राज्यात आगीचे तांडव!; मुंबई, ठाण्यासहअनेक ठिकाणी आगीच्या घटना

मुंबई : प्रतिनिधी
दिवाळीच्या पहिल्यादिवशी लक्ष्मीपूजनावेळी रविवारी (८ नोव्हेंबर) राज्यात अनेक ठिकाणी आगीच्या घटनांनी गालबोट लागल्याचे दिसून आले. दिवाळीच्या रात्री राज्यात अनेक शहरांमध्ये फटाक्यांची आतिषबाजी आणि इतर कारणांमुळे आगीच्या भीषण घटना घडल्या. मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पुणे, धुळे, अहिल्यानगर, बीड आणि नागपूरसह राज्यातील प्रमुख शहरांमध्ये अग्निशमन दलाला आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी मोठी धावपळ करावी लागली. समोर आलेल्या माहितीनुसार, धाराशिवमधील येडशी येथे घराला आग लागल्याने एकाच कुटुंबातील ६ जणांचा मृत्यू झाला आहे.

दिवाळी आनंदाचा आणि प्रकाशाचा सण असला, तरी फटाक्यांच्या वापरादरम्यान आवश्यक ती खबरदारी न घेतल्यास राज्यात आगीच्या अनेक दुर्घटना घडल्या आहेत. दिवाळीच्या रात्री शहरात सर्वत्रच फटाक्यांची आतषबाजी सुरू असताना आगीच्या घटना घडल्या आहे. रविवारी (८ नोव्हेंबर) धाराशिवच्या येडशीमध्ये एका घराला आग लागल्यानंतर एकाच कुटुंबातील ६ जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले असून यामध्ये एकाला वाचविण्यात यश आले. आतापर्यंत समोर आलेल्या माहितीनुसार, मुंबईसह राज्यात अनेक ठिकाणी आगीच्या घटना घडल्या आहेत.

मुंबईतील डोंगरी येथील हाजी कासम चाळ परिसरातील पत्र्याची दुकाने आणि गॅरेजला भीषण आग लागली. या आगीने रौद्र रूप धारण केल्यामुळे परिसरातील ३० हून अधिक झोपड्या आणि दुकाने खाक झाली. याशिवाय, जोगेश्वरी, अंधेरी, मालवणी आणि कांदिवली अशा चार ठिकाणी आगी लागल्याच्या घटना घडल्या. अंधेरीतील मरोळ मिलिटरी रोड परिसर, मालवणी परिसरातही आग लागल्याची माहिती समोर आली आहे. तर कांदिवली पश्चिम येथील कांदिवली रिक्रिएशन क्लबच्या गार्डन परिसरातही रात्री आग लागली होती. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाने रात्री उशिरा घटनास्थळी धाव घेत आग विझवली.

ठाण्यातही घडल्या आगीच्या घटना
ठाण्यात तीन हात नाका येथील रहेजा गार्डनच्या कारलाइन इमारतीच्या ८ व्या मजल्यावर भीषण आग लागली. ही आग वेगाने १४ व्या मजल्यापर्यंत पसरली आणि इमारतीत प्रचंड धूर झाला. अग्निशमन दल आणि आपत्ती व्यवस्थापन पथकाने शर्थीचे प्रयत्न करून ५० रहिवाशांची सुखरूप सुटका केली. तसेच, कासारवडवली येथे सांघवी हिल्स परिसरातील आरावली हिल्स सोसायटीच्या ७ व्या मजल्यावरील कॉरिडॉरमध्ये आग लागल्याची घटना घडली. यावेळी ४ जण जखमी झाले. आशर गृहसंकुलातील एका इमारतीच्या २९ व्या मजल्यावरील घरात आग लागली.

नागपुरात ४३ ठिकाणी आग
फटाक्यांच्या आतषबाजीमुळे नागपूर शहरात तब्बल ४३ ठिकाणी आग लागण्याच्या घटना घडल्या आहे. फटाक्यांमुळे लागलेल्या या आगींमध्ये मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले. यात सर्वात मोठी घटना देवनगर परिसरात घडली, इथे असलेल्या एका दुचाकी शोरूमला भीषण आग लागल्याने शोरूममधील सुमारे ४० ते ४५ नव्या को-या दुचाकी गाड्या जळून खाक झाल्या आहे.

नाशकात २० ठिकाणी आग
फटाक्याच्या अतषबाजीदरम्यान शहरात २० ठिकाणी आगीच्या घटना घडल्या. जुने नाशिक भागातील मदिना चौकातील भंगारच्या गोदामाला किरकोळ आग लागली. यानंतर पंचवटी येथील श्रीकाळाराम मंदिर परिसरात फटाक्यामुळे आग लागली. तसेच इंदिरानगर, नाशिक रोड, अंबड, सातपूर, के. के. वाघ महाविद्यालय, द्वारका परिसरात आगीच्या घटना घडल्या.

छत्रपती संभाजीनगरात २६ ठिकाणी आग
छत्रपती संभाजीनगरमध्ये जवळपास २५ ते २६ ठिकाणी आग लागण्याच्या घटना घडल्या आहेत, या घटना नेमक्या कशामुळे घडल्या याबाबत अद्याप स्पष्टता देण्यात आली नाही. मात्र अग्निशमन दलाच्या विभागांनी दिलेल्या माहितीनुसार रात्री एक वाजेपर्यंत विविध ठिकाणी घटना घडल्या आहेत. नारेगाव भागात कुलरच्या कंपनीला आग लागून मोठे नुकसान झाले.

पुण्यात २४ ठिकाणी आग
पुणे शहरात दिवाळीचा जल्लोष सुरू असताना दुपारी ३ ते रात्री ९ या ६ तासांच्या कालावधीत तब्बल २४ ठिकाणी आगीच्या घटना घडल्या. येरवडा, सदाशिव पेठ, वडगाव, खराडी या भागांत या घटना घडल्या असून अग्निशमन दलाने सर्व ठिकाणी वेळेत आग विझवली. सुदैवाने येथे कोणतीही जीवितहानी झाली नाही.

चंद्रपूर आणि अहिल्यानगरमध्ये मोठे नुकसान
चंद्रपूरपुरात बालाजी वॉर्डात फटाक्याची ठिणगी उडून एका घराच्या दुस-या माळ्याला भीषण आग लागली.
अहिल्यानगर येथील अकोले रोडवरील एका बॅटरीच्या दुकानाला फटाक्यांमुळे आग लागून दोन दुकानांचे मोठे नुकसान झाले.

हवेचा दर्जा खालावला
लक्ष्मीपूजनाच्या दिवशी झालेल्या जोरदार आतषबाजीमुळे अनेक शहरात धुराचे साम्राज्य पसरले आहे. काही भागांत हवेच्या गुणवत्तेचा निर्देशांक थेट ४५० पर्यंत पोहोचल्याची माहिती समोर आली आहे, ज्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.

उपमुख्यमंत्री आणि प्रशासनाचा निर्णय
घटनेची पाहणी केल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अग्निशमन दलाचे कौतुक करत कडक नियमावलीचे निर्देश दिले. त्यानुसार ठाणे जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांनी ठाणे जिल्ह्यात रॉकेट आणि हवेत फोडल्या जाणा-या फटाक्यांवर तात्काळ बंदी घातली आहे. आता इतर फटाके फक्त खुल्या मैदानातच फोडता येतील.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur Crime News|लातूरमध्ये पित्यानेच सात वर्षीय मुलाचा खून केल्याचा आरोप
03:41
Video thumbnail
Latur|लातूर जिल्हा बँक निवडणुकीत खळबळ!कमलाकर शिंदे यांच्या अपहरणाचा आरोप |अरविंद पाटलांचे नाव चर्चेत
02:38
Video thumbnail
Latur|लातूरमध्ये पटवारी डेंटल क्लिनिकचे उद्घाटन | खासदार डॉ. शिवाजी काळगे यांचे रुग्णसेवेचे आवाहन
01:53
Video thumbnail
Yedshi Fire Accident | Dharashiv News|येडशीत भीषण आग! एकाच कुटुंबातील 6 जणांचा मृत्यू
02:01
Video thumbnail
Uday Samant|उदय सामंत यांचा मायक्रो फायनान्स कंपन्यांना इशारा! | दुष्काळग्रस्तांना 2 हजार टँकर
07:10
Video thumbnail
Latur Dcc Bank Election|लातूर जिल्हा बँक निवडणुकीत मतदार पळवापळवीचा आरोप!
07:46
Video thumbnail
Diwali 2026|नांदेडच्या सचखंड गुरुद्वारात दीपोत्सव | हजारो दिव्यांनी उजळला हुजूर साहिब गुरुद्वारा
01:08
Video thumbnail
Diwali 2026|दैनिक एकमत कार्यालयात लक्ष्मीपूजन सोहळा उत्साहात | वैशालीताई देशमुख यांच्या हस्ते पूजा
06:02
Video thumbnail
Purna Fire News | पूर्णा येथे सायकल स्पेअरपार्ट दुकानाला भीषण आग | ३ लाखांचे नुकसान | एकमत डिजिटल
01:15
Video thumbnail
LIVE -एकमत कार्यालयातील दिवाळी लक्ष्मीपूजन सोहळा
00:00
Video thumbnail
Latur Diwali Firecracker Market | लक्ष्मीपूजनासाठी फटाका बाजारात गर्दी | शेतकऱ्यांना 20% सूट
03:31
Video thumbnail
Latur Diwali Shopping Rush | गंजगोलाई बाजारपेठेत तुफान गर्दी | वाहतूक कोंडी | एकमत डिजिटल
02:10
Video thumbnail
Latur Vanchit Bahujan Aghadi Black Diwali | दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी आंदोलन | एकमत डिजिटल
01:44
Video thumbnail
Jalkot Drought Diwali | दुष्काळामुळे जळकोटची दिवाळी फिकी | फुलांचे भाव घसरले | एकमत डिजिटल
02:50
Video thumbnail
PURNA| तालुक्यातील निळा-महागाव रस्त्याचा प्रश्न मार्गी|आ. डॉ. रत्नाकर गुट्टे यांच्या हस्ते भूमिपूजन
03:59

Latest news