा नवीन क्राईक थ्रिलर टॉक्सिक चित्रपट प्रदर्शित झाला असून या चित्रपटाची देशभरात जोरदार चर्चा आहे. केजीएफच्या घवघवीत यशानंतर आता यशचा टक्सिक बॉक्स ऑफिसवर आग लावण्यासाठी सज्ज झाला आहे. या चित्रपटाने अपेक्षेप्रमाणे पहिल्याच दिवशी धडाक्यात सुरूवात केली आहे. पहिल्याच दिवशी टॉक्सिक हा १०० कोटींच्या क्लबमध्ये सामील झाला. त्याने फर्स्ट डे कलेक्शनमध्ये तब्बल ४ चित्रपटांना मागे टाकले.
बॉक्स ऑफिस कलेक्शनबाबत माहितीनुसार टॉक्सिकने पहिल्या दिवशी १०१.१० कोटी निव्वळ कमाई केली आहे. तर या चित्रपटाचा ग्रॉस कमाईचा आकडा हा १२०.७५ कोटी रूपये आहे. वर्ल्डवाईड या चित्रपटाने पहिल्या दिवशी १४०.७५ कोटींची कमाई केली आहे.
टॉक्सिक चित्रपट भारताच्या टॉप १० ओपनिंग करणा-या चित्रपटात सामील झाला आहे. टॉक्सिक हा भारतात पहिल्या दिवशी सर्वाधिक कमाई करणा-या चित्रपटांच्या यादीत ६ व्या क्रमांकावर पोहचला आहे. त्याने चार चित्रपटांना मागे टाकले आहे. टॉक्सिकने पहिल्या दिवशी कल्की २८९८ एडीपेक्षा जास्त कमाई केली आहे. त्याचबरोबर टॉक्सिकने सालार, आदिपुरूष आणि साहो या चित्रपटांना मागे टाकले आहे.
यशचा १०० क्लबमध्ये सलग दुसरा चित्रपट
यशचा टॉक्सिक हा सलग दुसरा चित्रपट आहे ज्याने पहिल्या दिवशी १०० कोटी रूपयांची कमाई करून दिली आहे. २०२२ मध्ये रिलीज झालेल्या ‘केजीएफ – २’ ने पहिल्या दिवशी ११६ कोटी रूपयांची कमाई केली होती. केजीएफ बॉक्स ऑफिसवर चांगला हिट ठरला होता. टॉक्सिकचे देखील ऑपनिंग कलेक्शन यशचा अजून एक चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालणार याचे संकेत देत आहे. यशचा ‘टॉक्सिक’ हा चित्रपट गीतू मोहनदास यांनी दिग्दर्शित केला आहे. यशसोबत या चित्रपटात हुमा कुरैशी, नयनतारा आणि कियारा अडवाणी हे कलाकार आहेत.
…….
















