चंद्रपुरात भीषण अपघात २ ठार; २ जण गंभीर जखमी

चंद्रपूर : प्रतिनिधी
जिल्ह्यातील नागभीड तालुक्यातील कोरधा येथे एक अत्यंत भीषण आणि दुर्दैवी अपघाताची घटना घडली आहे. गणपतीचे दर्शन घेऊन आनंदाने घरी परतणा-या कुटुंबाच्या कारला भरधाव ट्रकने मागून जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात एका १३ वर्षांच्या बालिकेसह दोघांचा मृत्यू झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बेदरे आणि भर्रे कुटुंबीय चंद्रपूरहून गणपतीपुढील देखावे व दर्शन घेऊन ब्रह्मपुरीच्या दिशेने परत जात होते. नागभीड जवळील कोरधा येथे चालकाने कार रस्त्याच्या बाजूला उभी करण्याचा प्रयत्न केला. त्याच वेळी मागून आलेल्या एका भरधाव ट्रकने कारला अत्यंत जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की कारचा चुराडा झाला.

या अपघातात श्रावणी हिमेश बेदरे आणि नीतीन भर्रे यांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेमुळे बेदरे आणि भर्रे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
अपघातात दोन जण गंभीररीत्या जखमी झाले असून त्यांना तातडीने पुढील उपचारासाठी नागपूर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर कारमधील इतर चार जण किरकोळ जखमी झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी आणि पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य राबवले. पोलीस या प्रकरणी पुढील कायदेशीर तपास करत आहेत.

दक्षिण मुंबईतील कोस्टल रोडवर रविवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास एक अत्यंत थरकाप उडवणारा आणि भीषण अपघात घडला. गुजरातहून मुंबईत उच्च शिक्षणासाठी आलेल्या विद्यार्थ्यांची भरधाव कार चालकाचे नियंत्रण सुटल्याने कोस्टल रोडच्या पुलावरून थेट ५० फूट खाली कोसळली. या दुर्दैवी घटनेत तीन विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू झाला असून, एकाची प्रकृती अत्यंत चिंताजनक आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur|गौरी-गणपतीच्या देखाव्यातून सरकारी शाळांचा आरसा; दिला शिक्षणाचा संदेश
02:49
Video thumbnail
Latur|एकमत परिवाराच्या बाप्पांची श्याम गोडभरले यांच्या हस्ते मनोभावे आरती!
01:50
Video thumbnail
Dattatreya Bharane|‘लवकरच शेतकऱ्यांना मदत करू’; दुष्काळी पाहणीत कृषिमंत्र्यांचं आश्वासन
02:21
Video thumbnail
Latur|पावसाळा संपत आला, तरी मांजरा नदीत पाण्याचा थेंब नाही!
04:35
Video thumbnail
🔴 LIVE : एकमत कार्यालयात गणपती बाप्पांची आरती | Ekmat Digital
10:17
Video thumbnail
Babasaheb Patil|लातूर जिल्हा बँक संचालक पदाबाबत RBI चा मोठा निर्णय;बाबासाहेब पाटील यांना केलं बडतर्फ
01:15
Video thumbnail
Sanjay Jadhav|‘दुष्काळ आहे तर मग कोणी खात नाही का?’ काजू-बदामावर जाधवांचा सवाल
03:16
Video thumbnail
Nanded Breaking|दुष्काळावर गंभीर चर्चा अन् टेबलवर काजू-बदाम; नांदेडमध्ये चर्चांना उधाण
00:39
Video thumbnail
Nanded Breaking|नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न; गाडीसमोर काँग्रेसची घोषणाबाजी
01:22
Video thumbnail
Latur|पावसाळा संपत आला, पण तिरू नदीत पाण्याचा थेंबही नाही!
02:20
Video thumbnail
Latur|30 हजारांचा खर्च... अन् उभ्या टोमॅटो पिकावर रोटावेटर! शेतकऱ्याचा धक्कादायक निर्णय
02:01
Video thumbnail
Latur|औसेकरांच्या नळाला गढूळ पाणी; स्वच्छ पाण्याची नागरिकांची मागणी
01:05
Video thumbnail
Nanded|दुष्काळी भागांच्या पाहणीसाठी कृषिमंत्री बांधावर; नांदेडपासून पाहणीला सुरुवात
06:56
Video thumbnail
🔴 LIVE : एकमत कार्यालयात गणपती बाप्पांची आरती | Ekmat Digital
12:18
Video thumbnail
Latur|मध्यरात्री पावसाची तुफान बॅटिंग; तावरजा नदी खळखळून वाहू लागली!
03:35

Latest news