राज्यात गारठा वाढला; शेकोट्या पेटल्या

पुणे : प्रतिनिधी
राज्यातील थंडी काही दिवसांपूर्वी गायब झाली होती. पण आता पुन्हा तापमानात घट झाली असून थंडी वाढायला सुरुवात झाली आहे. सध्या मुंबई, पुण्यासह राज्यातील सर्वच जिल्ह्यांमधील नागरिक थंडीचा अनुभव घेत आहेत. उत्तर भारतामध्ये थंडी प्रचंड वाढली आहे. देशातील उत्तरेकडील राज्यातून येणा-या थंड वा-यांमध्ये महाराष्ट्रामध्ये गारठ्यात कमालीची वाढ झाली आहे.

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. हा कमी दाबाचा पट्टा सध्या तामिळनाडूच्या दिशेने पुढे सरकत आहे. या कमी दाबाच्या पट्ट्याचे चक्रीवादळात रुपांतर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. बंगालच्या उपसागरामध्ये निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे पुढचे ६ दिवस दक्षिण भारतात मुसळधार पाऊस पडण्याची स्थिती निर्माण झाली आहे. महाराष्ट्रात पावसाची शक्यता नाही पण पुढच्या ५ दिवसांत थंडीचा जोर वाढणार आहे.

महाराष्ट्रात सध्या दिवसा ३ ते ५ डिग्री सेल्सिअस तापमानात वाढ राहण्याची शक्यता आहे. तर रात्री ३ ते ५ डिग्रीने तापमान घसरण्याची शक्यता आहे. राज्यात गेल्या दोन दिवसांत किमान तापमानामध्ये कमालीची घट झाली आहे. उत्तर आणि पश्चिम महाराष्ट्रात येत्या दोन दिवसांत २ ते ४ अंश सेल्सिअसने तापमानात घट होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. तर राज्यातील इतर ठिकाणीही हळूहळू तापमान घसरण्याची शक्यता आहे. तापमानात घट होऊन थंडी वाढल्यामुळे राज्यात ठिकठिकाणी शेकोट्या पेटल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

पुढील ५ दिवसांमध्ये तापमानात होणार आणखी घट

महत्त्वाचे म्हणजे, उत्तर महाराष्ट्रात थंडी प्रचंड वाढली आहे. उत्तर महाराष्ट्रात पारा १० अंश सेल्सिअसच्या खाली गेला आहे. पुढील ५ दिवसांमध्ये तापमानात आणखी घट होण्याची शक्यता आहे. सध्या जळगावमध्ये किमान तापमान ८.६ अंशांवर पोहोचले आहे. पुढच्या काही दिवसांत या तापमानात देखील घट होईल. तापमानात कमालीची घट झाल्यामुळे सध्या राज्यातील नागरिक गुलाबी थंडीचा अनुभव घेताना दिसत आहेत.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
वर्धापन दिन । पुरोगामी विचाराचे एकमत - धाराशिव
02:18:26
Video thumbnail
वर्धापन दिन । पुरोगामी विचाराचे एकमत- सोलापूर
02:13:30
Video thumbnail
LATUR|एकमतच्या 35 व्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने सत्त्कारमूर्तींच्या प्रतिक्रिया
21:01
Video thumbnail
Nanded|शेतात मोठा खड्डा अन् आत देवीची मूर्ती! नायगावमध्ये नेमकं गूढ काय?
00:52
Video thumbnail
Latur|लातूर RTO मध्ये एजंटची दादागिरी? थेट इन्स्पेक्टरला लाथाबुक्क्यांनी मारहाण!
03:18
Video thumbnail
Latur|शेतकऱ्यांच्या मुलीच्या लग्नासाठी ‘शुभमंगल’ योजना आणण्याचा प्रयत्न - धिरज देशमुख
08:10
Video thumbnail
CHAKUR|महिला सक्षमीकरणात विशेष योगदान-ज्योतीताई स्वामी
04:32
Video thumbnail
RENAPUR|ग्रामीण प्रशासनातील आदर्श अधिकारी तानाजी यादव
04:43
Video thumbnail
UDGIR|साहित्य शिक्षण ,सांस्कृतिक क्षेत्रात अनिता येलमटे यांचे योगदान
03:05
Video thumbnail
UDGIR|दुष्काळाच्या मातीत शिक्षणाची गंगा प्राचार्य सूर्यकांत चवळे
04:08
Video thumbnail
UDGIR|सेवाभाव,संवेदनशीलता समर्पणाचा आदर्श-डॉ प्रियांका राठोड
02:49
Video thumbnail
UDGIR|गावच्या मातीचा सुगंध बाल भारतीच्या पाठयपुस्तकात रसूल पठाण यांचा प्रेरणादायी प्रवास
04:01
Video thumbnail
RENAPUR|महेबूब शेख यांची बांधकाम क्षेत्रात यशोगाथा
02:24
Video thumbnail
DEVANI|आधुनिक शेतीचा चमत्कार महेश रबशेट्टे
04:35
Video thumbnail
UDGIR|समाजसेवा,शिक्षण आणि सांस्कृतिक दीप प्रज्वलित ठेवणाऱ्या प्रा.ज्योती कवडेकर
02:35

Latest news