पुणे : प्रतिनिधी
आपल्या दमदार अभिनयानं कोणतीही भूमिका फुलवणारा आणि तितक्याच सहज अभिनयाने थेट लोकांच्या काळजाला भिडणारा अभिनेता म्हणजे, नाना पाटेकर दिग्गज अभिनेत्याचे हृदयविकाराच्या झटक्यानं गोव्यात निधन झालं. वयाच्या ७५व्या वर्षी नाना पाटेकरांनी अखेरचा श्वास घेतला. मराठी इंडस्ट्रीसोबत बॉलिवूडही गाजवणा-या नानांच्या अकाली एग्झिटने मनोरंजनसृष्टीला धक्का बसला आहे.
गोव्यातील डोना पावलामधील घरी नाना पाटेकरांना हृदयविकाराचा झटका आला होता, त्यानंतर त्यांना मणिपाल रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान नाना पाटेकरांचे निधन झाल्याची माहिती मिळतेय. नाना पाटेकरांवर पुण्यात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत, अशी माहिती समोर आली आहे. दरम्यान, नाना पाटेकरांचं पार्थिव सध्या गोव्यातल्या मेडिकल कॉलेजमध्ये ठेवण्यात आलंय.
नाना पाटेकर यांच्या पार्थिवावर आज ८ ऑक्टोबर सायंकाळी पुण्या जवळील डोणजे गावात असलेल्या त्यांच्या घरी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी तशी माहिती दिली आहे.
अभिनेते नाना पाटेकर यांचे मराठी नाटकासह मराठी, हिंदी सिनेमातील अतुलनीय योगदान पहाता त्यांचे अंत्यसंस्कार ‘शासकीय इतमामात’करण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारनं घेतल्याचं सांस्कृतिक कार्यमंत्री अँड आशिष शेलार यांनी जाहीर केले आहे.
नाना पाटेकर यांचा मुलगा मल्हार रुग्णालयात दाखल
नाना पाटेकर यांचा मुलगा मल्हार रुग्णालयात पोहोचला आहे. त्यानं डॉक्टर आणि कुटुंबीयांची भेट घेतली. त्याचे दिवंगत वडील नाना पाटेकर यांचे पार्थिव त्याच्याकडे सोपवले जाईल. त्यानंतर पार्थीव पुण्यात आणलं जाईल आणि नाना पाटेकरांवर पुण्यातल्या डोणजे गावात अंत्यसंस्कार केले जातील.
दरम्यान, नाना पाटेकर यांचा जन्म १ जानेवारी १९५१ रोजी झाला. त्यांचे मूळ नाव विश्वनाथ पाटेकर, पण अख्ख्या सिनेसृष्टीसाठी आणि चाहत्यांसाठी ते नाना पाटेकरच होते. मराठी सिनेसृष्टीतले दिग्गज नाव. मराठी रंगभूमीपासून ते मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीपर्यंत आपल्या नावाची दखल घ्यायला लावणा-या गुणी अभिनेत्यांमध्ये आवर्जुन समाविष्ट होणारे नाव. रंगभूमीपासून आपली कारकिर्द सुरू करणा-या नानांनी नंतर सिनेसृष्टीत पदार्पण केलं आणि एकापेक्षा एक दमदार सिनेमे दिले. नानांचा जॉनर काय? असा प्रश्न कुणी विचारण्याची हिंमतच करणार नाही. अगदी समांतर सिनेमांपासून, ते कॉमेडी सिनेमांपर्यंत नानांनी आपला ठसा उमटवला. त्यांनी अनेक हिंदी, मराठी सिनेमांमध्ये, नाटकांत भूमिका केल्या. नाना पाटेकरांनी नायक, सहनायक, खलनायक आणि चरित्रनायक अशा विविध भूमिका केल्या. नानांचा मराठीत ‘नटसम्राट’ हा सिनेमा विशेष गाजला.
















