मुंबई : प्रतिनिधभारतीय चित्रपटसृष्टीतील अष्टपैलू, दिग्गज आणि आपल्या सखोल अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारे ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे गुरुवारी (८ ऑक्टोबर) पहाटे निधन झाले आहे. वयाच्या ७५ व्या वर्षी त्यांनी गोव्यात अखेरचा श्वास घेतला. फक्त अभिनयातच नव्हे तर सामाजिक कार्यातही त्यांचा मोठा वाटा होता. त्यांनी नाम फाउंडेशनद्वारे शेतक-यांसाठी अनेक कामे केली. तसेच, त्यांचे राजकीय नेत्यांचेशीही अगदी जवळचे संबंध होते. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत नाना पाटेकर यांना श्रद्धांजली वाहिली. त्यांच्या जाण्याने भारतीय चित्रपटसृष्टीतील एक असामान्य, संवेदनशील आणि प्रभावी पर्व आज संपले असल्याची भावना शरद पवारांनी व्यक्त केली.
ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी पोस्टमध्ये म्हटले की, ‘ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनाचे दु:खद वृत्त अत्यंत वेदनादायी आहे. त्यांच्या जाण्याने भारतीय चित्रपटसृष्टीतील एक असामान्य, संवेदनशील आणि प्रभावी पर्व आज संपले आहे. आपल्या दमदार अभिनयाने, आगळ्या संवादफेकीने आणि प्रत्येक भूमिकेतील विलक्षण सहजतेने त्यांनी रसिकांच्या मनावर कायमची अमिट छाप उमटवली. परिंदा, क्रांतिवीर, अग्निसाक्षी, अब तक छप्पन, वेलकम, नटसम्राट अशा अनेक चित्रपटांमधून त्यांच्या अभिनयाचे विविध पैलू रसिकांना अनुभवायला मिळाले.’ असे म्हणत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनाचे दु:खद वृत्त अत्यंत वेदनादायी आहे. त्यांच्या जाण्याने भारतीय चित्रपटसृष्टीतील एक असामान्य, संवेदनशील आणि प्रभावी पर्व आज संपले आहे. आपल्या दमदार अभिनयाने, आगळ्या संवादफेकीने आणि प्रत्येक भूमिकेतील विलक्षण सहजतेने त्यांनी रसिकांच्या मनावर कायमची अमिट छाप उमटवली. परिंदा, क्रांतिवीर, अग्निसाक्षी, अब तक छप्पन, वेलकम, नटसम्राट अशा अनेक चित्रपटांमधून त्यांच्या अभिनयाचे विविध पैलू रसिकांना अनुभवायला मिळाले.
‘कलाकार म्हणून यशस्वी असतानाच सामाजिक प्रश्नांप्रती असलेली त्यांची बांधिलकी आणि नाम फाउंडेशनच्या माध्यमातून केलेली कृतिशील समाजसेवा हा त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा तितकाच प्रेरणादायी पैलू होता. त्यांच्या निधनाने भारतीय कलाविश्वाने एक संवेदनशील आणि प्रतिभावान कलाकार, तर समाजाने एक कृतिशील व सामाजिक बांधिलकी जपणारे व्यक्तिमत्त्व गमावले आहे. त्यांच्या अभिनयाची, विचारांची आणि सामाजिक कार्याची अमिट छाप सदैव स्मरणात राहील. नाना पाटेकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली!’ असे म्हणत शरद पवारांनी नाना पाटेकर यांना श्रद्धांजली वाहिली.
खासदार सुप्रिया सुळेंनी वाहिली श्रद्धांजली
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीदेखील नाना पाटेकर यांना एक पोस्ट करत श्रद्धांजली वाहिली. ‘रंगभूमी आणि चित्रपटसृष्टी आपल्या अफाट, वास्तववादी आणि सशक्त अभिनयाने समृद्ध करणारे प्रख्यात अभिनेते, राष्ट्रीय पुरस्कार विजेते आणि संवेदनशील व्यक्तिमत्त्व नाना पाटेकर यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत दु:खद आहे. त्यांनी कोणतीही पार्श्वभूमी नसताना शून्यातून विश्व निर्माण केले होते. अत्यंत अभ्यासू, सडेतोड पण तेवढाच निर्मळ मनाचा माणूस अशी त्यांची ओळख होती. ते अष्टपैलू अभिनेते होतेच पण त्याशिवाय समाजाशी नाळ जोडलेले हळवे व्यक्ती देखील होते. या कठिण प्रसंगी मल्हार आणि पाटेकर कुटुंब, त्यांचे स्रेही, ‘नाम फाउंडेशन’चे सर्व सहकारी आणि देश-विदेशातील त्यांचे लाखो रसिक यांच्या दु:खात आम्ही सर्वजण सहभागी आहोत. नाना पाटेकर यांना भावपूर्ण श्रद्धांजलीङ्घ’’ असे त्या म्हणाल्या.
आमदार रोहित पवारांनी व्यक्त केल्या भावना
अष्टपैलू कलाकार गमावला : रोहित पवार
‘सामाजिक जाण आणि भान असलेले ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्याचं वृत्त अत्यंत धक्कादायक आणि मन सुन्न करणारं आहे. त्यांच्या निधनाने भारतीय चित्रपटसृष्टीने एक संवेदनशील, प्रभावी आणि अष्टपैलू कलाकार गमावला आहे. कलेच्या माध्यमातून लाखो मनांवर अधिराज्य गाजवणा-या आणि सामाजिक बांधिलकी जपणा-या या महान कलाकाराला माझी भावपूर्ण श्रद्धांजली!’’ असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवारांनी नाना पाटेकर यांना श्रद्धांजली वाहिली.
















