मुंबई : प्रतिनिधी
महाराष्ट्राचे अन्न आणि औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे हे गेल्या काही महिन्यांपासून चर्चेत आहेत. अनेक भेसळ कंपन्यांविरोधात त्यांनी कारवाईचा बडगा उगारला. ‘एफडीए’च्या टीमने अनेक दुकान आणि कंपन्यांमध्ये कारवाईचा सपाटा लावला. छोट्या स्टॉल्सपासून ते फाइव्ह स्टार हॉटेल्सवर धाडी टाकल्यानंतर पदार्थांचे रंगच बदलले. भेसळ नसलेले पदार्थ आता खवय्यांना खायला मिळत आहे. हे बदल घडल्यानंतर तुकाराम मुंढेंवर विशेष कौतुकाचा वर्षाव केला जात आहे.
सिनेकलाकारांनी तुकाराम मुंढे यांचं कौतुक केले. विशेषत: काही सिने कलाकार तुकाराम मुंढेंच्या कामाचे फॅन झाले आहेत. ब-याच मुलाखतींमध्ये तुकाराम मुंढेंचं कलाकारांकडून कौतुक केले जात आहे. रविना टंडन, ट्विंकल खन्ना , अशा लोकप्रिय सिने अभिनेत्रींनी तुकाराम मुंढेंच्या धडाकेबाज कामगिरीची प्रशंसा केली आहे.
दरम्यान, आता ९०च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री प्रिती झिंटा ही देखील तुकाराम मुंढेंची फॅन झाली असल्याचं दिसत आहे. तिचा एक व्हिडीओ सोशल मीडियात तुफान व्हायरल होत आहे.
















