पूनम ढिल्लो, पद्मिनी कोल्हापुरे आणि उपासना सिंग आमने-सामने

मुंबई : सिने अँड टीव्ही आर्टिस्ट्स असोसिएशन मधील अंतर्गत वाद आता चव्हाट्यावर आला आहे. संघटनेच्या कथित हरवलेल्या कागदपत्रांवरून अभिनेत्री पूनम ढिल्लो, पद्मिनी कोल्हापुरे, उपासना सिंग यांच्यासह काही सदस्यांमध्ये जोरदार वाद झाल्याचा व्हीडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्याचे पाहून मुंबई पोलिसांना सिने अँड टीव्ही आर्टिस्ट्स असोसिएशन च्या कार्यालयात हस्तक्षेप करावा लागला.
हा वाद अधिक वाढल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून परिस्थिती शांत करण्याचा प्रयत्न केला. पोलिस अधिका-याने सदस्यांना आवाज कमी करून पोलिसांचे म्हणणे ऐकण्यास सांगितले. तसेच, सार्वजनिक ठिकाणी अशा प्रकारे वाद घालणे टाळावे, असेही त्यांनी बजावले, असे वृत्त दिले आहे.

व्हायरल व्हीडीओमध्ये पद्मिनी कोल्हापुरे, उपासना सिंग, प्रीती सप्रू, कुनिका सदानंद आणि इतर सदस्यांमध्ये तणावपूर्ण चर्चा होताना दिसत आहे. सिने अँड टीव्ही आर्टिस्ट्स असोसिएशन ची समिती बरखास्त झाल्याच्या दाव्यावर पद्मिनी यांनी प्रश्न उपस्थित करत, समिती बरखास्त झाल्याचा आदेश दाखवण्याची मागणी केली. या मुद्यावरून वाद अधिकच वाढला. उपासना सिंग आणि प्रीती सप्रू यांनी कथितरीत्या गहाळ झालेल्या कागदपत्रांबाबत चिंता व्यक्त केली. मात्र, कुनिका सदानंद यांनी हा केवळ दिवाणी वाद नसून फौजदारी स्वरूपाचा गुन्हा असल्याचा दावा केला. तसेच, निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर काही सदस्यांना कार्यालयात प्रवेश करण्याचा अधिकार नसल्याचेही त्यांनी म्हटले.

उपलब्ध माहितीनुसार,सिने अँड टीव्ही आर्टिस्ट्स असोसिएशन ची महत्त्वाची कागदपत्रे कथितरीत्या अनधिकृतपणे कार्यालयातून बाहेर नेण्यात आल्याच्या आरोपावरून हा वाद सुरू झाला. या प्रकरणी उपासना सिंग यांनी मुंबईतील वर्सोवा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केल्याचे समजते. दरम्यान, सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हीडीओंमुळे सिने अँड टीव्ही आर्टिस्ट्स असोसिएशन मधील अंतर्गत मतभेद समोर आले आहेत. मात्र, या प्रकरणातील विविध सदस्यांनी केलेले आरोप अद्याप स्वतंत्रपणे सिद्ध झालेले नाहीत. पूनम ढिल्लो किंवा पद्मिनी कोल्हापुरे यांनी या वादावर अद्याप अधिकृत निवेदन जारी केलेले नाही.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

पुण्यात उभारणार महाराष्ट्रातील सर्वांत मोठे बसस्थानक; ८२५ कोटींचा पुनर्विकास...

पुणे : पुण्यातील शिवाजीनगर एसटी बसस्थानकाचा लवकरच कायापालट होणार...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur|उदगीरमध्ये काळाचा घाला! जकणाळ तलावात पोहायला गेलेल्या २८ वर्षीय कामगाराचा बुडून मृत्यू
03:10
Video thumbnail
छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्याच्या जागेचे पालकमंत्री गोरे यांच्या हस्ते भूमिपूजन
00:46
Video thumbnail
Latur Dcc Bank Election|काँग्रेसच्या आंदोलनाचा इम्पॅक्ट! अखेर अपहरणाचा गुन्हा दाखल
02:24
Video thumbnail
Latur Dcc Bank Election|पोलिसांनी दिलेला शब्द पाळला नाही? औराद पोलीस ठाण्यासमोर काँग्रेसचा ठिय्या
00:43
Video thumbnail
Nanded|नायगावमध्ये कापड दुकानाला भीषण आग! ३० लाखांचे नुकसान
01:25
Video thumbnail
Latur Dcc Bank Election|लातूर जिल्हा बँक निवडणूक | जिल्हा बँकेच्या विकासासाठी शेतकरी संघटना मैदानात
18:58
Video thumbnail
Nanded|करखेली तलावात पाणी सोडण्यासाठी रास्ता रोको! | चार गावांचा पाणीप्रश्न ऐरणीवर
01:40
Video thumbnail
Nanded|धर्माबादमध्ये उपवर्गीकरण विरोधी महामोर्चा | आनंदराज आंबेडकरांचा भाजप-आरएसएसवर हल्लाबोल
01:08
Video thumbnail
Latur|लातूरमध्ये दिवाळीच्या रात्री ८ ठिकाणी आग! | ४० अग्निशमन जवानांचे शर्थीचे प्रयत्न
03:39
Video thumbnail
Latur Dcc Bank|लातूर जिल्हा बँक निवडणुकीत मतदारांची पळवापळवी? |काँग्रेसचे SP अमोल तांबे यांना निवेदन
02:18
Video thumbnail
Latur Crime News|लातूरमध्ये पित्यानेच सात वर्षीय मुलाचा खून केल्याचा आरोप
03:41
Video thumbnail
Latur|लातूर जिल्हा बँक निवडणुकीत खळबळ!कमलाकर शिंदे यांच्या अपहरणाचा आरोप |अरविंद पाटलांचे नाव चर्चेत
02:38
Video thumbnail
Latur|लातूरमध्ये पटवारी डेंटल क्लिनिकचे उद्घाटन | खासदार डॉ. शिवाजी काळगे यांचे रुग्णसेवेचे आवाहन
01:53
Video thumbnail
Yedshi Fire Accident | Dharashiv News|येडशीत भीषण आग! एकाच कुटुंबातील 6 जणांचा मृत्यू
02:01
Video thumbnail
Uday Samant|उदय सामंत यांचा मायक्रो फायनान्स कंपन्यांना इशारा! | दुष्काळग्रस्तांना 2 हजार टँकर
07:10

Latest news