ऐ-यागै-याने श्रेय घेऊ नये; मंत्री भरत गोगावलेंचा जरांगे पाटलांवर पलटवार

मुंबई : गणेशोत्सव काळात मनोज जरांगे पाटील यांच्या सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान सत्ताधारी आणि जरांगे यांच्यात जोरदार आरोप-प्रत्यारोप पाहायला मिळाले. या आंदोलनात जरांगे पाटलांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर सडकून टीका केली होती, ज्याला मंत्री भरत गोगावले आणि प्रताप सरनाईक यांनी प्रत्युत्तर दिले. ‘एकनाथ शिंदे यांची शान या पठ्ठ्याने आणि गरीब मराठ्यांनी वाढवली आहे,’ या मनोज जरांगेंच्या ताज्या वक्तव्याचा समाचार घेत मंत्री भरत गोगावले यांनी आता पुन्हा एकदा त्यांच्यावर जोरदार पलटवार केला आहे.

भरत गोगावले म्हणाले, एकनाथ शिंदे यांची शान लाखो लाडक्या बहिणी, मराठे आणि शेतकरी यांच्यासाठी केलेल्या कामामुळे वाढली आहे. कोणी ऐ-यागै-याने त्याचं श्रेय घेऊ नये आणि ठाण्याला कोणी आव्हान देऊ नये, अशा शब्दांत गोगावले यांनी जरांगेंवर पलटवार केला आहे. तसेच मराठे म्हणून आम्ही याचा समाचार घेतल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी सरकारच्या विनंतीला मान देऊन मराठा आरक्षण व जात पडताळणीसंदर्भातील उपोषण मागे घेतले असून सध्या ते रुग्णालयात उपचार घेत आहेत. मात्र, उपोषण मागे घेतल्यानंतर त्यांच्यावर काही आरोप केले जात आहेत.

गेल्या काही दिवसांपासून मनोज जरांगे पाटील आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात दुरावा निर्माण झाल्याचे दिसून येत असून, अंतरवालीतील आंदोलनादरम्यान जरांगे पाटलांनी मुख्यमंत्र्यांसह एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. विधानसभा निवडणुकीत मराठ्यांनीच मदत केली असताना सरकारने आपली फसवणूक केल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच, आपल्यावर टीका करण्यासाठी ११ टीम नेमण्यात आल्याचा आणि कॅबिनेटमध्ये एका मंत्र्याने ‘जरांगे पाटलांचे आता ऐकायचे नाही’ असे म्हटल्याचा दाखला देत, जरांगे पाटलांनी नाव न घेता एकनाथ शिंदे यांच्यावर सडकून टीका केली.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
🔴 LIVE - एकमत कार्यालयातील गणरायाची आरती |EKMAT DIGITAL
12:44
Video thumbnail
Nanded|नांदेडमध्ये सफाई कामगारांचा ‘झाडू मोर्चा’; ईपीएफची रक्कम देण्याची मागणी
02:02
Video thumbnail
Latur|शासन निर्णयाची होळी! ग्रामरोजगार सहाय्यकांचा थेट इशारा
03:28
Video thumbnail
Latur|तुटपुंजी मदत नको! शेतकऱ्यांना भरीव मदतीची मागणी
06:34
Video thumbnail
Latur| देवेंद्र फडणवीस शेतकऱ्यांच्या बांधावर; मुख्यमंत्र्यांच्या घोषणेवर शेतकऱ्यांनी थेटच बोलले
10:40
Video thumbnail
CM Devendra Fadanvis|दोन दिवसांत जीआर! दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्र्यांची घोषणा
05:52
Video thumbnail
🔴 LIVE मुख्यमंत्री फडणवीस आज लातूर दौऱ्यावर; शेतकऱ्यांच्या तीव्र प्रतिक्रिया| Ekmat Digital
12:19
Video thumbnail
🔴 LIVE मुख्यमंत्री फडणवीस आज लातूर दौऱ्यावर; नुकसानग्रस्त शेतीची पाहणी| Ekmat Digital
28:13
Video thumbnail
Latur|मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज लातूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर; शेतकऱ्यांना दिलासा मिळणार का?
02:12
Video thumbnail
Latur|पाणी चोरी थांबवण्यासाठी मनपाची कारवाई; ग्रामस्थ आक्रमक
01:54
Video thumbnail
🔴 LIVE : एकमत कार्यालयात गणपती बाप्पांची आरती | Ekmat Digital
12:38
Video thumbnail
Latur|मोईजभाई शेख यांच्या निधनाने लातूर हळहळले; अंत्यदर्शनासाठी गर्दी
05:19
Video thumbnail
Latur|काँग्रेस-राष्ट्रवादीचे बेरोजगार आंदोलन करत आहेत’; अभिमन्यू पवारांचा दावा
10:32
Video thumbnail
Latur|उद्योजक अक्षय शाह यांच्या हस्ते एकमत परिवारातील श्रीगणेशाची आरती
04:04
Video thumbnail
Latur|ज्येष्ठ काँग्रेस नेते मोईजभाई शेख यांचे दुःखद निधन
01:29

Latest news