लातूर : प्रतिनिधी
बाभळगाव शिवारातील अंकुश मद्दे यांच्या शेतातील विहिरीत हरिणाचे पाडस पडले होते. मद्दे यांनी ही माहिती बाभळगावचे उपसरपंच गोविंद देशमुख यांना कळवली. गोविंद देशमुख यांनी तसा निरोप माजी मंत्री, अमित विलासराव देशमुख यांच्या कार्यालयाला दिला. या कार्यालयाने तात्काळ वनविभागाच्या अधिका-यांना कळवले आणि हरिणाचे रेस्क्यू करण्यात आल्याने हरिणाच्या पाडसाला जीवनदान मिळाले.
वन विभागाचे आरएफओ पोटे, आरओ बिराजदार, वनरक्षक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सतीश कांबळे, करवंजे, कवठाळे, यांच्या टिमने विहिरीत पडलेल्या हरिणाच्या पाडसाचे प्राण वाचवले. या प्रसंगी उपसरपंच गोविंद देशमुख, तानाजी जाधव, सतीश देशमुख, श्रीधर जटाळ, पिंटू मद्दे यांचे सहकार्य लाभले.
















