33.1 C
Latur
Monday, May 20, 2024
Homeराष्ट्रीयकेंद्रीय मंत्री पशुपती पारस यांचा राजीनामा

केंद्रीय मंत्री पशुपती पारस यांचा राजीनामा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
भारतीय जनता पक्षाने लोकसभा निवडणुकीसाठी एकही जागा न दिल्याने नाराज असलेले आरएलजीपी प्रमुख पशुपती पारस यांनी केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. पशुपती पारस यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत राजीनामा दिल्याची माहिती दिली. दरम्यान, ते बिहारमध्ये राजदप्रमुख लालूप्रसाद यादव यांची भेट घेऊन त्यांच्याशी युती करू शकतात, असे बोलले जात आहे. त्यामुळे हा भाजपला मोठा धक्का मानला जात आहे.

पशुपती पारस म्हणाले की, माझ्यासोबत आणि माझ्या पक्षासोबत अन्याय झाला आहे. आमच्या पक्षाला एकही जागा देण्यात आलेली नाही. पशुपती पारस हे राजीनामा देण्याआधी मोदी सरकारमध्ये केंद्रीय मंत्री होते. बिहारमधील जागवाटपात भाजपने चिराग पासवान यांच्या एलजेपी (रामविलास) पक्षाला महत्त्व दिले आहे. एलजेपीला ५ जागा देण्यात आल्या आहेत. त्यामुळे नाराज असलेल्या पारस यांनी राजीनामा दिला.

बिहारमध्ये लोकसभेच्या निवडणुकीसाठी एनडीएच्या जागावाटपाचा फॉर्म्युला जाहीर झाला आहे. भाजप बिहारमध्ये १७ जागांवर लढणार आहे, तर नितीश कुमार यांची जेडीयू १६ जागांवर आपला उमेदवार देणार आहे. इतर घटक पक्ष जसे की दिवंगत रामविलास पासवान यांचे पुत्र आणि लोकजनशक्ती पार्टीचे (रामविलास) प्रमुख चिरास पासवान यांना पाच जागा देण्यात आल्या आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR