नाना पाटेकर यांच्या निधनाने चित्रपसृष्टी हळहळली; कलाकारांनी वाहिली श्रद्धांजली

मुंबई : प्रतिनिधी
ज्येष्ट अभिनेते नाना पाटेकर यांचे गुरुवारी पहाटे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. गेल्या पन्नास वर्षांपासून चित्रपटसृष्टीवर राज्य करणा-या नाना पाटेकरांच्या अकाली निधनाने चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. हिंदी, मराठी, दाक्षिणात्या चित्रपटसृष्टीतील कलाकारांनी नाना पाटेकर यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

मन अत्यंत दु:खी : अक्षय कुमार
नानांच्या निधनाचे वृत्त ऐकून मन अत्यंत दु:खी झाले. ते अशा मोजक्या अभिनेत्यांपैकी एक होते, ज्यांना प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेण्यासाठी फार काही करावे लागत नसे. तो धीरगंभीर आवाज, जबरदस्त अभिनय आणि प्रत्येक पात्रातील सहज प्रामाणिकपणाङ्घ त्यांची स्वत:ची एक वेगळी शैली होती. ‘वेलकम’ आणि नुकत्याच झालेल्या ‘हाऊसफुल ५’ मध्ये त्यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली, हे मी माझे भाग्य समजतो. त्या सेटवरच्या अशा अनेक आठवणी आहेत, ज्या मी आयुष्यभर मनात जपून ठेवीन. नाना पाटेकर खरोखरच अद्वितीय होते. नाना आता आपल्यात नाही यावर विश्वास ठेवणे कठीण जात आहे. तुमची उणीव शब्दांत व्यक्त करता येणार नाही इतकी भासेल, असे अक्षय कुमारने ट्विट केले आहे.

कलेप्रती समर्पण सदैव स्मरणात : मनीषा कोईराला
एका महान अभिनेत्याच्या, प्रभावी व्यक्तिमत्त्वाच्या आणि अभिनय क्षेत्रातील एका ख-या आधारस्तंभाच्या निधनाने मन अत्यंत दु:खी झाले आहे. सिनेमासृष्टीतील त्यांचे योगदान आणि त्यांचे कलेप्रती असलेले समर्पण सदैव स्मरणात राहील

चित्रपटसृष्टीची फार मोठी हानी : संजय दत्त
माझा भाऊ, माझा मित्र नाना आता आपल्यात नाही यावर अजूनही विश्वास बसणे कठीण जात आहे. आम्ही एकत्र घालवलेल्या क्षणांच्या अशा अनेक सुंदर आठवणी आहेत, ज्या मी आयुष्यभर मनात जपून ठेवीन. त्यांचे जाणे ही केवळ त्यांच्यावर प्रेम करणा-या आणि त्यांना ओळखणा-यांचीच नव्हे, तर संपूर्ण चित्रपटसृष्टीची फार मोठी हानी आहे. आपण एका असामान्य अभिनेत्याला, एका महान कलाकाराला आणि एका खरोखरच अत्यंत खास व्यक्तीला गमावले आहे. माझ्या संवेदना आणि प्रार्थना त्यांच्या कुटुंबासोबत व आप्तेष्टांसोबत आहेत. भावपूर्ण श्रद्धांजली, नाना.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

पुण्यात उभारणार महाराष्ट्रातील सर्वांत मोठे बसस्थानक; ८२५ कोटींचा पुनर्विकास...

पुणे : पुण्यातील शिवाजीनगर एसटी बसस्थानकाचा लवकरच कायापालट होणार...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur|उदगीरमध्ये काळाचा घाला! जकणाळ तलावात पोहायला गेलेल्या २८ वर्षीय कामगाराचा बुडून मृत्यू
03:10
Video thumbnail
छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्याच्या जागेचे पालकमंत्री गोरे यांच्या हस्ते भूमिपूजन
00:46
Video thumbnail
Latur Dcc Bank Election|काँग्रेसच्या आंदोलनाचा इम्पॅक्ट! अखेर अपहरणाचा गुन्हा दाखल
02:24
Video thumbnail
Latur Dcc Bank Election|पोलिसांनी दिलेला शब्द पाळला नाही? औराद पोलीस ठाण्यासमोर काँग्रेसचा ठिय्या
00:43
Video thumbnail
Nanded|नायगावमध्ये कापड दुकानाला भीषण आग! ३० लाखांचे नुकसान
01:25
Video thumbnail
Latur Dcc Bank Election|लातूर जिल्हा बँक निवडणूक | जिल्हा बँकेच्या विकासासाठी शेतकरी संघटना मैदानात
18:58
Video thumbnail
Nanded|करखेली तलावात पाणी सोडण्यासाठी रास्ता रोको! | चार गावांचा पाणीप्रश्न ऐरणीवर
01:40
Video thumbnail
Nanded|धर्माबादमध्ये उपवर्गीकरण विरोधी महामोर्चा | आनंदराज आंबेडकरांचा भाजप-आरएसएसवर हल्लाबोल
01:08
Video thumbnail
Latur|लातूरमध्ये दिवाळीच्या रात्री ८ ठिकाणी आग! | ४० अग्निशमन जवानांचे शर्थीचे प्रयत्न
03:39
Video thumbnail
Latur Dcc Bank|लातूर जिल्हा बँक निवडणुकीत मतदारांची पळवापळवी? |काँग्रेसचे SP अमोल तांबे यांना निवेदन
02:18
Video thumbnail
Latur Crime News|लातूरमध्ये पित्यानेच सात वर्षीय मुलाचा खून केल्याचा आरोप
03:41
Video thumbnail
Latur|लातूर जिल्हा बँक निवडणुकीत खळबळ!कमलाकर शिंदे यांच्या अपहरणाचा आरोप |अरविंद पाटलांचे नाव चर्चेत
02:38
Video thumbnail
Latur|लातूरमध्ये पटवारी डेंटल क्लिनिकचे उद्घाटन | खासदार डॉ. शिवाजी काळगे यांचे रुग्णसेवेचे आवाहन
01:53
Video thumbnail
Yedshi Fire Accident | Dharashiv News|येडशीत भीषण आग! एकाच कुटुंबातील 6 जणांचा मृत्यू
02:01
Video thumbnail
Uday Samant|उदय सामंत यांचा मायक्रो फायनान्स कंपन्यांना इशारा! | दुष्काळग्रस्तांना 2 हजार टँकर
07:10

Latest news