१२० रुग्णांची नेत्र तपासणी; ४२ जणांवर उद्या मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया

लातूर : प्रतिनिधी
तालुक्यातील भातांगळी येथील ग्रामपंचायत कार्यालयात रोटरी क्लब ऑफ लातूर मेट्रो आणि शंकर शेठ साबळे नेत्रालय यांच्या संयुक्त विद्यमाने नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरास ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. एकूण १२० रुग्णांची नेत्र तपासणी करण्यात आली असून, त्यापैकी ४२ रुग्णांना मोतीबिंदूचे निदान झाले आहे. या सर्व रुग्णांवर येत्या ३० ऑगस्ट रोजी मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे.
शंकर शेठ साबळे नेत्र रुग्णालयाचे डॉ. महेश पवार, डॉ. सिंधुताई शिंदे आणि सहाय्यक आकाश सावंत यांनी रुग्णांची तपासणी करून त्यांना आवश्यक मार्गदर्शन केले. याचवेळी रोटरी क्लब ऑफ लातूर मेट्रो आणि प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने नशामुक्ती अभियानांतर्गत सामूहिक शपथविधी घेण्यात आला. यावेळी व्यसनाचे दुष्परिणाम याबाबत उपस्थितांना मार्गदर्शन करण्यात आले. तसेच ग्रामपंचायत कार्यालयासमोरील जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणात रक्तदान शिबिराचेही आयोजन करण्यात आले.
या तीनही उपक्रमांना ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, सदस्य, जिल्हा परिषद हायस्कूलचे मुख्याध्यापक, शिक्षक आणि ग्रामस्थांनी उत्स्फूर्त सहकार्य केले. ग्रामपंचायत भातागळीचे सरपंच परमेश्वर पाटील यांचे प्रतिनिधी भागवत गरड तसेच जिल्हा परिषद हायस्कूलचे किशोर गायकवाड यांनी विशेष सहकार्य केले. रोटरी क्लब ऑफ लातूर मेट्रोचे अध्यक्ष विजय कोळी, सचिव मनोज सूर्यवंशी, सहसचिव दत्ता बेडके, प्रोजेक्ट चेअरमन विकास कातपुरे यांच्यासह अनेक रोटरी सदस्य उपस्थित होते. प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या नंदाबहनजी, पुण्या बहनजी यांच्यासह  पदाधिकारी व कार्यकर्तेही उपस्थित होते. नेत्र तपासणी, नशामुक्ती आणि रक्तदान अशा तीन सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून भातांगळी ग्रामस्थांना आरोग्यसेवेचा लाभ मिळाल्याने ग्रामस्थांनी रोटरी क्लब ऑफ लातूर मेट्रोसह सर्व आयोजक व सहकार्य करणा-या व्यक्तींचे मन:पूर्वक आभार मानले.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Nanded|नारळी पौर्णिमेला माहूर गडावर भाविकांची अलोट गर्दी; हजारो जण पायी दत्त शिखराकडे
00:39
Video thumbnail
Latur|बुलेटवर फटाका वाजवताय? सावधान! लातूर पोलिसांची थेट कारवाई
01:47
Video thumbnail
Latur|लातूरकरांनो लक्ष द्या! १ सप्टेंबरपासून महामार्गावर हेल्मेट सक्ती;हेल्मेट नाही तर दंड
02:38
Video thumbnail
Nanded Murder|नांदेडमध्ये रक्तरंजित थरार! जुन्या वादातून तरुणाचा खंजरने खून
00:50
Video thumbnail
Latur|नांदगाव ग्रामसभेत मोठा गोंधळ! प्रश्नांवरून सत्ताधारी-विरोधक भिडले
07:02
Video thumbnail
PARBHANI|गौरवाच्या क्षणांची साक्ष... सन्मानार्थींच्या प्रतिक्रिया
31:41
Video thumbnail
NANDED|एकमतच्या सन्मानाची... सन्मानार्थींच्या मनातील भावना
45:46
Video thumbnail
DHARASHIV|गौरवाच्या क्षणांची साक्ष... सन्मानार्थींच्या प्रतिक्रिया
42:06
Video thumbnail
Solapur|एकमत वर्धापन गौरव २०२६... सन्मानार्थींच्या प्रतिक्रिया
28:21
Video thumbnail
वर्धापन दिन । पुरोगामी विचाराचे एकमत - परभणी
02:04:02
Video thumbnail
वर्धापन दिन । पुरोगामी विचाराचे एकमत - नांदेड
02:12:44
Video thumbnail
वर्धापन दिन । पुरोगामी विचाराचे एकमत - धाराशिव
02:10:21
Video thumbnail
वर्धापन दिन । पुरोगामी विचाराचे एकमत- सोलापूर
02:13:30
Video thumbnail
LATUR|एकमतच्या 35 व्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने सत्त्कारमूर्तींच्या प्रतिक्रिया
21:01
Video thumbnail
Nanded|शेतात मोठा खड्डा अन् आत देवीची मूर्ती! नायगावमध्ये नेमकं गूढ काय?
00:52

Latest news