३ हजारांवर नागरिक बेपत्ता

भारताचे २७५ लोक सापडेनात, नेपाळमधील प्रलयबळी ९०३ वर
काठमांडू : वृत्तसंस्था
नेपाळमधील जलप्रलयातील मृतांची संख्या रविवारी ७८८ वर पोहोचली. सुमारे ३ हजारहून अधिक जण अद्याप बेपत्ता असून, यामध्ये ५५० विदेशी नागरिकांचाही समावेश आहे. त्यांचा शोध अद्याप सुरू आहे. पूरग्रस्त ८ जिल्ह्यांमध्ये विविध यंत्रणांचे सुमारे २० हजार कर्मचारी बचावकार्यात गुंतले असून, त्यांची कसरत सुरू आहे. दरम्यान, भोटेकोशी नदीच्या पाणीपातळीत रविवारी वाढ झाल्याने पूरग्रस्त भागांत पुन्हा पुराची शक्यता केली होती. त्यामुळे नदी काठावरील लोकांना सुरक्षितस्थळी हलविले होते.

भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले की, नेपाळमध्ये १४९ भारतीय नागरिकांना वाचविण्यात यश आले. परंतु अजूनही २७५ भारतीय नागरिक बेपत्ता तर १२८ भारतीय नागरिकांशी अद्याप संपर्क होऊ शकला नाही. त्यांचा संपर्क करण्याचा प्रयत्न सुरू आहे. मानसरोवर यात्रेला गेलेले २२ पर्यटक बेपत्ता आहेत. त्यांचा शोध बचाव पथक घेत आहे. त्यातच नद्यांचा जलस्तर अजून वाढत आहे. नेपाळमध्येही महापुराचे संकट आले आहे. त्यामुळे नेपाळला लागून असलेल्या उत्तर प्रदेशातील महाराजगंज आणि कुशीनगर जिल्ह्यात हायअलर्ट जारी केला आहे.

नेपाळमधील महापुराच्या तडाख्यातून १४९ नागरिकांना वाचविण्यात यश आले आहे. परंतु अजूनही तब्बल २७५ भारतीय नागरिक बेपत्ता आहेत तर मूळ भारतीय असलेल्या १२८ लोकांशी अद्याप संपर्क होऊ शकलेला नाही. त्यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे परराष्ट्र मंत्रालयाच्या वतीने सांगण्यात आले.

महाराष्ट्रीतील
६७ जण बेपत्ता
नेपाळ-तिबेट प्रदेशात बसलेल्या महापुराच्या तडाख्यात महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतील पर्यटक, नागरिकही अडकले आहेत. यातील ६७ जणांचा अद्याप संपर्क होऊ शकला नाही. त्यांचा शोध घेण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. राज्यातील एकूण बाधितांची संख्या ४०५ आहे. यापैकी २६२ नागरिकांना राज्यात आणण्यासाठी कार्यवाही सुरू आहे. उर्वरित ७६ जण संपर्कात असून, ते सुरक्षित आहेत.

भारताचे बोगदा
बचाव पथक तैनात
नेपाळमध्ये आलेल्या पुरामुळे जलविद्युत प्रकल्पांच्या बोगद्यांमध्ये अडकलेल्या कामगारांना वाचवण्यासाठी भारताने आपले न्यायवैद्यक आणि बोगदा बचाव पथकही तैनात केले. भारतीय परराष्ट्र मंत्रालयाच्या माहितीनुसार १९ सदस्यांच्या भारतीय न्यायवैद्यक पथकाने काठमांडूमध्ये कामाला सुरुवात केली. हे पथक पूरग्रस्तांच्या मृतदेहांची ओळख पटवण्यासाठी डीएनए नमुन्यांची चाचणी करण्यास मदत करेल. दरम्यान, भारतीय बोगदा बचाव पथकाने चिलिमे आणि लांगटांग जलविद्युत प्रकल्पांमधील शोध आणि बचाव कार्यात नेपाळ लष्कराला मदत केली.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur Accident|रेणापूर हादरलं! एकाच कुटुंबातील तिघांचा भीषण अपघातात मृत्यू
00:44
Video thumbnail
LIVE-वैभवलक्ष्मी सहकार भूषण पुरस्कार सोहळा
00:00
Video thumbnail
LIVE-वैभवलक्ष्मी सहकार भूषण पुरस्कार सोहळा
02:08:35
Video thumbnail
Latur Contractar Sucide|कंत्राटदाराच्या मृत्यूचं गूढ डायरीत? ११ जणांवर गुन्हे दाखल!
02:59
Video thumbnail
Latur|“58 पोलिसांवर कारवाई... आता लातूरकरांचा नंबर? 1 सप्टेंबरपासून हेल्मेटसक्तीचा कडक नियम!”
07:09
Video thumbnail
Latur|आई आणि दोन चिमुकले मृत्यूच्या दारातून परतले; नागरिकांनी दाखवलं धाडस
06:02
Video thumbnail
Latur|नियम नसतील तर मनमानी? क्लासेस चालकांना विरोधकांचा सवाल
03:49
Video thumbnail
Latur|लातूरमध्ये क्लासेस चालकांचा एल्गार! शासनाच्या प्रस्तावित कायद्याविरोधात आंदोलन
03:03
Video thumbnail
Nanded|आरोपीला घेऊन निघाले पोलिस, वाटेत झाला हल्ला अन् आरोपी झाला पसार!
01:16
Video thumbnail
Nanded|धनगर समाजाचा सरकारला अल्टिमेटम! 17 सप्टेंबरला परभणीत एल्गार
01:53
Video thumbnail
Latur|हेल्मेट सक्तीचा निर्णय आणि व्यापाऱ्यांची ‘एन्ट्री’ थेट नागपूरहून!
05:16
Video thumbnail
Latur|हा रस्ता आहे की तळं? पाहा लातूरच्या मुख्य चौकाची अवस्था
04:09
Video thumbnail
Latur Ground Report|रस्ता की तळं? दमदार पावसानंतर सिद्धेश्वर मंदिरामागील रस्ता पाण्यात!
02:45
Video thumbnail
Nanded| उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या दौऱ्यापूर्वी नांदेडमध्ये मराठा आंदोलन! ‘वापस जा’च्या घोषणा
01:58
Video thumbnail
LATUR|पाऊस बरसला... पिकांना नवसंजीवनी; मात्र पाणीटंचाईची चिंता कायम
02:01

Latest news