36.3 C
Latur
Wednesday, May 1, 2024
Homeनांदेडआष्टीकर-कोहळीकर यांच्यात चुरस !

आष्टीकर-कोहळीकर यांच्यात चुरस !

हिमायतनगर : नागेश शिंदे
हिंगोली लोक सभेच्या निवडणूकीची रणधुमाळी सुरू झाली असून, ४ एप्रिल ही नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची शेवटची तारीख असल्याने, दोन्ही शिवसेना व वंचित बहुजन आघाडी सह सर्वच पक्ष संघटनेच्या वतीने फार्म दाखल करण्यात आले आहेत.

८ एप्रिल रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी भाजपचे गेम चेंजर म्हणून ओळखल्या जाणारे नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन हिंगोली जिल्ह्यात तळ ठोकले होते. शेवटी त्यांनी भाजपचे हिंगोली लोकसभेची तयारी केलेले रामदास पाटील सोमठानकर यांना युती धर्म पाळण्याचा सांगून त्यांना उमेदवारी मागी घेण्याचे सांगितले त्यावरून त्यांनी उमेदवारी मागी घेतली. हिंगोली लोकसभा निवडणुकीत आता विशेषकरून हदगाव, हिमायतनगर विधानसभेतील दोन दिग्गज नेते हिंगोलीच्या निवडणूक मैदानात उतरले असून महाविकास आघाडीकडून उबाठा शिवसेनेचे माजी आमदार नागेश पाटील आष्टीकर तर बाळासाहेबांची शिवसेना शिंदे गट, भाजप व इतर घटक पक्ष महायुतीकडून बाबुराव कदम कोहळीकर हे निवडणूक रिंगणात आहेत तर वंचित बहुजन आघाडीकडून डॉ. बी. डी. चव्हाण यांच्यासह अनेक पक्ष संघटनेचे उमेदवार या निवडणूकीत भविष्य आजमावत आहेत.

हदगाव, हिमायतनगर विधानसभेत गेल्या विधान सभेच्या निवडणूकीत शिवसेनेकडून कोहळीकर यांना विधानसभेचे तिकीट नाकारल्यानंतर बंडखोरी करीत अपक्ष निवडणुकीला सामोरे गेले. काँग्रेस विद्यमान आमदार माधवराव पाटील जवळगावकर हे या निवडणूकीत विजयी झाले होते, परंतू बाबुराव कदम कोहळीकर हे अपक्ष राहूनही क्रमांक दोनची मते घेवून माजी आमदार आष्टीकरांना भारी पडले होते पण आता चित्र वेगळे असल्याचे पहायला मिळत आहे जातीय समीकरण पाहता हिंगोली लोकसभेच्या निवडणुकीच्या रिंगणात आष्टीकरानी कोहळीकर यांच्या समोर मोठे आव्हान उभे करणार आहेत.
हदगाव हिमायतनगर विधानसभा मतदारसंघात या वेळेस कोण जास्तीचे मताधिक्य मिळवते, हे पहाणे ऊत्सकूतेचे ठरणार आहे. महाविकास आघाडीकडून जोरदार शक्तिप्रदर्शन करीत आष्टीकरांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR