घटस्थापना

परंपरेचा वारसा जपत असताना विवेकाची कास धरणे, देवीच्या शक्तीची पूजा करताना स्त्रीचा सन्मान करणे आणि उत्सवाच्या आनंदातून समाजात सकारात्मक परिवर्तन घडवणे, हाच नवरात्रोत्सवाचा खरा संदेश आहे. भारतीय संस्कृती ही सण, उत्सव, परंपरा आणि आध्यात्मिक मूल्यांनी समृद्ध झालेली संस्कृती आहे. आपल्या प्रत्येक सणामागे काहीतरी जीवनोपयोगी विचार, सामाजिक संदेश आणि नैतिक मूल्ये दडलेली आहेत. घटस्थापना आणि नवरात्रोत्सव हा त्याच समृद्ध परंपरेचा एक महत्त्वपूर्ण भाग आहे. आश्विन महिन्याच्या शुद्ध प्रतिपदेला घटस्थापना करून नवरात्रोत्सवाला प्रारंभ होतो. पुढील नऊ दिवस आदिशक्तीच्या विविध रूपांची आराधना केली जाते. भक्ती, श्रद्धा, उपासना, संयम आणि आत्मचिंतन यांचा सुंदर संगम असलेला हा उत्सव भारतीय जनमानसात विशेष स्थान राखून आहे. मात्र, काळ बदलत असताना या उत्सवाकडे केवळ धार्मिक विधी म्हणून न पाहता त्यामागील व्यापक सामाजिक आणि सांस्कृतिक आशय समजून घेण्याची गरज आहे. घटस्थापना म्हणजे केवळ मातीच्या पात्रात धान्य पेरणे किंवा कलशाची स्थापना करणे नव्हे; तर ती जीवनात नव्या संकल्पांची पेरणी करण्याची संधी आहे. घटामध्ये पाणी, सुपारी, नारळ, पाने आणि इतर पूजासाहित्य ठेवून विधिपूर्वक स्थापना केली जाते. अनेक ठिकाणी मातीमध्ये धान्य पेरले जाते. पुढील दिवसांत या धान्याला अंकुर फुटतात आणि त्याची वाढ होताना दिसते. हा अंकुर म्हणजे नवजीवनाचे, आशेचे आणि समृद्धीचे प्रतीक आहे.

ज्या प्रकारे पेरलेल्या बीजाला योग्य माती, पाणी, प्रकाश आणि काळजी मिळाली तर त्याचा विकास होतो, त्याचप्रमाणे माणसाच्या आयुष्यातही चांगले विचार, प्रामाणिक प्रयत्न, शिस्त आणि सातत्य यांची जोड मिळाली तर यशाचे अंकुर फुलतात. केवळ संकल्प करून चालत नाही, तर त्या संकल्पाच्या पूर्ततेसाठी कृतीही करावी लागते. म्हणूनच घटस्थापनेच्या निमित्ताने प्रत्येकाने स्वत:च्या जीवनात एखादा विधायक संकल्प करावा. कोणी व्यसनांपासून दूर राहण्याचा, कोणी पर्यावरणाचे रक्षण करण्याचा, कोणी मुलांच्या शिक्षणासाठी वेळ देण्याचा, तर कोणी समाजातील गरजू व्यक्तींना मदत करण्याचा संकल्प करू शकतो. अशा संकल्पांतूनच सणांचे सामाजिक महत्त्व अधिक अर्थपूर्ण ठरते. नवरात्र म्हणजे नऊ रात्रींचा उत्सव. या काळात देवीच्या विविध रूपांची पूजा केली जाते. दुर्गा, लक्ष्मी आणि सरस्वती ही शक्ती, समृद्धी आणि ज्ञान यांची प्रतीके म्हणून भारतीय परंपरेत मानली जातात. दुर्गा अन्यायाविरुद्ध लढण्याचे धैर्य शिकवते, लक्ष्मी श्रम, समृद्धी आणि कल्याणाची जाणीव करून देते, तर सरस्वती ज्ञान, विवेक आणि सर्जनशीलतेचे महत्त्व सांगते. या तिन्ही शक्तींचा समतोल जीवनात असणे आवश्यक आहे. केवळ सामर्थ्य असून चालत नाही, त्याला विवेकाची जोड हवी. केवळ संपत्ती असून चालत नाही, तिचा विनियोग लोककल्याणासाठी व्हायला हवा. केवळ ज्ञान असून चालत नाही, त्यातून समाजातील अज्ञान आणि अन्याय दूर करण्याची प्रेरणा मिळायला हवी. म्हणूनच देवीची उपासना करताना तिच्या प्रतीकांमधून मिळणारे जीवनमूल्य आत्मसात करणे अधिक महत्त्वाचे आहे.

नवरात्रोत्सवात उपवास, जप, पूजा, भजन, कीर्तन आणि जागरण यांना महत्त्व आहे. या धार्मिक आचरणांमुळे अनेकांना मानसिक शांतता, आत्मिक समाधान आणि सामूहिकतेची अनुभूती मिळते. मात्र, कोणतीही उपासना दुस-याला कमी लेखण्यासाठी किंवा अंधश्रद्धेला प्रोत्साहन देण्यासाठी वापरली जाऊ नये. श्रद्धेला विवेकाची जोड मिळाली की ती जीवनाला दिशा देते; पण विवेक हरवला की श्रद्धेचे रूपांतर चुकीच्या समजुतींमध्ये होऊ शकते.नवरात्रोत्सवाचा सर्वांत महत्त्वाचा सामाजिक संदेश म्हणजे स्त्रीशक्तीचा सन्मान. ज्या समाजात स्त्रीला देवीचे रूप मानून तिची पूजा केली जाते, त्याच समाजात स्त्रीच्या सुरक्षिततेचा, शिक्षणाचा, स्वातंत्र्याचा आणि समानतेचा प्रश्न गंभीरतेने घेतला गेला पाहिजे. देवीच्या मूर्तीसमोर नतमस्तक होणे आणि प्रत्यक्ष जीवनात स्त्रीचा अपमान सहन करणे, या दोन्ही गोष्टी एकत्र चालू शकत नाहीत.मुलगी जन्माला आली म्हणून दु:ख मानणारी मानसिकता, मुलगा-मुलगी यांच्यात भेदभाव करणारी वृत्ती, महिलांच्या शिक्षणाकडे दुर्लक्ष, घरगुती हिंसा आणि सार्वजनिक ठिकाणी होणारा महिलांचा अनादर या बाबींचे निर्मूलन करणे ही काळाची गरज आहे. स्त्रीला केवळ पूजेच्या वेळी देवी मानण्यापेक्षा तिच्या दैनंदिन जीवनातील अधिकारांचा आदर करणे आवश्यक आहे.

घरातील मुलींना शिक्षणाच्या समान संधी देणे, त्यांच्या मतांचा आदर करणे, त्यांना स्वावलंबी बनविणे आणि मुलांमध्ये स्त्रीसन्मानाचे संस्कार रुजविणे ही खरी शक्तिपूजा ठरेल. नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने प्रत्येक कुटुंबाने स्त्रीसन्मानाचा संकल्प केला, तर या उत्सवाला सामाजिक परिवर्तनाची दिशा मिळू शकते. नवरात्रोत्सव म्हटला की सार्वजनिक मंडळे, आकर्षक सजावट, गरबा, दांडिया, भजन, सांस्कृतिक कार्यक्रम आणि भक्तिमय वातावरण डोळ्यांसमोर उभे राहते. या कार्यक्रमांमुळे समाजातील लोक एकत्र येतात. युवकांना कलागुण सादर करण्याची संधी मिळते. स्थानिक कलाकार, कारागीर आणि लहान व्यावसायिकांनाही रोजगार मिळू शकतो. त्यामुळे उत्सव हा सामाजिक एकोपा आणि आर्थिक उलाढालीला चालना देणारा उपक्रमही ठरू शकतो. परंतु उत्सवाचा आनंद घेताना सामाजिक जबाबदारी विसरता कामा नये. ध्वनिप्रदूषण, वाहतुकीतील अडथळे, सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता, अनावश्यक खर्च आणि स्पर्धात्मक दिखाऊपणा यांमुळे उत्सवाच्या मूळ हेतूलाच बाधा पोहोचते. भक्तीचे प्रदर्शन करण्यापेक्षा भक्तीमधून निर्माण होणारी सद्भावना महत्त्वाची आहे. मोठ्या सजावटीपेक्षा स्वच्छता, महागड्या देखाव्यांपेक्षा सामाजिक उपक्रम आणि अवाजवी खर्चापेक्षा गरजूंना मदत यांना प्राधान्य दिले, तर उत्सवाचा आनंद अधिक व्यापक होईल.

नवरात्र मंडळांनी रक्तदान शिबिरे, आरोग्य तपासणी, वृक्षारोपण, स्वच्छता मोहीम, मुलींच्या शिक्षणासाठी मदत, गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्यवाटप आणि व्यसनमुक्तीविषयक जनजागृती असे उपक्रम राबवावेत. अशा कार्यातून उत्सवाची ऊर्जा समाजहितासाठी वापरली जाईल. धार्मिक श्रद्धा आणि सामाजिक बांधीलकी यांचा संगम घडवून आणणे हीच काळाची खरी गरज आहे.आज पर्यावरणाचा -हास, वाढते प्रदूषण आणि नैसर्गिक साधनसंपत्तीचा अविचारी वापर ही गंभीर आव्हाने आहेत. अशा परिस्थितीत सण-उत्सव पर्यावरणपूरक पद्धतीने साजरे करणे आवश्यक आहे. सजावटीसाठी प्लास्टिकचा कमीत कमी वापर, नैसर्गिक किंवा पुनर्वापर करता येणा-या साहित्याचा स्वीकार, पाण्याची बचत, कच-याचे योग्य व्यवस्थापन आणि ध्वनिप्रदूषणावर नियंत्रण या गोष्टी प्रत्येक मंडळाने लक्षात घ्याव्यात. देवीची आराधना म्हणजे निसर्गातील सर्जनशील शक्तीचा आदर करणे, असेही मानता येईल. पृथ्वी, जल, वायू आणि वनस्पती यांच्याशिवाय मानवी जीवन शक्य नाही.

-ना. सा. येवतीकर

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Maharashtra Drought|५ हजारांत दुष्काळ मिटणार? शेतकऱ्यांची बोळवण? | मुद्दा महाराष्ट्राचा
47:58
Video thumbnail
Latur Traffic Police|आईच्या दर्शनासाठी पायी जाणाऱ्या भाविकांना वाहतूक शाखेचे सुरक्षा कवच!
02:17
Video thumbnail
५ हजार मदत म्हणजे क्रूर थट्टा; दुष्काळग्रस्तांना १ लाख रुपयांच्या मदतीची शेतकरी संघटनांची मागणी.
10:59
Video thumbnail
Parbhani|परभणीत न्यायालयीन कर्मचाऱ्यांचे काळ्या फिती लावून आंदोलन!
03:58
Video thumbnail
Latur|लातूरमध्ये ५५ वर्षीय महिलेच्या खुनाचा उलगडा; २४ तासांत संशयित आरोपी पोलिसांच्या ताब्यात
02:49
Video thumbnail
DCC BANK ELECTION|पक्षीय राजकारण बाजूला! सहकारमंत्री बाबासाहेब पाटील धिरज देशमुखांसोबत
04:38
Video thumbnail
Nanded|कंधारमध्ये मध्यरात्री कार मन्याड नदीत कोसळली; महिलेचा दुर्दैवी मृत्यू
01:37
Video thumbnail
Nanded|माहूरच्या केरोळी घाटात भीषण अपघात! टेम्पो दरीत कोसळून दोघांचा मृत्यू, चार जण गंभीर
01:10
Video thumbnail
Latur|लातुरात ७० वा धम्मचक्र प्रवर्तन दिन उत्साहात साजरा होणार; विविध कार्यक्रमांचे आयोजन
02:29
Video thumbnail
Latur Drought|पाच हजारांची मदत देऊन फडणवीस सरकारने केली शेतकऱ्यांची थट्टा?
09:48
Video thumbnail
Dhiraj Deshmukh|जिल्हा बँकेच्या कामांच्या विश्वासावर निवडणूक लढवतोय! धिरज देशमुखांचा दावा
05:15
Video thumbnail
अयोध्येत रामललाच्या चरणी यामी गौतम; दर्शन आणि आशीर्वादानंतर केले 'नई नवेली' चित्रपटाचे प्रमोशन.
00:53
Video thumbnail
Hingoli|जिल्हाधिकारी राहुल कर्डिले ॲक्शन मोडमध्ये!तहसील कार्यालयात अचानक धडक
02:31
Video thumbnail
Latur|लातूरकरांनो, गुंठेवारीची प्रकरणे दाखल केलीत का? ३१ डिसेंबर अंतिम मुदत!
01:10
Video thumbnail
Latur|लातूर जिल्हा बँकेच्या निवडणुकीत उत्सुकता वाढली! दोन दिवसांत २२९ अर्जांची विक्री
02:47

Latest news