33.9 C
Latur
Saturday, April 27, 2024
Homeपरभणीबस पुलावरून कोसळल्याने ३२ प्रवासी जखमी

बस पुलावरून कोसळल्याने ३२ प्रवासी जखमी

जिंतूर/ प्रतिनिधी
जिंतूरहून सोलापूरला जाणारी राज्य परिवहन महामंडळाची बस बुधवार, दि. २० रोजी सकाळी साडेआठच्या सुमारास अकोलीजवळील पुलावरून खाली कोसळल्याने बसमधील सुमारे ३२ प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत,

जिंतूर आगाराची ही बस सोलापूरकडे निघाली होती. वळणावरील अरुंद पुलावर बसचालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने बस ५० फूट खाली नदीपात्रात कोसळली. प्रत्यक्षदर्शींनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि बसमधील प्रवाशांना बाहेर काढले.

याबाबत अधिक माहिती अशी की जिंतूर आगाराची जिंतूर सोलापूर बस क्रमांक MH14-BT 2170 ही बस सकाळी सोलापूर मार्गे भरधाव वेगाने जात असताना जिंतूर शहरापासून अडीच किमी अंतरावर असलेल्या अकोली येथील वळण पुलावर बस चालक रंगनाथ शेळके यांचे बसवरील नियंत्रण सुटल्याने सदरील बस पन्नास फूट खोल असलेल्या नदीपात्रात पुलावरुन कोसळली यावेळी बसमध्ये जवळपास ४०-४५ प्रवासी प्रवास करत होते भरधाव बस कोसळल्यानंतर अपघात झाल्याचे लक्षात आले यावेळी बस चालक हा घटनास्थळावरून तातडीने फरार झाला.

या अपघातात ३२ प्रवासी जखमी झाले असून या जखमींना जिंतूर येथील ग्रामीण रुग्णालय तसेच परभणीच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी रवाना करण्यात आले आहे. घटनास्थळी वरिष्ठ पोलिस अधिकारी तसेच राज्य परिवहन महामंडळाचे अधिकारी हजर झाले. अकोली येथील या वळणावर यापूर्वी अनेक अपघात घडले आहेत.

राष्ट्रीय प्राधिकरण विभागाचे घटनास्थळाकडे दुर्लक्ष
जिंतूर-जालना या राज्य महामार्गाचे राष्ट्रीय महामार्गाकडे हस्तांतरण होऊन तब्बल पाच वर्षाचा कालावधी लोटल्यानंतरही ज्या ठिकाणी ही घटना घडली त्या ठिकाणी दरवर्षी एक घटना नेहमीच घडत असते परंतु ओळख पुलावर अपघात टाळण्यासाठी कुठल्याही उपाययोजना राष्ट्रीय प्राधिकरणाच्या वरिष्ठ अधिका-यांकडून करण्यात आलेल्या नाहीत त्यामुळे राष्ट्रीय प्राधिकरणाकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याची बाब आता समोर येत आहे.

घटनास्थळी रुग्णवाहिका व प्रशासनाचे अधिकारी उपस्थित
सदरील घटना झाल्याची माहिती वा-या सारखी सगळीकडे पसरल्यानंतर घटनास्थळी तातडीने ग्रामीण रुग्णालयाच्या रुग्णवाहिका तसेच खाजगी रुग्णवाहिका चालक यांनी जखमी प्रवाशांना तात्काळ रुग्णालयात दाखल केले यावेळी जिल्ह्यातील प्रादेशिक विभागाचे वरिष्ठ अधिकारी हनुमंत सुळे मोटार वाहन निरीक्षक स्वप्नील वाकळे सहाय्यक मोटार निरीक्षक अविनाश चोंडे सहायक मोटार निरीक्षक यांनी भेट देऊन घटनेची माहिती घेतली.

नेमका अपघात कशामुळे झाला ?
या सगळ्या प्रकरणाची पोलिस चौकशी करण्यात येणार आहे. अपघातस्थळी लोकांची गर्दी असून बस त्या ठिकाणीहून थोडीसी बाजुला करण्यात आली आहे. जखमींवरती जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत. ज्याची परिस्थिती नाजूक आहे अशा अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले आहे. सकाळी हा ज्यावेळी अपघात झाल्यानंतर जिंतूर ट्रामा केअर सेंटर येथे व घटनास्थळी पोलीस अधीक्षक परदेशी भेट देऊन घटनेची माहिती घेतली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR