मान्सूनचा परतीचा प्रवास; पुढील चार-पाच दिवस राज्यात अनेक ठिकाणी पाऊस

मुुंबई : प्रतिनिधी
नैऋत्य मोसमी वा-यांचा देशातून परतीचा प्रवास शनिवारी पश्चिम राजस्थानमधून सुरू झाला. यंदा तो दोन दिवस उशिराने परतत असून, ३-४ दिवसांत पंजाब व गुजरातच्या काही भागांतून माघार घेईल.

अंदमानमधील हवामान प्रणाली २३ सप्टेंबरपर्यंत तीव्र होऊन ओडिशा-आंध्र किनारपट्टीवर पोहोचण्याची शक्यता आहे. यामुळे दक्षिण भारत व पूर्व किनारपट्टीवर २५ सप्टेंबरपर्यंत पाऊस राहील. ओडिशा आणि आंध्र किनारपट्टीला २१ ते २४ सप्टेंबरदरम्यान मुसळधार पावसाचा ‘ऑरेंज अलर्ट’, तर केरळ, कर्नाटक, तामिळनाडू, तेलंगणा, बंगालसह ईशान्येकडील राज्यांना ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे. महाराष्ट्रातही रविवारी सर्वत्र वादळी वा-यांसह पावसाचा ‘यलो अलर्ट’ दिला आहे.

छत्रपती संभाजीनगर शहरात गेल्या दोन महिन्यांपासून पावसाने दडी मारल्याने सप्टेंबर महिन्यात तापमानाने उच्चांक गाठला आहे. सप्टेंबरमध्ये पावसाने ओढ दिल्याने वातावरणातील आर्द्रता घटून उकाड्यात मोठी वाढ झाली आहे. वाढत्या उकाड्यामुळे सलग सहाव्या दिवशी शहराचे कमाल तापमान ३० अंशांच्या पुढे राहिले.

यंदा थंडीचीही ओढ राहणार
‘‘वाढत्या एल निनोच्या प्रभावामुळे वातावरणात हे मोठे बदल दिसत आहेत. नेहमी हमखास परतीचा पाऊस मिळणा-या मराठवाड्यात यंदा तुलनेत पाऊस कमी राहील तसेच आगामी मोसमात थंडीचा कडाकाही कमीच असण्याची शक्यता आहे.

जालन्यात ५ दिवस पावसाची शक्यता
जालना जिल्ह्यात गेल्या दीड महिन्यापासून पावसाने दिलेली उघडीप आता संपण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, सोमवार ते शुक्रवार या कालावधीत जिल्ह्यात पावसाची शक्यत असून, काही ठिकाणी मेघगर्जनेसह जोरदार सरी होण्याचा अंदाज आहे. या कालावधीत बहुतांश वेळ ढगाळ वातावरण राहणार असून, कमाल तापमानातही घट होण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात मागील आठवड्यात दोन वेळा तुरळक पाऊस झाला. मात्र, त्याचा फारसा परिणाम जाणवला नाही. त्यामुळे दीर्घकाळापासून पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतक-यांच्या नजरा आता पुढील पाच दिवसांच्या हवामानाकडे लागल्या आहेत. सध्या जिल्ह्यात कमाल तापमान ३२.७ अंश सेल्सियसच्या आसपास आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur|गौरी-गणपतीच्या देखाव्यातून सरकारी शाळांचा आरसा; दिला शिक्षणाचा संदेश
02:49
Video thumbnail
Latur|एकमत परिवाराच्या बाप्पांची श्याम गोडभरले यांच्या हस्ते मनोभावे आरती!
01:50
Video thumbnail
Dattatreya Bharane|‘लवकरच शेतकऱ्यांना मदत करू’; दुष्काळी पाहणीत कृषिमंत्र्यांचं आश्वासन
02:21
Video thumbnail
Latur|पावसाळा संपत आला, तरी मांजरा नदीत पाण्याचा थेंब नाही!
04:35
Video thumbnail
🔴 LIVE : एकमत कार्यालयात गणपती बाप्पांची आरती | Ekmat Digital
10:17
Video thumbnail
Babasaheb Patil|लातूर जिल्हा बँक संचालक पदाबाबत RBI चा मोठा निर्णय;बाबासाहेब पाटील यांना केलं बडतर्फ
01:15
Video thumbnail
Sanjay Jadhav|‘दुष्काळ आहे तर मग कोणी खात नाही का?’ काजू-बदामावर जाधवांचा सवाल
03:16
Video thumbnail
Nanded Breaking|दुष्काळावर गंभीर चर्चा अन् टेबलवर काजू-बदाम; नांदेडमध्ये चर्चांना उधाण
00:39
Video thumbnail
Nanded Breaking|नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न; गाडीसमोर काँग्रेसची घोषणाबाजी
01:22
Video thumbnail
Latur|पावसाळा संपत आला, पण तिरू नदीत पाण्याचा थेंबही नाही!
02:20
Video thumbnail
Latur|30 हजारांचा खर्च... अन् उभ्या टोमॅटो पिकावर रोटावेटर! शेतकऱ्याचा धक्कादायक निर्णय
02:01
Video thumbnail
Latur|औसेकरांच्या नळाला गढूळ पाणी; स्वच्छ पाण्याची नागरिकांची मागणी
01:05
Video thumbnail
Nanded|दुष्काळी भागांच्या पाहणीसाठी कृषिमंत्री बांधावर; नांदेडपासून पाहणीला सुरुवात
06:56
Video thumbnail
🔴 LIVE : एकमत कार्यालयात गणपती बाप्पांची आरती | Ekmat Digital
12:18
Video thumbnail
Latur|मध्यरात्री पावसाची तुफान बॅटिंग; तावरजा नदी खळखळून वाहू लागली!
03:35

Latest news