40.1 C
Latur
Monday, May 20, 2024
Homeधाराशिवकोणता झेंडा घेऊ हाती...?

कोणता झेंडा घेऊ हाती…?

कळंब : सतीश टोणगे
धाराशिव जिल्ह्याचे राजकीय वातावरणात तापू लागले आहे. हा जिल्हा खरंतर शिवसेनेचा बालेकिल्ला. तत्कलिन जिल्हाप्रमुख कै. नरसिंग जाधव यांनी जिल्ह्यातील व ग्रामीण भागात शिवसेनेचे रोपटे लावले होते पण आता याच शिवसेनेची विभागणी झाली आहे. निष्ठावंत कार्यकर्ते गटातटाच्या राजकारणात गावाच्या बाहेर निघू शकलेले नाहीत. कोणता झेंडा घेऊ हाती अशी चर्चा आता निष्ठावंत कार्यकर्त्याकडून केली जात आहे. अजून तरी विरोधकांचा ताळमेळ नसल्यामुळे ओमराजेंना सध्या तरी वातावरण चांगले आहे.

हा मोठा मतदार संघ आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादीला हि जागा गेल्याने शिंदे सेनेचा तिळपापड उडाला आहे. तर राष्ट्रवादीचा उमेदवार सौ. पाटील यांनी विधान केल्याने अजित पवार गट नाराज आहें. राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाची या जिल्ह्यातील प्राबल्य नाही. कार्यकर्ते असले तरी, त्यांना संघटित करणार नेता नसल्याची चर्चा कार्यकर्ते करू लागले आहेत. सौ. अर्चनाताईंनी जाणून बुजून विधान केले की, त्या सहज बोलल्या यावरही मत मतांतर होऊ लागले आहेत. उमेदवार अर्चना ताईंना सर्वांची मोट बांधणी अवघड झालं आहे, असे असले तरी भाजपचे आ. राणा दादा पाटील यांचाही या मतदारसंघात संपर्क आहे

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR