गोल्डी ब्रार मोस्ट वॉन्टेडच्या यादीत पहिल्या क्रमांकावर

टोरंटो : मोस्ट वाँटेड गँगस्टर गोल्डी ब्रार याच्या भोवतीचा फास आता अधिकच आवळला गेला आहे. कॅनडाने गोल्डी ब्रारला देशातील २५ मोस्ट वॉन्टेड फरारी गुन्हेगारांच्या यादीत पहिल्या क्रमांकावर टाकले असून त्याच्या अटकेबाबत माहिती देणा-याला २ लाख ५० हजार कॅनेडियन डॉलर्स (सुमारे १.६३ कोटी रुपये) बक्षीस देण्याची घोषणा केली आहे.

कायदा व सुव्यवस्था यंत्रणांसोबत काम करणा-या बोलो प्रोग्राम या सार्वजनिक सुरक्षा उपक्रमाने गुरुवारी या बक्षिसाची घोषणा केली. गोल्डी ब्रारचे खरे नाव सतिंदरजीत सिंग असून सप्टेंबर २०२३ मध्ये विनिपेग येथे झालेल्या ३९ वर्षीय सुखदूल सिंग गिल याच्या हत्येप्रकरणी तो पोलिसांना हवा आहे. कॅनडा किंवा अमेरिकेत कुठेही त्याच्या अटकेस मदत करणा-या विश्वसनीय माहितीसाठी हे बक्षीस लागू असेल. पोलिसांनी नागरिकांना त्याच्याबद्दल कोणतीही माहिती असल्यास तात्काळ संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.

२०२३ मधील हत्याकांडाचे प्रकरण
विनिपेग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २० सप्टेंबर २०२३ रोजी हॅझेल्टन ड्राइव्ह येथील एका घरात सुखदूल सिंग गिल याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. रॉयल कॅनेडियन माउंटेड पोलिस, मॅनिटोबा जस्टिस आणि इतर तपास यंत्रणांच्या मदतीने या हत्येचा तपास करण्यात आला. याप्रकरणी २३ फेब्रुवारी २०२६ रोजी गोल्डी ब्रार आणि करणबीर सिंग यांच्याविरुद्ध अटक वॉरंट जारी करण्यात आले असून दोघांवरही हत्येचा कट रचणे आणि फर्स्ट-डिग्री मर्डरचे आरोप ठेवण्यात आले आहेत. मात्र, अद्याप या दोन्ही आरोपींचा शोध घेण्यात किंवा त्यांना अटक करण्यात पोलिसांना यश आलेले नाही.

एफबीआयकडूनही सुमारे ८.९ कोटींचे बक्षीस
अमेरिकेच्या तपास यंत्रणेनेही २८ सप्टेंबर रोजी गोल्डी ब्रारचा समावेश आपल्या टॉप १० मोस्ट वॉन्टेड फरारी गुन्हेगारांच्या यादीत केला होता. त्याला अटक करण्यासाठी माहिती देणा-याला एफबीआयकडून १० लाख अमेरिकन डॉलर्स (सुमारे ८.९ कोटी रुपये) इतके बक्षीस जाहीर करण्यात आले आहे. ब्रार हा कुख्यात लॉरेन्स बिश्नोई टोळीशी संबंधित असून, अमेरिका आणि कॅनडामध्ये खंडणी, अंमली पदार्थांची तस्करी आणि नियोजित हत्याकांडांमध्ये त्याचा सहभाग असल्याचा एफबीआयचा आरोप आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

सुर्यकांत सरन्यायाधीशांच्या खुर्चीवर बसण्याच्या लायक नाहीत

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयात सोमवारी सरन्यायाधीश सूर्यकांत आणि...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

पुण्यात उभारणार महाराष्ट्रातील सर्वांत मोठे बसस्थानक; ८२५ कोटींचा पुनर्विकास...

पुणे : पुण्यातील शिवाजीनगर एसटी बसस्थानकाचा लवकरच कायापालट होणार...

बंगालच्या उपसागरात आणखी एक चक्रीवादळ

कोलकाता : बंगालच्या उपसागरामध्ये आणखी एक चक्रीवादळ निर्माण झाले...

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur Air Pollution issue|लातूरच्या पूर्व भागात वायुप्रदूषणाचा विळखा! टायर जाळल्याने विषारी धूर
02:24
Video thumbnail
Impact|एकमत डिजिटलच्या बातमीचा परिणाम! लातूरमध्ये फुटलेल्या पाईपलाईनच्या दुरुस्तीला सुरुवात
04:27
Video thumbnail
Latur Crime News|लातूरमध्ये ग्रामसेवकाच्या घरात १५ लाखांची चोरी; गेट कापून चोरट्यांचा प्रवेश
02:35
Video thumbnail
DCM Sunetra Pawar|नांदेडमध्ये दुष्काळाचा आढावा; सुनेत्रा पवारांचे मोठे निर्देश
07:19
Video thumbnail
Latur News|प्रेम,विरह अन् स्त्रीच्या वेदना! 'पगला घोडा' नाटकाने प्रेक्षकांना केले अंतर्मुख
07:55
Video thumbnail
Purna|हाजी भाई कुरेशी यांचा वाढदिवस पूर्णा शहरात जल्लोषात
05:38
Video thumbnail
Nanded|कंधारमध्ये शॉर्टसर्किटमुळे दोन एकर ऊस जळून खाक; शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान
01:17
Video thumbnail
Dhiraj Deshmukh|धीरज देशमुखांचा पाच मुद्द्यांवर मोठा खुलासा!लातूर निवडणूक,सोनिया गांधी पुस्तक,जरांगे
07:14
Video thumbnail
Latur News|लातूरमध्ये १२ तासांचे भजन आंदोलन स्थगित! बी झोन कार्यालयात रात्री उशिरा बैठक
02:02
Video thumbnail
Latur City Bus|लातूरची सिटी बस सेवा बंद! १८ बसेस जाग्यावर, नागरिकांना आर्थिक भुर्दंड
03:36
Video thumbnail
Latur|लातूरमध्ये सफाई कामगारांच्या हक्कांसाठी राष्ट्रीय सफाई आयोग आक्रमक
04:18
Video thumbnail
Latur News | सोनिया गांधींच्या पुस्तकाच्या विटंबनेविरोधात काँग्रेसचे आंदोलन; मडकी फोडून निषेध
02:25
Video thumbnail
Himayatnagar News | दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी श्री परमेश्वर मंदिर ट्रस्टची ११ लाखांची मदत
02:16
Video thumbnail
Nanded News | अशोक चव्हाणांसह चार आमदारांना धमकी देत खंडणीची मागणी; आरोपी मुंबईतून अटकेत
03:59
Video thumbnail
Latur Crime News | कोऱ्या बॉण्डपेपरवर सह्या घेऊन घर हडपल्याचा आरोप; महिला सावकाराविरोधात गुन्हा
02:16

Latest news