18.1 C
Latur
Monday, November 25, 2024
Homeमहाराष्ट्रते फडण‘वीस’ तरी आपण ‘२०’

ते फडण‘वीस’ तरी आपण ‘२०’

मुंबई : प्रतिनिधी
विधानसभा निवडणुकीमध्ये प्रचंड अशा असतानाही दारुण पराभवला सामोरे गेलेल्या शिवसेना ठाकरे गटाकडून आज नवनिर्वाचित २० आमदारांची बैठक बोलावण्यात आली. या बैठकीमध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आमदारांना पुन्हा एकदा आश्वस्त करण्याचा प्रयत्न केला. ते फडण‘वीस’ असले तरी आपण ‘वीस’ आहोत, आपण त्यांना पुरून उरु, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

दरम्यान, आज शिवसेना ठाकरे गटाकडून ज्येष्ठ नेते भास्कर जाधव यांची गटनेतेपदी निवड करण्यात आली. पक्ष प्रतोदपदी सुनील प्रभू यांचीच निवड करण्यात आली. आदित्य ठाकरे यांची यांची विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड करण्यात आली आहे.

उद्धव ठाकरे यांनी आमदारांच्या बैठकीत मार्गदर्शन करताना आश्वस्त करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान गटनेतेपदी निवड झाल्यानंतर भास्कर जाधव यांनी प्रतिक्रिया दिली. भास्कर जाधव यांनी सांगितले की, गटनेता म्हणून माझी नियुक्ती करण्यात आली आहे. मला सात टर्म आमदारकीचा अनुभव आहे.

खरं तर माझे म्हणणे होते की आदित्य ठाकरे यांना गटनेता म्हणून नियुक्त करण्यात यावे, पण उद्धव ठाकरे यांनी हा आदेश दिला. त्यामुळे मी गटनेता म्हणून शिवसेनेचे काम करणार असून सर्व प्रश्न मांडणार असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान विरोधी पक्षनेते पदावर बोलताना त्यांनी सांगितले की सरकार सक्षमपणे चालवण्यासाठी विरोधी पक्ष असावा आणि त्यासाठी विरोधी पक्षनेतेपद असावे. सत्ताधा-यांनी सुद्धा अशा प्रकारचा विचार करून विरोधी पक्ष पदासाठी विचार करायला हवा, असे त्यांनी सांगितले.

सरकार स्थापन झाल्यानंतर हा सगळा निर्णय होईल. विधानसभा अध्यक्षांकडे आम्ही विरोधी पक्षनेता महाविकास आघाडीचा एकत्र मिळून व्हावा यासाठी विनंती करणार असल्याचे त्यांनी सांगितले. महाविकास आघाडीमध्ये संख्याबळ आमचं जास्त असल्याने विरोधी पक्षनेता आमचा म्हणजे शिवसेनेचा होईल. मला जबाबदारी दिली तर नक्कीच विरोधी पक्षनेता व्हायला आवडेल, असे त्यांनी यावेळी नमूद केले. ते म्हणाले की राज्यात पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या संख्येने सत्ताधारी झाले आहेत आणि विरोधी पक्ष संख्येने छोटा झाला आहे. तरीपण विरोधी पक्ष हा सत्ताधा-यांना पुरून होईल असा विश्वास सुद्धा त्यांनी व्यक्त केला.

शिंदेंकडून चुकीचे आरोप : अंबादास दानवे
दुसरीकडे अंबादास दानवे यांनीही विश्वास व्यक्त केला. ते म्हणाले की इतर पक्षांप्रमाणेच आमच्या पक्षातील विधिमंडळ नेत्यांची निवड करण्यात आली आहे. आमचा कोणी आमदार फुटणार नसल्याची ग्वाही त्यांनी दिली. शिंदेंकडून चुकीचे आरोप करण्यात येत असल्याचे ते म्हणाले. आदित्य ठाकरे यांची निवड नियमाप्रमाणे करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR